Skip to main content

हेमंत कुमार...

हेमंतकुमार मुखोपाध्याय..एक धीरगंभीर, शांत, ॠषीतुल्य व्यक्तीमत्व! तसाच आवाज! हेमंतदा हे उत्तम गायक,संगीतकार तसचं चित्रपट निर्माते म्हणूनही प्रसिध्द आहेत. गीतांजली प्राॅडक्शन्स ह्या बॅनरखाली बिस साल बाद, राहगीर, खामोशी, कोहरा, फरार, इ. चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. हेमंतदांनी अनेक चित्रपटांना दर्जेदार संगीत दिले. त्यांचा पहिला चित्रपट होता फिल्मिस्तान" चा "आनंदमठ". याशिवाय आणखी काही चित्रपट आहेत..... बिस साल बाद, नागिन, कोहरा,राहगिर अनुपमा, मंझली दीदी, साहब बीबी और गुलाम, पतिता, दो दुनी चार, बात एक रातकी, अनारकली, हाऊस नं.44, खामोशी,शर्त,एक झलक,एक हीरास्ता,दुर्गेशनंदिनी,चंपाकली,अनुपमा,कोहरा,मिस मेरी,बिन बादल बरसात हेमंतदांच्या स्वतःच्या आवाजातली त्यांची काही मशहूर गीतं.... *ये रात ये चांदनी फिर कहा *राह बनी खुद मंजिल *न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने *तुम्हे याद होगा कभी हम मिले थे *बेकरार करके हमे यूं न जाईये *याद किया दिलने कहां हो तुम *तुम पुकारलो तुम्हारा इंतजार है *ये नयन डरे डरे ये जाम भरे भरे *है अपना दिल तो आवारा *या दिलकी सुनो दुनियावालो *तेरी दुनियामें जीनेसे *ऐ दिल अब कहीं न जा तर त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली इतरांनी गायलेली काही सुप्रसिध्द गीते.. *भंवरा बडा नादान है *पिया ऐसो जियामें समाही गयो रे *साकिया आज मुझे नींद नहीं आएगी *हमने देखी है उन आंखोंकी *कुछ दिलने कहा कुछ भी नहीं *वो शाम कुछ अजीब थी *ये जिंदगी उसीकी हैं *जादूगर सैंया छोडो मोरी बैंया *धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार *झूम झूम ढलती रात *कोई दूरसे आवाज दे चले आओ काही युगुलगीते... *नींद ना मुझको आए *कहा ले चले हो बता दो मुसाफिर *एक बार जरा फिर कहो *तुम्हे याद होगा कभी हम मिले थे *ये हसता हुआ कारवा" *जाग दर्द इश्क जाग *छुपा लो युं दिल में प्यार तेरा *वृंदावन का कृष्ण कन्हैय्या *याद किया दिल ने कहां हो तुम *लहरोंपे लहर उल्फत है जवां *देखो वो चांद छुप के करता है "अरी छोड दे सजनिया,छोड दे पतंग *नैन सो नैन नाही मिलाओ हेमंतदांनी ह्रदयनाथ मंगेशकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली म्हटलेले"गोमू संगतीन माज्या तू येशील कां" हे गीत पण खूप प्रसिध्द झाले. हेमंतदांना *पद्मश्री* व *पद्मभूषण* पुरस्कार जाहीर झालेले पण त्यांनी ते नम्रपणे नाकारले. त्यांच्या सांगितीक वाटचालीला ५० वर्षे पूर्ण झाल्यावर कलकत्त्याच्या नेताजी स्टेडियममधे लता मंगेशकर यांनी त्यांचा सत्कार आयोजला होता. हेमंतदांनी आपल्या सुमधूर संगीताने आपल्याला समृध्द केले. हेमंतदा ढाका येथे एका पुरस्कार सोहोळ्याला गेले होते. तेथून परतताना त्यांना २रा ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे दुःखद निधन झाले.हेमंतदांसाठी त्यांचाच गाण्याच्या दोन ओळी... बेकरार करके हमे यूं ना जाईये आपको हमारी कसम लौट आईये!! © कृपा देशपांडे...

Comments