आजचे आहेत रवीप्रसाद शर्मा म्हणजे रवीजी! आतापर्यंतच्या सगळ्या संगीत कारांबद्दल काहीतरी ऐकलसंगीतकार होतं. त्यांची विशेष शैली! काहीवर लोकससंगीताचा प्रभाव, काहींचा भला मोठा वाद्यवृंद असण्याचा आग्रह, काहींचा गजल या काव्यप्रकाराविषयी प्रेम, काहींचे विशिष्ट स्वभाव! पण रवीजींबद्दल तशी फारशी माहिती नव्हती. काही controversy ना काही वादविवाद किंवा अमूक एक व्यक्तीबद्दत अढी. काही मोजकीच गाणी कानावर होती त्यांची, त्यात वक्त चित्रपटातलं "ऐ मेरी जोहराजबीं आणि "आगे भी जाने ना तू वगैरे! जसजशी माहिती घेत गेले तसे खरचं खूप नव्याने उलगडले रवीजी मला!
रवीजी मूळचे दिल्लीचे. त्यांनी संगीताचे शास्त्रशुध्द शिक्षण घेतले नव्हते पण ते प्रयत्नपूर्वक हार्मोनियम आणि काही भारतीय वाद्य शिकले. वडील भजने गात असत. तेही लक्षपूर्वक ऐकून म्हणत. १०वी पर्यंत शिक्षण झाल्यावर सुरु वातीला 4/5 वर्ष Electrician ची नोकरी करुन कुटुंबाला हातभार लावला
पण पार्श्वगायक व्हायची इच्छा स्वस्थ बसू देईना!
एक दिवस त्यांनी तडक मुबई गाठली. कोणाचाही आधार नव्हता. सुरुवातीला धर्मशाळेत रहायचे. कधी जागा न मिळाल्यावर स्टेशनवर किंवा दुकानांची शटर बंद केलेल्या जागेत रहात असत. त्यांना पार्श्वगायकच व्हायचे होते पण स्वतंत्र पार्श्वगायनाची संधी मिळालीच नाही पण सचिनदांनी कोरस मधे गायची संधी दिली. त्पानंतर हेमंतदांनी "आनंदमठ" चित्रपटात वंदे मातरम या गाण्यात संधी दिली.
त्यांनी स्वतंत्रपणे संगीतबध्द केलेला पहिला चित्रपट होता "वचन"....ज्यात रफीजी गायले आहेत.. "एक पैसा दे दे ओ बाबू"! रफीजींबद्दल त्यांना अतीव प्रेम आणि दर.रफीजींना"भारतरत्न"मिळावे अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती. एक छोटिशी आठवण! दिल्लीत १९४७ साली स्वातंत्र्य सोहळ्यासाठी रफीजी आले असताना रवीजीनी त्यांना भेटून, मुंबईत येऊन संगीत क्षेत्रात करीयर बनविण्या विषयी सल्ला मागितला. रफीजींनी पण त्यांना काही टीप्स दिल्या. रफीजींना काय माहीत होतं कि याच माणसाच्या संगीत दिग्दर्शनाखाली काही वर्षांनी आपण गाणार आहोत.
रवीजींनी त्यांच्या संगीतात पाश्च्यात्य वाद्यांपेक्षा भारतीय वाद्यांवर भर दिला. त्यांचे लताजींचे *लागे ना मोरा जिया सजना नहीं आए हाए*, आशाजींचे *तोरा मन दर्पण कहलाए*, रफींजींचे *सौ बार जनम लेंगे* आणि महेंद्रजींचे *किसी पत्थरकी मूरत से मुहब्बत का इरादा है*....किती अप्रतिम गाणी! रवीजींची काही गाणी लग्नात अगदी वाजवलीच जातात. *बाबुलकी दूवाए लेती जा* किंवा *आज मेरे यार की शादी है*
साधारण १९७०/७२ पर्यंत हिंदीत काम केल्यावर रवीजींनी थोडा ब्रेक घेतला. पण ८० च्या दशकात रवीजी पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी जवळजवळ १७ मल्याळी चित्रपटांना "बॉम्बे रवी" या नावाने संगीत दिले. त्यांच्या अगदी शेवटच्या हिंदी चित्रपटांमधे उल्लेखनीय होते "एक महल हो सपनोंका", "धुंद", "बाबुल की गलिया" आणि "निकाह"! निकाह या चित्रपटातील "दिलके अरमां आंसूओमें बह गए" या गाण्याला सलमा आगा हिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचे Film fare Award मिळाले. रवीजींना सुध्दा "घराना" आणि "खानदान ह्या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचे Filmfare award मिळाले होते.
