एका वसतिगृहात वृध्द पुष्पा मोठाली भांडी घासतेय. वसतीगृहाचा नोकर तिला भांडी नीट न घासण्यावरुन तसेच तिच्या पूर्वायुष्यावरुन वाट्टेल ते बोलतोय. ते सहन न होऊन जवळ उभे असलेले आनंदबाबू त्याची गचांडी धरुन त्याला संतापाने बोलतात. नोकर आणि इतरांना निरुत्तर करुन त्यांच्या बरोबर आलेल्या नंदूला म्हणतात, हीच योग्य वेळ आहे या माऊलीच्या ममतेच्या कर्जातून मुक्त व्हायची. आज दुर्गाष्टमी आहे. हिला तू सन्मानाने आपल्या घरी घेऊन जा! आणि नंदू जेव्हा तिला घेऊन जाण्यासाठी निघतो तेव्हा आनंबाबूंचे डोळे भरुन येतात, तेव्हा ते म्हणतात ,"मुझे मालूम नहीं था रोनेमेंभी इतना सुख मिलता है, नहीं तो मैं कभीं नही कहता ,"पुष्पा आय हेट टीअर्स"! *अमरप्रेम* ह्या चित्रपटातलं द्रृष्य काळीज हेलावणारं! काय अप्रतीम काम केलय यात राजेश खन्ना आणि शर्मिलाने! तुम्ही ओळखलच असेल आजची कलाकार आहे द एव्हर स्मायलिंग विथ क्यूट डिंपल्स,द स्टाईलिश, ग्लॅमरस,एलिगन्ट शर्मिला टागोर! शर्मिलाचा पहिला बंगाली चित्रपट "अपूर संसार" त्यासाठी प्रसिध्द चित्रपट निर्माते दिग्दर्शक "सत्यजित रे" यांना १३/१४ वर्षांच्या मुलीच...