Skip to main content

Posts

Showing posts from July, 2018

शम्मी कपूर...

याssssssहू...अशी आरोळी ऐकली की तारुण्य आणि उत्साहानं सळसळणारं एकच व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येतं ते.. म्हणजे "समशेर राज कपूर" म्हणजेच शम्मी कपूर! वडील the great पृथ्वीराज कपूर आणि मोठे बंधू राज कपूर असा संपन्न अभिनयाचा वारसा असलेले! कपूर खानदानात त्यांचा जन्म झाला. जन्म मुंबईत झाला तरी बालपण पेशावर येथे गेले. पुन्हा मुंबईला आल्यावर Saint Joseph, Don Bosco आणि New Era या शाळांमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर राम नारायण रुईया महाविद्यालयात "शास्त्र" शाखेत प्रवेश घेतला. त्यांना Aeronautical Engineer व्हायची इच्छा होती. पण कॉलेज मध्ये ते काही रमले नाहीत आणि दोन वर्षानी कॉलेज सोडून वडीलांच्या पृथ्वी थिएटर मधे महिना रुपये ५० वर काम करू लागले. १९५० च्या दशकात चित्रपटात छोटी मोठी कामे करता करता १९५३ मध्ये महेश कौल यांनी स्वतंत्रपणे *जीवन ज्योती* ह्या चित्रपटात काम दिले त्यात नायिका होती "चांद उस्मानी"! त्यानंतर पाच वर्षांत बरेच चित्रपट आले त्यापैकी काही.. *रेल का डिब्बा* आणि *नकाब* (मधुबाला) *लैला मजनू* (नूतन) *ठोकर* (शामा) *हम सब चोर है* (नलिनी जयवंत) *शमा ...

जाॅनीवाॅकर...

*चाहे कोई खुश हो चाहे गालिया हजार दो,मस्तराम बनके जिंदगीके दिन गुजार दो" ! टॅक्सी ड्रायव्हर" चित्रपटातले हे धम्माल गाणं सर्वांना आठवतच असेल."पण त्यातल्या "मस्तराम बनके जिंदगीके दिन गुजारदो" ही ओळ एका वेगळ्या टोन आणि पिच मधे म्हटलेले किशोरदां बरोबरचे सह गायक म्हणजे "मोस्ट लव्हेबल पर्सन" ज्यांच्यावर आपण भरभरुन प्रेम केलं, ते आपले जॉनी वॉकर! सडपातळ बांधा, मिश्कील चेहेरा, किनरा आवाज! पण अभिनयाची उंची अशी गाठली की बस्स! जॉनीभाईंचे मूळ नांव बद्रुद्दिन जमाल उद्दिन काझी. ते मूळचे इंदूरचे. त्यांचे वडील कपड्याच्या मिल मधे कामगार होते. एकूण पंधरा माणसांचे कुटुंब होते. काही कारणानी मिल बंद पडली आणि खूप हाल होऊ लागले. म्हणून ते सर्वजण मुंबईला आले. बिकट परिस्थिती मुळे जॉनीभाईना सहावीत शाळा सोडावी लागली. उदरनिर्वाहासाठी ते कधी कधी भाजी,फळं, कधी आईस्क्रीम तर कधी स्टेशनरी विकून विकून पैसे मिळवत. त्यांची परिस्थिती इतकी वाईट होती की त्यांच्या पाच भावंडांचा कुपोषणाने मृत्यू झाला. सरतेशेवटी जॉनी भाईना BEST मध्ये कंडक्टर ची नोकरी मिळाली. तसं तर पूर्वी कंडक्टरची न...

प्राण...

"इस इलाकेमें नए आए हो बरखुरदार, वर्ना शेरखानको कौन नहीं जानता" किंवा "दोस्तो दुनियामें दो तरहके जहर होते है मगर इन सबमें सबसे खतरनाक जहर है शराब" किंवा "शेर और बकरी जिस घाट पर एक साथ पानी पीते हैं वो घाट हमने देखाही नहीं!" असे कित्येक संवाद ज्या विशिष्ट,दमदार आवाजात आपण ऐकले आहेत तो होता आपल्या आवडत्या प्राणसाहेबांचा! प्राण सिकंद यांचा जन्म १९२० साली दिल्लीभधे एका श्रीमंत पंजाबी कुटुंबात झाला. मॅट्रीक झाल्यानंतर एका स्टुडियो मधे फोटोग्राफर ची नोकरी करु लागले. साधारण २०/२१ वय असेल त्यांचं! त्या स्टुडियोच्या जवळ एक पानाची टपरी होती. एकदिवस पान घ्यायला आले असताना त्यांनी पाहीलं कि एक माणूस अगदी रोखून बघतोय. ते कथालेखक "वली महंमद" होते. प्रसिध्द "पांचोली आर्ट पिक्चर्स" च्या दलसुख पांचोलींना खलनायका च्या भूमिकेसाठी नव्या चेहेर्याची गरज होती. आणी त्यासाठी प्राणसाहेबांना विचारले होते. तो त्यांचा पहिला चित्रपट होता "यमला जाट"! त्याकाळी "लाहोर" ही चित्रपट निर्मिती साठी प्रसिध्द होते. *यमला जाट* मधे खलनायक साकारल्या नंतर*खान...

जानी...राजकुमार...

मूडी , सणकी, घमेंडी, फटकळ अशी शेलकी विशेषणं ज्याला तंतोतंत लागू होतात पण भारदस्त आवाज, विशिष्ट प्रकारची संवाद फेक, बोलायचा खास अंदाज,हजर जबाबी असेही ज्याच्या बद्दल बोलले जाते असं अजब रसायन म्हणजे कुलभूषण पंडीत उर्फ राजकुमार! The most stylish person ! नाव राजकुमार पण जेवढे काळ चित्रपट सृष्टीत होता एखाद्या बादशहाप्रमाणे वावरला. राजकुमारचा जन्म बलुचिस्तान प्रांतातला. साधारण ४० च्या दशकात मुंबईत येऊन मुंबई पोलिसात नोकरी पत्करली. ६ फूट उंची, देखणा रुबाबदार चेहेरा, भारदस्त बोलणे त्यामुळे त्यांची समोरच्यावर छाप पडे. राजकुमारना खरं तर पिक्चरचा शौकही नव्हता आणि त्यांनी एकही चित्रपट पाहिला नव्हता. पण त्यांच्या मित्रांनाही वाटत होतं, कि त्यांनी फिल्मइंडस्ट्री जॉइन करावी म्हणून मित्रांपैकी एकाने त्यांचे काही निवडक फोटो एका चित्रपट निर्मात्याला पाठवले. तसेच ते ज्या माहीम पोलीस स्टेशनला होते तिथे फिल्मी लोकांची बरीच ये जा होती. निर्माते बलदेव दुबे ह्यांनी राजकुमारना पहिली ऑफर दिली. १९५२ साली आलेला "रंगीली" हा त्यांचा पहिला चित्रपट! नायिका होती रेहाना! त्यानंतर आलेले *घमंडी*, *आबशर*, *...