एका ७० च्या दशकातला चित्रपटाच्या घडलेला हा प्रसंग आहे. नायिका' चांगली प्रथितयश! नायक त्यामानाने नवखा. नायिकेची कोरी करकरीत मर्सिडिझ कार, नायकाची त्या मानाने साध्या मेक ची! सीन ओ के झाल्यावर मधल्या ब्रेकमधे सगळे गप्पा मारताना नायक म्हणतो, "यार वो दिन कब आएगा जब मैं ऐसी कार चला सकू"! शूटिंग संपल्यावर सगळे आपआपल्या घरी
नायकाची कार दिसेना. चौकशी केल्यावर असे कळले कि नायिका त्याची कार घेऊन गेली आहे आणि स्वतःच्या कारची चावी ठेऊन निरोप ठेवलाय कि हि कार आज तू ने आणि जितके दिवस चालवायची तितके दिवस ठेव. दोस्तहो तो नायक होता द ग्रेट अमिताभ बच्चन आणि ती सहदय नायिका होती"लाखो दिलोंकी धडकन" मुमताज!
एका सर्वसाधारण मुस्लीम कुटुंबात मुमताजचा जन्म झाला. वडील सुक्यामेव्याचे विक्रेते होते. मुमताजच्या बहिणीच्या जन्मानंतर लगेचच तिचे आई वडिल वेगळे झाले. मुमताजची आई आणि मावशी पण चित्रपटात extra म्हणून काम करायच्या. परिस्थितीमुळे मुमताजने १२ वर्षांची असल्यापासून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून "सोनेकी चिडीया" ह्या चित्रपटात काम केल्यानंतर हळूहळू तिनेही "वल्ला क्या बात है", "स्री" "सेहरा" अशा अनेक चित्रपटात तिने extra म्हणून काम केले. नंतर "ओ पी रल्हन यांच्या "गहरा दाग" मधे ती राजेंद्र कुमारची बहिण झालेली तर"सूरज" मधेही ती वैजयंती मालाच्या दासीच्या भूमिकेत होती. तसेच "मुझे जीने दो" या मधेही छोटिशी भूमिका होती.मुमताजची समकालीन शर्मिला टागोरच्या ४/५ चित्रपटातही छोट्या रोलमधे मुमताज होती जसे कि *ये रात फिर न आएगी*, *सावनकी घटा* *मेरे हमदम मेरे दोस्त*! ह्यातील "अल्ला ये अदा कैसी है इन हसीनोंकी...हे गाणं आणि त्यावरचं नृत्य कोण विसरेल?
मुमताजचं स्ट्रगल चालूच होतं. इथे दारासिंगना स्टंटपटात नायिका मिळत नव्हती. कुणीतरी मुमताजला विचारणा केली आणि स्टंटपट का होईना पण मुख्य भुमिका आहे म्हणून ती लगेच तयार झाली. थोडेथोडके नाही तर १६ हीट स्टंटपट केलं. त्यातला एक होता "सिकंदर-ए-आझम"! "जहां डाल डालपर सोनेकी चिडियां करती है बसेरा" हे सुप्रसिध्द गीत त्या चित्रपटात होतं.त्याकाळी दाराजींना साडेचार लाख मानधन होते तर स्मुमताजला अडीच लाख! पैसा मिळू लागला होता पण चांगल्या बॅनरखाली नायिकेचं काम मिळेना.नाही म्हणायला *पत्थर के सनम* मध्ये खलनायिकेचा रोल मिळाला होता. पण भले भले नायक ती स्टंटपटाची नायिका म्हणून काम करायला तयार नव्हते. १९६७ साली बी. नागी रेड्डींच्या "*राम और श्याम*" मधे तिला दिलीपजींच्या समवेत नायिकेची संधी मिळाली आणि तीने संधीचं सोनं केलं. "बालम तेरे प्यारकी ठंडी आगमें जलते जलते"..,हेसुंदर गाणंही मिळालं. तसचं त्याच वेळी जितेंद्र बरोबरचा "बूंद जो बन गहई मोती" आला. यातलं "Maine bhi pyar kiya"हे गाणं तसचं १९६८ मधला *ब्रह्मचारी*.."आजकल तेरे मेरे चरचे" हा शम्मीकपूर बरोबरचा डान्सही तेवढाच सुंदर!
