Skip to main content

Sharmila Tagore***

एका वसतिगृहात वृध्द पुष्पा मोठाली भांडी घासतेय. वसतीगृहाचा नोकर तिला भांडी नीट न घासण्यावरुन तसेच तिच्या पूर्वायुष्यावरुन वाट्टेल ते बोलतोय. ते सहन न होऊन जवळ उभे असलेले आनंदबाबू त्याची गचांडी धरुन त्याला संतापाने बोलतात. नोकर आणि इतरांना निरुत्तर करुन त्यांच्या बरोबर आलेल्या नंदूला म्हणतात, हीच योग्य वेळ आहे या माऊलीच्या ममतेच्या कर्जातून मुक्त व्हायची. आज दुर्गाष्टमी आहे. हिला तू सन्मानाने आपल्या घरी घेऊन जा! आणि नंदू जेव्हा तिला घेऊन जाण्यासाठी निघतो तेव्हा आनंबाबूंचे डोळे भरुन येतात, तेव्हा ते म्हणतात ,"मुझे मालूम नहीं था रोनेमेंभी इतना सुख मिलता है, नहीं तो मैं कभीं नही कहता रे ,"पुष्पा आय हेट टीअर्स"! *अमरप्रेम* ह्या चित्रपटातलं द्रृष्य काळीज हेलावणारं! काय अप्रतीम काम केलय यात राजेश खन्ना आणि शर्मिलाने! तुम्ही ओळखलच असेल आजची कलाकार आहे द एव्हर स्मायलिंग विथ क्यूट डिंपल्स,द स्टाईलिश, ग्लॅमरस,एलिगन्ट शर्मिला टागोर! शर्मिलाचा पहिला बंगाली चित्रपट "अपूर संसार" त्यासाठी प्रसिध्द चित्रपट निर्माते दिग्दर्शक "सत्यजित रे" यांना १३/१४ वर्षांच्या मुलीची गरज होती. तेव्हा "पथेर पांचाली" या चित्रपटाला राष्ट्रीय पारीतोषिक मिळाल्याने त्यांचे बंगाली चित्रपट सृष्टीत बर्यापैकी नाव झालेले. त्यांच्याकडूनच बोलावणं आलं म्हणून शर्मिलाच्या वडिलांनी लगेच हो म्हटले. त्या चित्रपटातले शर्मिलाचे काम सर्वांनी नावाजले. नंतर आणखी ३/४ बंगाली चित्रपटात काम केल्यावर पहिल्या हिंदी चित्रपटासाठी शक्ती सामंता ह्यांनी संपर्क साधला. पटकथाकार सचिन भौमिक ह्यांची शर्मिलाच्या आईशी ओळख होती. त्यामुळे पटकन भेट जमून आली. *काश्मीर की कली* मधे अवघ्या १६/१७ वर्षांची नाजूक शर्मिला अगदी शब्दशः *कश्मीर की कली* शोभली. हिंदीची सवय नव्हती त्यामुळे तिचे संवाद छोटे छोटे लिहिण्यात आले. यातील एक मजेशीर आठवण नेहमी सांगण्यात येते. शशीकपूर शर्मिलाचे फेव्हरीट.. आणि "इशारो इशारोमें दिल लेनेवाले" ह्या गाण्याचे शूटींग चालू असताना अचानक लोकेशनवर शशी कपूरना पाहून ती अचंबित झाली. तिला गाण्याचे लिप्सींग जमेना. रिटेक वर रिटेक झाल्यावर शक्तीजी शशीजींना म्हणाले, तू इथून जा बाबा! नाहीतर माझी हिरोईन असेच रिटेक देत राहील. त्यानंतर आला बी आर चोप्रांचा मल्टी स्टारर *वक्त* रोल लहान असला तरी मोठ्या बॅनरचा चित्रपट आणि फेवरीट शशीजीं बरोबर काम करायची संधी मिळाली. ह्रषिकेश मुखर्जींचा नितांत सुंदर चित्रपट * अनुपमा*! मुलीच्या जन्माच्या वेळीच प्रिय पत्नीचा मृत्यू यामुळे लहान पणापासूनच वडिलांनी न स्विकारल्याने आपल्याच कोशात रहाणारी, कायम लोकांपासून दूर दूर असणारी अबोल अनुपमा शर्मिलानी खूप छान उभी केली. अगदी त्याउलट *अॅन इव्हिनींग इन पॅरीस* मध्ये आधुनिक वातावरणत वाढलेली श्रीमंत मुलगी! या चित्रपटात बिकिनी ग्रेसफुली कॅरी करणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री! अर्थात ते गाणं शर्मिला समुद्रात स्कीईंग करतेय आणि शम्मीजी हेली कॉप्टर ला लटकून गाणे म्हणतात अशी सिच्यूएशन आहे.