Skip to main content

संगीतकार कल्याणजी आनंदजी...

एका गुजराथी व्यापारी कुटुंबात कल्याणजी आनंदजी यांचा जन्म झाला. पूर्वी कच्छ येथे स्थित हे घराणे व्यवसाया निमित्तमुंबईत गिरगाव येथे रहाण्यास आले. मुंबईत त्यांचे किराणा मालाचे दुकान होते. त्यांचे आजोबा लोकसंगीताचे चांगले जाणकार होते. तीच आवड ह्या भावंडात उतरली. त्या भावंडांनी एका संगीत शिक्षकिकडून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने संगीत शिक्षक किराणा मालाच्या बिलाच्या बदल्यात संगीत शिकवायचे. करीअर च्या सुरुवात त्यांनी वादक म्हणून केली. ते उत्तम बीन वाजवायचे. नागिन चित्रपटात हेमंतदांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी सर्व गाण्यात बीन वाजवली.त्याकाळी कल्याणजीभाईं, आपले बंधू आनंदजीभाईंच्या साथीने एक वाद्यवृंद चालवायचे. त्यांना स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शनही करायचे होते. त्याकाळी नौशादजी, शंकर जयकिशन, मदनमोहन, सचिनदा, रवीजी असे मोठं मोठे संगीतकार कार्यरत होते. त्यांच्यात राहून स्वतंत्रपणे आपले अस्तित्व सिध्द करायचे हे आव्हान त्यांनी पेलले आणि संधी मिळताच स्वतःला सिध्द ही केले. त्यांचा पहिला चित्रपट "सम्राट चंद्रगुप्त (१९५९) चांगला चालला. त्यातील "चाहे पास हो चाहे दूर हो"...हे गाणे खूप हीट झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही..कल्याणजी भाईंनी सुमारे २०० चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे धाकटे बंधू "बाबला" हे उत्कृष्ट ड्रम वाजवतात. त्यांच्या गरब्याच्या कॅसेटस खूप गाजल्या. कल्याणजी, आनंदजी भाई नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देत. मनहर उदास, कुमार सानू, अनुराधा पौडवाल, अलका याज्ञिक, साधना सरगम, सपना चौधरी,सुनिधी चौहान यांना करीयर ब्रेक या जोडीनेच दिला. तसेच गीतकार कमर जलालाबादी, वर्मा मलिक, गुलशन बावरा, एम जी हश्मत यांनी चित्रपटा साठी पहिले गीत यांच्यासाठीच लिहिले. कल्याणजी आनंदजी भाई N G O आणि Charitable Organisation साठी Charitable Concerts आयोजित करत. कल्याणजी आनंदजीना *मेरा जीवन कोरा कागज* या गीतासाठी *फिल्मफेअर* पुरस्कार मिळाला. *सरस्वतीचंद्र* या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९७४/७५ पर्यंत त्यांनी उत्तमोत्तम चित्रपटांना सगीत दिले.६०, ७० आणि ८० अशी तीन दशकं अक्षरशः गाजवली. कल्याणजीभाईंचे १९८० साली दुःखद निधन झाले. कल्याणजी आनंदजी यांची काही श्रवणीय गाणी व चित्रपट... *दुल्हा दुल्हन* *जो प्यार तूने मुझको दिया *हमने तुझको प्यार किया है जितना *मुझे कहते है कल्लू कवाल *छलिया* *मेरे टूटे हुए दिलसे कोई तो आज ये पूछे *डम डम डिगा डिगा मौसम भीगा भीगा *बाजे पायल छुन छुन होके बेकरार *पोस्ट बाॅक्स नं. ९९९ *नींद ना मुझको आए दिल मेरा घबराए *मेरे दिलमें है एक बात कहदूं तो भला *सट्टाबाजार* तुम्हे याद होगा कभी हम मिले थे मुहब्बत की राहोमें मिलके चले थे *महल* *आखोआखोमें हमतुम हो गए दीवाने *ये दुनियावाले पूछेंगे मुलाकात हुई.. विश्वास *दर्पण को देखा तूने जब जब किया सिंगार *चांदीकी दीवार न तोडी प्यार भरा दिल तोड दिया *आपसे हमको बिछडे हुए एक जमाना बीत गया *सफर* *जिंदगी का सफर है ये कैसा सफर *जीवनसे भरी तेरी आंखे मजबूर करे *हम थे जिनके सहारे वो हुए ना हमारे *तुझको चलना होगा *हिमालय की गोदमें*_ *चांदसी मेहेबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था *मैं तो एक ख्वाब हूं इस ख्वाबसे तू प्यार न कर *उंचे हिमालयके नीचे छुपके चनारोंके पीछे *एक तू जो मिला सारी दुनिया मिली *मेरे हमसफर* *किसी राहमें किसी मोडपर कहीं चल न देना तू छोडकर *उपकार* *दुल्हन चली हो बहन चली *कसमे वादे प्यार वफा सब बाते है *हर खुशी हो वहा तू जहां भी रहे *दीवानोंसे ये मत पूछो *सरस्वतीचंद्र *चंदन सा बदन चंचल चितवन *फूल तुम्हे भेजा है खतमें *फूल बने अंगारे - * चांद आहे भरेगा फूल दिल थाम लेंगगे *जब जब फूल खिले *ये समा समाहै ये प्यारका *एक था गुल और एक थी बुलबुल *यहां मै अजनबीं हूं *ना ना करते प्यार तुझीसे कर बैठे *हसीना मान जाएगी* *बेखुदी में सनम उठ गए जो कदम *चले थे साथ मिलकर चलेंगे साथ मिलकर *पूर्णिमा* *हमसफर मेरे हमसफर पंख तुम परवाज हम *ब्लफ मास्टर* *गोविंदा आला रे आला *ए दिल अब कहीं ना जा *हुस्न चला कुछ ऐसी चाल काही ७० ते ८० च्या दशकातल्या त्यांनी दिलेल्या चित्रपटांचेही संगीत तूफान गाजले. जसे की... *जॉनी मेरा नाम* *ओsss मेरे राजा खफा न होना *नफरत करनेवालोंके सीनेमें प्यार भर दूं *ओ बाबुल प्यारे * कोरा कागज* *मेरा जीवनकोरा कागज कोरा ही रह गया *ब्लॅकमेल* *पल पल दिलके पास तुम रहती हो *मिले मिले दो बदन खिले खिले दो चमन *शरबती तेरी आंखोकी झीलसी गहराईमें *मुकद्दर का सिकंदर ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना प्यार जिंदगी है प्यार बंदगी है सलामे इश्क मेरी जां *जांबाज *हर किसीको नहीं मिलता यहां प्यार जिंदगीमें धर्मात्मा *क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो *तुमने किसीसे कभी प्यार किया है *तेरे चेहेरेमें वो जादू हैं बिनडोर खींचा जाता हूं © कृपा देशपांडे...

Comments