१९९७ मध्ये रवीजींचे ऑपरेशन झालेले. त्यांना पक्षाघाताचा झटका आल्यामुळे घशावर परीणाम झालेला. पण त्यातूनही ते बरे झाले. अशा या साध्या, सरळ,गुणी संगीतकाराचे ८६ व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.
रवीजींना त्यांच्याच एका सुंदर गीताने आदरांजली!
*संसार की हर शय का इतनाही फसाना है, इक धुंदसे आना है इक धुंद से जाना है*
रवीजींची काही गाजलेली गाणी व चित्रपट!
*घूंघट*
लागे ना मोरा जिया, सजना नहीं आए हाए
मोरी छम छम बाजे पायलिया
*घरसंसार*
ये हवा ये नदीका किनारा चांद तारोंका रंगीन इशारा
*हमराज*
ऐ नीले गगन के तले, धरती का प्यार पले
तुम अगर साथ देनेका वादा करो
*भरोसा*
वो दिल कहांसे लाऊं, तेरी याद जो भुलादे
आज की मुलाकात बस इतनी
*चौदहवी का चांद*
चौदहवी का चांद हो, या आफताब हो
मिली खाकमें मुहब्बत, जला दिलका आशियाना
*मॉडर्न गर्ल*
ये मौसम रंगीन समां ठहर जरा ओ जानेजा
*गुमराह*
इन हवाओमें इन फिजाओमें तुझको मेरा प्यार पुकारे
चलो एक बार फिरसे अजनबी बन जाए हम दोनो
*बेटी बेटे*
आज कलमें ढल गया,. दिन हुआ तमाम
गोरी चलो ना हंस की चाल जमाना दुश्मन हो
*दिल्ली का ठग*
ये राते ये मौसम नदीका किनारा
CAT कॅट माने बिल्ली
*वक्त*
ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम नहीं
आगे भी जानेना तू पीछे भी जानेना तू
*दो बदन*
जब चली ठंडी हवा जब उठी काली घटा
रहा गर्दिशोमें हरदम मेरे इश्कका
*काजल*
छू लेने दो नाजुक होठोंको कुछ और नहीं है जाम है ये
तोरा मन दर्पण कहलाए
*गहरा दाग*
आज उडता हुआ एक पंछी जिंदगीकी बहारमें आया
तुम्हे पाके हमने जहां पा लिया है
*खानदान*
तुम्ही मेरे मंदीर तुम्ही मेरी पूजा
नील गगन पर उडते बादल आ आ आ
*आज और कल*
ये वादियां ये फिजाए बुला रहीं है तुम्हे
मुझे गलेसे लगालो बहुत उदास हूं मैं
*Tower House*
ऐ मेरे दिले नादान तू गमसे ना घबराना
*आंखे*
मिलती है जिंदगीमें मुहब्बत कभी कभी
गैरोंपे करम अपनोंपे सितम
*दो कलिया*
तुम्हारी नजर क्यूं खफा हो गई
बच्चे मनके सच्चे सारी जगके आंखके तारे
*डोली*
सजना साथ निभाना साथी मेरे बहारोंके राहमें छोड न जाना
*आदमी और ईन्सान*
ओ नीले परबतोंकी धारा आई ढूंढने किनारा
जिंदगीके रंग कई रे साथी रे
*नीलकमल*
बाबूल की दुवाए लेती जा
तुझको पुकारे मेरा प्यार
© कृपा देशपांडे..
.
Comments
Post a Comment