त्या गाण्यात लाडीकपणे "जा जा जा"..हे ही शर्मिलानेच म्हटलयं! *अनुपमा* आणि *देवर* दोन्हीत नायक धर्मेंद्र! नंतर मनोजकुमार बरोबर चा *सावनकी घटा*! शर्मिलाचे एकाचवेळी हिंदी बरोबरचं बंगाली चित्रपटातही काम चालू होते. त्यामुळे बंगाली *नायक* चित्रपटासह विश्वजीत बरोबर *ये रात फिर न आएगी*, शशी कपूर बरोबर *आमने सामने* जाॅय मुखर्जी सह *हमसाया, धर्मेंद्र बरोबर *यकीन* आणि *सत्यकाम* हे चित्रपट त्याच सुमारास प्रदर्शित झाले. १९६९ साली आलेला शक्ती सामंतांचा *आराधना* हा शर्मिलाच्या काही अत्युत्तम चित्रपटांपैकी एक! तिला तरुणी ते वृध्द आई असा प्रवास दाखवायचा होता. ह्यात शर्मिलाने ऐन तारुण्यात पहिल्यादा केसाला पांढरा रंग लावला. ते सुध्दा मनात मसताना, शक्तीदांच्या सांगण्यावरुन! प्रिमियर शो! शक्ती सामंता प्रतिक्रिया बघण्यासाठी प्रेक्षकांमधे बसलेले! चित्रपट सुरु होतो आणि जेलमधे पांढर्या केसाची शर्मिला बघून प्रेक्षकांना क्षणभर हसू फुटते. हे बघून शक्ती सामंता अस्वस्थ होऊन लगेचच उठून गेले. त्यांना वाटलं शर्मिलाला म्हातारी दाखवलेलं प्रेक्षकांनी काही स्विकारलं नाही. चित्रपट बहुतेक फेल जाणार! पण तो एक ते दीड मिनिटांचा मदनजीं बरोबरचा सीन संपताच थिएटर मधे लोकं मुसमुसू लागले. एक माणूस पळत पळत शक्तीदांना बोलवायला गेला. शक्तीदांनी सुटकेचा निःश्वास टाकला आणि रेस्ट इज द हिस्ट्री! आराधना सुपरहीट झाला. त्याच वर्षी *सफर* *सुहाना सफर* आणी *मेरे हमसफर हे चित्रपट आले. नायक वेगवेगळे असले तरी नायिका एकच! यात सगळ्यात बेस्ट *सफर* कथा, संगीत, अभिनय सर्वच अंगाने लाजवाब! शर्मिला आधुनिक वेषभूषा, भूमिका यापेक्षा साध्या वेषात अधिक खुलून दिसते हे माझे प्रांजळ मत आहे. याच वर्षी सुनिल दत्त बरोबरचा *प्यासी शाम* आणि शशीजीं बरोबरचा *माय लव्ह*पण प्रदर्शित झाले.१९७१ ते १९७५ मध्ये अनेक उत्तम चित्रपट आले त्यापैकी शक्तीदांचा *अमरप्रेम* ,यश चोप्रांचा *दाग* गुलजार यांचा *मौसम* अगदी उल्लेखनीय! अमरप्रेम," मधील, "पुष्पा आय हेट टीअर्स" हे वाक्य तर खूपच गाजलं! *दाग* मध्या राजेश खन्ना आणि राखीने तोडीस तोड अभिनय केला आहे. शिवाय संजीवकुमार बरोबरचा *चरीत्रहीन* पण ह्याच काळातला! बाशू भट्टाचार्य यांचा *आविष्कार* एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट! अमर