एका वसतिगृहात वृध्द पुष्पा मोठाली भांडी घासतेय. वसतीगृहाचा नोकर तिला भांडी नीट न घासण्यावरुन तसेच तिच्या पूर्वायुष्यावरुन वाट्टेल ते बोलतोय. ते सहन न होऊन जवळ उभे असलेले आनंदबाबू त्याची गचांडी धरुन त्याला संतापाने बोलतात. नोकर आणि इतरांना निरुत्तर करुन त्यांच्या बरोबर आलेल्या नंदूला म्हणतात, हीच योग्य वेळ आहे या माऊलीच्या ममतेच्या कर्जातून मुक्त व्हायची. आज दुर्गाष्टमी आहे. हिला तू सन्मानाने आपल्या घरी घेऊन जा! आणि नंदू जेव्हा तिला घेऊन जाण्यासाठी निघतो तेव्हा आनंबाबूंचे डोळे भरुन येतात, तेव्हा ते म्हणतात ,"मुझे मालूम नहीं था रोनेमेंभी इतना सुख मिलता है, नहीं तो मैं कभीं नही कहता ,"पुष्पा आय हेट टीअर्स"! *अमरप्रेम* ह्या चित्रपटातलं द्रृष्य काळीज हेलावणारं! काय अप्रतीम काम केलय यात राजेश खन्ना आणि शर्मिलाने! तुम्ही ओळखलच असेल आजची कलाकार आहे द एव्हर स्मायलिंग विथ क्यूट डिंपल्स,द स्टाईलिश, ग्लॅमरस,एलिगन्ट शर्मिला टागोर! शर्मिलाचा पहिला बंगाली चित्रपट "अपूर संसार" त्यासाठी प्रसिध्द चित्रपट निर्माते दिग्दर्शक "सत्यजित रे" यांना १३/१४ वर्षांच्या मुलीच...
continued.... एल व्ही प्रसाद यांच्या *शारदा* ह्या चित्रपटात अपघात होऊन बेपत्ता झालेला नायक शेवटी मृत झाल्याचे कळल्याने नायिकेचे( मीनाकुमारी) तिच्या प्रियकराच्या (राजकपूर) वडिलां बरोबर लग्न होते. फारच वेगळ्या नाविन्यपूर्ण कथेवर आधारीत हा चित्रपट होता. सी रामचंद्र यांचे संगीत होते. त्याच वेळेस राजजी निर्मित *अब दिल्ली दूर नहीं* हा अमर कुमार दिग्दर्शित चित्रपट आला. शंकर जयकिशनजींचे सहाय्यक, अरेंजर दत्ताराम वाडकर यांना राजजींनी पहिल्यांदाच स्वतंत्र संगित दिग्दर्शनाची संधी दिली आणि दत्तारामजींनी एकसे एक गाणी देउन ह्या संधीचे सोने केले. १९५८ साली "माणसाने जन्म कुठे घेतला ते महत्वाचे नसते तर त्याच्यावरचे संस्कार महत्वाचे असतात हा संदेश देणारा" एस बॅनर्जींचे दिग्दर्शन असलेला *परवरीश* हा चित्रपट आला.सोबत मालासिन्हा आणि मेहेमूद यांच्या मस्त भूमिका आहेत. तसेच त्याच वर्षी रमेश सहगल यांची निर्मिती दिग्दर्शन असलेला *फिर सुबह होगी* हा Fyodor Dostoevsky यांच्या Crime & Punish ment या कादंबरीवर आधारीत होता. कायद्याचा अभ्यास करणार्या निराधार, होतकरु तरुणाच्या...