पण तरीही चागंले चित्रपट मिळायला १९६९ साल उजाडले. राज खोसला यांच्या "*दो रास्ते*" मधे राजेशखन्ना बरोबर चित्रपट मिळाला. रोल फार मोठा नसला तरी मोठा बॅनर आणि चार उत्तम गाणी मिळाली.
या नंतर लगेच आला राजेश खन्ना बरोबरचा *बंधन*, जितेंद्रबरोबर *जिगरी दौस्त* नंतर *आदमी और इन्सान*! ह्यात सहाय्यक भूमिका असली तरी महत्वाची होती. नंतर आला एक सुंदर चित्रपट... *खिलौना*! प्रेयसीने धोका दिल्यामुळे मेंटल बॅलन्स गमावलेल्या एका तरुणाच्या आयुष्यात आलेली गणिकेची भूमिका मुमताजने एवढी उत्तम केली कि तिच्या कामाची वाहवा होऊ लागली. खिलौनात लक्ष्मी प्यारेंच सुमधूर संगीत होतं.तिला ह्या चित्रपटात "Film Fare" Best actress award मिळालं.
*सच्चा झूठा* मधे आधी शशीकपूर काम करणार होते पण मुमताजचं नाव ऐकल्यावर स्टंटपटातल्या नायिकेबरोबर काम नाही करायचं म्हणून त्यानी नकार दिला. दैवाचा खेळ कसा असतो पहा.पुढे मुमताचची कारकिर्द ऐन भरात असताना *चोर मचाए शोर* चित्रपटात मुमताज हिरोईन होगी तोही काम करुंगा! असे अडून बसलेले. शेवटी "सच्चाझूठा" मधे राजेश खन्नाने मुमताज बरोबर काम केले आणि चित्रपट जबरदस्त हीट झाला. ७० च्या अखेरीस हिम्मत(जितेंद्र) आणि १९७१ मध्ये लागोपाठ *मेला* (संजयखान), *चाहत*(जितेंद्र,विश्वजीत), *उपासना* ( संजय & फिरोज खान) हे चित्रपट बर्र्यापैकी गाजले. १९७१ मध्ये मुमताजचे अजून तीन चित्रपट हीट झाले ते म्हणजे *तेरे मेरे सपने* आणि *हरे रामा हरे कृष्णा* आणि *दुश्मन* त्यात मुमताजच्या भूमिका फार मोठ्या नसल्या तरी आता एक successful romtic pair म्हणून निर्माते तिला घेत असत.
त्यानंतर १९७२/७३ मध्ये पुन्हा ओळीने *गोमती के किनारे*, *अपराध* *रुप तेरा मस्ताना* .*अपना देश* *बंधे हाथ* *लोफर* *झीलके उस पार* हे चित्रपट आले ज्यात राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, फिरोज खान, धर्मेद्र हे सहनायक होते..१९७४ मध्ये आलेल्या *आपकी कसम* मध्ये ती फारचं सुंदर दिसली आहे,विषेशतः *जय जय शिवशंकर" ह्या गाण्यात she was just awesome! ... या चित्रपटात तिची मध्यवर्ती भूमिका होती. राजेश खन्ना नायक आणि संजीवकुमार सहाय्यक भूमिकेत!नवर्र्याने अकारण घेतलेल्या संशयाने दुखावलेली पत्नी तिने खूप सुंदर साकारली.
त्यानंतर *रोटी* आणि *प्रेमकहानी* १९७७ मध्ये तिचे *आईना* *लफंगे* आणि *नागीन* हे चित्रपट झळकले जे ती लग्नाआधी पूर्ण करुन गेली होती. तिने मयूर माधवानी या लंडनस्थित उद्योगपतीशी विवाह केला आणि हिंदी चित्रपटसृष्टीला राम राम ठोकला. ह्या आधी मुमताज १८ वर्षाची असताना शम्मीकपूरने तिला लग्नासाठी विचारले होतें. पण लग्नानंतर चित्रपटात काम करायचे नाही अशी अटही घातलेली. मुमताजने या गोष्टीवरुन नकार दिला. खरं तर दोघात जवळीक निर्माण झाली होती.
