Skip to main content

शंकर जयकिशन ***

आजची संगीतकार जोडी आहे S J... शंकरसिंग रघुवंशी आणि जयकिशन डाह्याभाई पांचाल.ते दोघेही अगदी सुरुवातीच्या काळात पृथ्वी थिएटर मधे कामासाठी उमेदवारी करत असत. दोघांची संगीताची जाण आणि आवड ह्यामुळे दोघांचे सूर जुळले. राजकपूर *बरसात* चित्रपटासाठी जुळवाजुळव करताना संगीतकार राम गांगुली ..(ज्यांनी "आग" या चित्रपटाला संगीत दिलेले) यांच्याशी वाद झाल्यामुळे राजकपूर यांनी शंकर ह्यांच्यावर त्या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सुचवलेली. जयकिशनजी तेव्हा उत्तम हार्मोनियम वाजवत. त्यांना साथीला घ्यावे आणि जोडीने संगीत द्यावे असे शंकरजींना वाटले. राजकपूरच्या संमतीने त्यांनी जयकिशनना साथीला घेतले. आणि *बरसात*चित्रपटापासून सुरु झालेला हा सिलसिला टिकला तो अगदी जयकिशनच्या दुर्देवी मृत्यूपर्यंत! या जोडीने संगीतबध्द केलेल्या चित्रपटांपैकी काही सुपरहीट चित्रपट असे.*बरसात* *आह* *संगम* *आशिक* *आवारा* *जिस देशमें गंगा बहती है* *असली नकली* *लव्हमॅरेज* *जंगली* *दिल तेरा दीवाना* *हरीयाली और रास्ता* *हिमालय की गोदमे* *उजाला* *आम्रपाली* प्रोफेसर* *मेरा नाम जोकर* *अराउंड द वर्ल्ड* *अंदाज* *जहां प्यार मिले* *जाने-अनजाने* *बेईमान*..... शंकर जयकिशन ...यांच्या गाण्यातील *Orchestration* आणि *Melody* मला खूप भावते. त्यांची अवीट गोडीची काही *युगुलगीते*... *तेरा मेरा प्यार अमर *तुझे जीवन की डोरसे *ओ मेरे सनम ओ मेरे सनम *ओ शमा मुझे फूंक दे *धीरे धीरे चल चांद गगनमें *झूमता मौसम मस्त महिना *लाखो तारे आसमानमें *आवाज देके हमें तुम बुलाओ *मेहेताब तेरा चेहेरा *बोल मेरी तकदीरमे *प्यार हुआ इकरार हुआ दुनियावालोंसे दूर जलनेवालोंसे दूर *तर काही सोलो*.... *रसिक बलमा दिल क्यूं लगाया *एहसान तेरा होगा मुझपर (रफी/लता) *ओ बसंती पवन पागल *तेरी याद दिलसे भूलाने चला हूं *मैं तो इक ख्वाब हूं इस ख्वाबसे *किसीकी मुस्कराहटोंपे हो निसार *दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा *जाने कहा गए वो दिन *नीलगगन की छाओमें *तुम्हे याद करते करते *मेरा जूता है जपानी *जीना यहां मरना यहां शैलेंन्द्र, हसरत जयपुरी, मुकेश, लताजी, शंकर-जयकिशन आणि राजकपूर हे एक युनिक combination होतं. त्यांनी असंख्य सुपरहीट गाणी दिलीत. संगीतकार *दत्ताराम* हे कित्येक वर्ष S J चे सहाय्यक होते.त्यांनी स्वतंत्रपणे संगीत दिलेल्या गाण्यांवरही S J ची छाप आहे...*परवरीश* चित्रपटातील *आंसूभरी है* किंवा कैदी नं ९११* मधील *प्यारभरी ये घटाए* हे वानगीदाखल... मन्नाडे याचे भीमसेनजींच्या साथीने म्हटलेले *केतकी गुलाब जुही* *तू प्यारका सागर है* *याल्ला याल्ला दिल ले गई*.... किशोरदांच *जिंदगी एक सफर है* सुहाना* , *गीत गाता हूं मैं* *नखरेवाली आ आ आ आ* *आशाजींचे "पान खाए सैंया हमारो*, * दिल उसे दो जो जां दे दे *रफीजींचे बदनपे सितारे* "*एहसान तेरा होगा मुझपर*", *मैं गाऊं तुम सो जाओ* आंसमानसे आया फरीश्ता सुमनजींचे *आजकल तेरे मेरे प्यारके चरचे*, *आया ना हमको प्यार जताना* *चले जा चले जा जहां प्यार मिले* ही पण गाणी तेवढीच गाजली. *चांदसी मेहेबूबा मेरी हो कब* हे *हिमालय की गोदमें* या चित्रपटातील सुंदर गीत ..डॉक्टर असलेल्या मनोज कुमार वर निर्जनजागी एका टोळीकडून हल्ला होतो. तेव्हा गांव की गोरी मालासिन्हा त्याच्यावर उपचार करते. सुंदर, भोलीभाली मालासिन्हा आणि मनोजकुमार यांच्यात प्रेमभावना फुलू लागते त्या पार्श्वभूमीवर हे गीत आहे. हिमालयाच्या पायथ्याच्या एका गावातला निसर्गरम्य परीसर बघून हरखून जातो आपण! मुकेशच्या आवाजातले हे गीत अतिशय प्रिय! जयकिशनच्या मृत्यूच्या थोडं आधी ह्या दोघांमधे थोडा बेबनाव झाला होता. शंकरजींनी दक्षिणेकडच्या *शारदा* या गायिकेला संधी दिलेली जयकिशनना कधीच आवडले नाही. लताजींनी पण त्यांच्याकडे गाणे बंद केले. जणू त्यांच्या जोडीला नजर लागली. जाता जाता जयकिशनजीं विषयी एक ह्रद्य आठवण! १९७१ साली जयकिशनजींचे यकृताच्या आजाराने दुःखद निधन झाले. जयकिशनजींचे मुंबईतले *Gaylord*restaurant* त्यांचे अतिशय आवडते. कितीतरी सुंदर गाण्यांचा उगम तिथल्या सिटींग्ज मधून झालेला. त्या "*Gaylord*" restaurant* मध्ये जयकिशनजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या आवडत्या टेबलवर एक मेणबत्ती आणि "*Reserved for Jaikishan*" अशी पाटी एक महिनाभर होती* त्यांच्याच गीताने त्यांना आदरांजली! " *जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहा*" *S J...we love you!* © कृपा देशपांडे...

Comments