मानसीची गोष्ट! शहरी वातावरणात रहाणार्या नवरा बायकोच्या नात्यातल्या ताणतणावावर आधारीत सुंदर चित्रपट! त्या नंतर ४ वर्षांनी आला *आविष्कार* चा पुढील भाग असलेला चित्रपट *गृहप्रवेश* "आविष्कार" मधे राजेश खन्ना आहे तर यात संजीव कुमार! नवर्याच्या जीवनात जेव्हा दुसरी तरुण स्री येते आणि बायकोकडे मला तू आता आवडत नाहीस म्हणून तो घटस्फोट मागतो तेव्हा ती बायको चतुराईने कसा हा पेच सोडवते त्याचं अतिशय सुंदर चित्रण यात आहे. शर्मिला संजीव कुमार, सारीका यांनी त्या भूमिका अतिशय सुरेखरित्या साकारल्यात! अशा भूमिका म्हणजे शर्मिलाचा हातखंडा! यानंतर गुलजार यांचाच *मौसम* म्हणजे अभिनयाची अजून वरची उंची! संजीवकुमारची प्रेयसी आणि मुलगी अशी दुहेरी भूमिका! ती मुलगी दुर्दैवाने नको त्या जागी पोचते. संजीवकुमार जेव्हा मुलीला शोधत शोधत त्या वस्तीत येतो तेव्हा कस्टमर समजून शर्मिला ज्या पध्दतीने तोंडात विडी ठेऊन त्याच्याशी बोलते , अक्षरशः काटा येतो अंगावर! शर्मिलाची दोन परस्पर भिन्न रुपे! या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याच मागोमाग काका बरोबरचे *छोटी बहू* आणि *राजा रानी*, दिलिप कुमार बरोबर *दास्तान* देवआनंद बरोबर *ये गुलिस्ता हमारा*, आणि शशीजीं बरोबर *आ गले लग जा* हे चित्रपटही याच काळात प्रदर्शित झाले आणि चांगले चालले."मौसम"च्या नंतर अगदी वेगळा हलका फुलका विनोदी ढंगाचा टिपिकल ह्रषिदा टच असलेला *चुपकेचुपके* धर्मेंद्र, अमिताभ, जया, ओमप्रकाश, उषा किरण, असराणी अशी तगडी स्टार कास्ट! सचिनदांचे चित्रपटाला साजेसे संगीत!मस्त भट्टी जमलेली! त्यानंतर अमिताभ बरोबरचा सस्पेंस थ्रीलर *फरार* आणि पुन्हा मल्टी स्टारर *एक महल हो सपनोंका* याच्या बरोबरचा अजून एक बंगाली आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत बनलेला सुंदर चित्रपट *अमानुष*! जोडीला बंगाली सुपरस्टार उत्तम कुमार! अशा साध्या सरळ मेलोड्रामा नसलेल्या चित्रपटात शर्मिलाचा अभिनय खुलतो. तिचा चेहेरा विलक्षण बोलतो. तिचे सर्व हावभाव, थरथरणारी बोटे, डोळ्यातील भाव केवळ अप्रतीम! ह्या नंतर ती फक्त नायिका म्हणून फार कमी दिसली. तीचे २/३ चित्रपट खूपचं छान होते! के भीमसेन यांचा *दूरिया* गुलजार यांचा *नमकीन* आणि रमेश शर्मा यांचा *न्यू देल्ही टाईम्स* ! मीरा नायर च्या *मिसिसिपी मसाला* मधेही तिने छोटासा रोल केलाय! गुलजार यांचा *खूशबू* हा एक शर्मिला पाहुणी कला कार असलेला चित्रपट! बालविवाहाची शिकार असलेली "लाखी" जिच्याशी जितेंद्र लग्न करतो. एका मुलाला जन्म देउन ती मरते. जीवनाप्रती अजिबात आस्था नसलेली "लाखी" शर्मिलाने अप्रतीम रंगवली आहे. शर्मिलाने आयुष्यात सर्व काही कमविले. पैसा, प्रसिध्दी, राजघराण्यात प्रसिध्द क्रिकेटर मन्सूर अली खान बरोबर लग्न, मानसन्मान! एकदा फिल्मफेअर, दोनदा राष्ट्रीय पुरस्कार, लाइफ टाईम अचिव्हमेंट , पद्मभूषण, सेंसर बोर्ड ची अध्यक्षा! २००५ मधे तिची "Unicef Good Will Ambassador" म्हणून निवड झाली.