मुमताज फक्त अभिनयासाठी कधीच प्रसिध्द नव्हती. पण जिथे तिला संधी मिळाली तिने त्या भूमिकेचं सोनं केलं. काही वर्ष अशीच गेली. ती अधून मधून येत राहिली. दोन मुलींपैकी मोठी तान्याचं फिरोजखानच्या मुलाशी लग्न झालं. आणि एक दिवस तिला कॅन्सर झाल्याची दुःखद बातमी आली. कधीमधी फोटो झळकायचे वृत्तपत्रात. पण ती सुंदर, अवखळ, मोहक दिसणारी मुमताज जणू हरवून गेली.. ५१ व्या वर्षी तिला कॅन्सर झाला. आज २० वर्ष ती जिद्दीने लढतेय.
१९९६ साली तिला "फिल्मफेअर"ने *लाईफटाईम अचिव्हमेंट* पुरस्काराने गौरविले. मग तिच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील सोनेरी कारकिर्दीसाठी "*आयफा*"चा पुरस्कार पण मिळाला. मध्ये १९९० साली डेव्हीड धवनच्या *आंधियां* चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा बरोबर ती झळकलेली. बस्स! तो तिचा शेवटचा चित्रपट! आता मुमताज कधीमधी भारतात येते कुठल्या नातेवाईकांच्या कार्यक्रमाला.मुलीला भेटायला..आम्ही त्या "शोख", "हसीन", "चुलबुली" अपर् नाक वाल्या मुमताजची वाट बघतोय जी आम्हाला स्वप्नात जरुर भेटेल...
मुमताजचे काही गाजतेले चित्रपट आणि
गाणी...
*दो रास्ते*
*बिंदिया चमकेगी चुडी खनकेगी
*छुप गए सारे नजारे ओय क्या बात
*ये रेशमी जुल्फे ये शरबती आंखे
*खिजाके फूलपे आती कभी बहार नहीं
*राम और श्याम*
*बालम तेरे प्यारकी ठंडी आगमे जलते जलते....
*जिगरी दोस्त*
*रात सुहानी जाग रही है धीरे धीरे
*तेरै दिलमें क्या है
*फूल है बहारोंका
*दो रास्ते*
*खिजाके फूलपे आती कभी बहार नहीं
*छुप गए सारे नजारे
*ये रेशमी जुल्फे ये शरबती आंखे
*बंधन*
*आना है तो आओ बुलाएंगे नहीं
*बिना बदरा के बिजुरा कैसे चमके
*सच्चा झूठा*
*हो कहदो कहदो तुम भी कहदो
*यूं ही तुम मुझसे बात करती हो
*खिलौना*
*खुश रहे तू सदा ये दुवा है मेरी
*अगर दिलबरकी रुसवाई हमें मंजूर हो जाए
*खिलौना जानकर तुम तो
*मेला*
*गोरीके हाथमें जैसे ये छल्ला
*रुत है मिलनकी साथी मेरे आरे
*उपासना*
*आओ तुम्हे मैं प्यार सिखादूं
*दर्पन को देखा तुने जब जब कियासिंगार
*तेरै मेरे सपने*
*ए मैंरे कसम ली
*जीवनकी बगिया महकेगी
*हरे राम हरे कृष्ण*
*कांची रे कांची रे ^प्रीत मेरी सांची
*रुप तेरा मस्ताना*
*दिलकी बाते दिलही जाने
*बडे बेवफा है ये इश्कवाले
*दुश्मन*
*दुश्मन दुश्मन दोसतोंसे प्यारा है
*बलमा सिपैया हाय रे तेरी दंबूक से डर लागे
*देखो देखो देखो बाईस्कोप देखो
*अपराध*
*तुम मिले प्यारसे मुझे जीना गंवारा हुआ
*हमारे सिवा तुम्हारे और कितने दिवानेहै
*झील के उस पार*
*चल चले ऐ दिल कर किसिका इंतजार
*क्या नजारे क्या सितारे सबको है इंतजार
*अपना देश*
*दुनियामें लोगोंको धोखा कभी हो जा है
*कजरा लगाके गजरा सजाके
*लोफर*
*आज मौसम बडा बेईमान है
*कोई सहरी बाबू दिल लहरी बाबू
*मैं तेरे इश्कमें मर ना जाऊ कहीं
*आपकी कसम*
*सुनो कहो कहा सुना कुछ हुआ क्या
*करवटे बदलते रहे सारी रात हम
*जिंदगी के सफरमें गुजर जाते है
*प्रेमकहानी*
*चल दरियामें डूब जाए
*फूल आहिस्ता फेंको फूल बडे नाजूक होते हैं
© कृपा देशपांडे...
Comments
Post a Comment