आजचे आहेत रवीप्रसाद शर्मा म्हणजे रवीजी! आतापर्यंतच्या सगळ्या संगीत कारांबद्दल काहीतरी ऐकलसंगीतकार होतं. त्यांची विशेष शैली! काहीवर लोकससंगीताचा प्रभाव, काहींचा भला मोठा वाद्यवृंद असण्याचा आग्रह, काहींचा गजल या काव्यप्रकाराविषयी प्रेम, काहींचे विशिष्ट स्वभाव! पण रवीजींबद्दल तशी फारशी माहिती नव्हती. काही controversy ना काही वादविवाद किंवा अमूक एक व्यक्तीबद्दत अढी. काही मोजकीच गाणी कानावर होती त्यांची, त्यात वक्त चित्रपटातलं "ऐ मेरी जोहराजबीं आणि "आगे भी जाने ना तू वगैरे! जसजशी माहिती घेत गेले तसे खरचं खूप नव्याने उलगडले रवीजी मला! रवीजी मूळचे दिल्लीचे. त्यांनी संगीताचे शास्त्रशुध्द शिक्षण घेतले नव्हते पण ते प्रयत्नपूर्वक हार्मोनियम आणि काही भारतीय वाद्य शिकले. वडील भजने गात असत. तेही लक्षपूर्वक ऐकून म्हणत. १०वी पर्यंत शिक्षण झाल्यावर सुरु वातीला 4/5 वर्ष Electrician ची नोकरी करुन कुटुंबाला हातभार लावला पण पार्श्वगायक व्हायची इच्छा स्वस्थ बसू देईना! एक दिवस त्यांनी तडक मुबई गाठली. कोणाचाही आधार नव्हता. सुरुवातीला धर्मशाळेत रहायचे. कधी जागा न मिळाल्यावर स्टेशनवर किंवा दुका...