सुरीवातीपासूनच आणि आताही ती एक समृध्द समाधानी जीवन जगत आहे आणि आज त्र्याहत्तराव्या वर्षीही तितकीच गोड आणि ग्रेसफूल आहे. शर्मिलाच्या चित्रपटातील काही सुंदर गाणी आणि चित्रपट. *कश्मीर की कली* *दीवाना हुआ बादल सावनकी घटा छाई *इशारो इशारोमें दिल लेनेवाले *ये चांचसा रौशन चेहेरा *सुभानअल्ला है हंसी चेहेरा है *वक्त * दिन है बहारके तेरे मेरे इकरारके *अनुपमा* *कुछ दिलने कहा कुछ भी नहीं *भीगी भीगी फजां सन सन सनके जिया *क्यूं मुझे इतनी खुशी दे दी के घबराता है दिल *या दिलकी सुनो दुनियावालो *सावनकी घटा* *हौले हौले साजना धीरे धीरे बालमा *जुल्फोंको हटा दो चेहेरेसे *मेरी जान तुमपे सदके *ये रात फिर ना आऐगी* *यहीं वो जगह है यही वो फिजाये *मैं शायद तुम्हार लिये अजनबी हूं *हर टुकडा मेरे दिलका देता है दुहाई *अॅन इव्हिनिंग इन पॅरीस* *आसमानसे आया फरिश्ता *रातके हमसफर थकके घरको चले *दीवानेका नाम तो पूछो *वो हंसके मिले हमसे *आमने सामने* *कभी रात दिन हम दूर थे *नैन मिलाकर चैन चुराना *मेरे हमदम मेरे दोस्त* *चलो सजना जहांतक घटा चले *छलकाए जाम *अल्ला ये अदा कैसी है *यकीन* *गर तुम भुला न दोगे *यकीन करलो मुझे मुहब्बत है तुमसे *तलाश* *आजको जुनली रातमां *कितनी अकेली कितनी तनहासी लगी *आराधना* *कोरा कागज था ये मन मेरा *गुनगुना रहे हैं भंवरे *रुप तेरा मस्ताना *मेरे सपनोंकी रानी *मेरे हमसफर* *किसी राहमें किसी मोडपर *मेरा परदेसी ना आया *सफर* *हम थे जिनके सहारे *जीवनसे भरी तेरी आंखे *जिंदगी का सफर है ये कैसा सफर *अमरप्रेम* *रैना बिती जाए शाम ना आए *चिंगारी कोई भडके *चंदा है तू मेरा सूरज है तू *ये क्या हुआ कैसे हुआ *ये गुलिस्तां हमारा* *गोरी गोरी गांवकी गोरी रे *दाग* *अब चाहे मां रुठे या बाबा *हम और तुम तुम और हम *मेरे दिलमें आज क्या है *आ गले लग जा *चरीत्रहीन* .*दिलसे दिल मिलनेका कोई कारण होगा *तेरी मेरी यारी बडी पुरानी *मौसम* *रुके रुके से कदम रुकके बार बार चले *छडी रे छडी कैसे गलेमें पडी *आ गले लग जा* *ना कोई दिलमें समाया ना कोई पहलूमें आया *तेरा मुझसेहै पहलेका नाता कोई *वादा करो नही छोडोगी तुम मेरा साथ *चुपक चुपके* *अबके सजन सावनमें *बागोमें कैसे ये फूल खिलते हैं ' *फरार* *मैं प्यासा तुम सावन मैं दिल तुम मेरी धडकन *अमानुष* *दिल ऐसा किसीने मेरा तोडा *कलके अपने ना जाने क्यूं हो गए आज पराए *दूरियां* जिंदगी मेरे घर आना जिंदगी © कृपा देशपांडे.

Comments