Skip to main content

राजेंद्र कुमार***

आज अशा Film personality वर लिहितेय कि तुम्ही मनातही आणले नसेल! हिंदी चित्रपटसृष्टीत ६० ते ७० चे दशक ज्याच्या ज्युबिली चित्रपटातांनी अक्षरशः गाजले तो ज्युबिलीकुमार अर्थात राजेंद्रकुमार! त्यांच्यावर मला कां लिहिवसं वाटलं बाकीचे "सुपरस्टार" सोडून...ते मी लेखाच्या शेवटी मी थोडक्यात लिहिलय. राजेंद्रकुमारच्या आठ सुप्रसिध्द चित्रपटातून मी त्यांना थोडफार जाणण्याचा प्रयत्न केलाय. त्यांना फिल्म इंडस्ट्रीतच करीअर करायचं होतं त्यामुळे हातातले घड्याळ विकून त्यांनी मुंबई गाठली. प्रथम एच एस रवेल यांचे असिस्टंट म्हणून काम मिळालं. रवेलजी त्यांना दरमहिना रु. १५०/- आणि आवश्यक तेथे छोट्या भूमिका पण द्यायचे...जसे चित्रपट "जोगन"...पण स्वतंत्रपणे नायक म्हणून चित्रपट मिळाला *वचन* नायिका होती गीता बाली..ह्यातलं " *चंदामामा दूरके पुए पकाए बूरके*" खूपचं प्रसिध्द बालगीत आहे. ज्या आठ चित्रपटांबद्दल मी लिहायचा प्रयत्न केलाय त्यातला पहिला आहे "मेहेबूबखान" यांचा *मदरइडिया*...ह्यात नर्गिसची मध्यवर्ती भूमिका...तिच्या एका मुलाचं काम राजेंद्र कुमारनं केलय. हा चित्रपट उत्तम दिग्दर्शन,उत्तम संगीत,उत्तम वातावरण निर्मिती आणि उत्तम अभिनय यामुळे गाजला. नर्गिस, राजकुमार, सुनिलदत्त कन्हैयालाल असे तगडे कलाकार असूनही राजेंद्रकुमारची दखल घेतली गेली.काहीउल्लेखनीय गाणी... *दुनियामें हम आए है तो जीनाही पडेगा *नगरी नगरी द्वारे द्वारे *मतवाला जिया डोले जिया दुसरा चित्रपट ...*गूंज उठी शहनाई* ,यात नायिका होती *अमिता*..यात त्यांची भूमिका होती सनई वादकाची. बिस्मिलाखानसाहेब Recording साठी येत असत तेव्हा राजेंद्रकुमार त्यांचे खूप बारकाईने निरीक्षण करायचे. तो सनई वाला अस्सल वाटावा म्हणून त्यांनी एक बासरी बनवून घेतलेली आणि घरी आरशासमोर बसून खानसाहेबांसारखं वाजविण्याचा प्रयत्न करायचे. ट्रायल नंतर भीत भीत राजेंद्रकुमार यांनी खान साहेबांना काम कसे वाटले असे विचारले तेव्हा"आप तो हमें नजरही नहीं आए! मैं तो आपमें, अपनेआपको देख रहा था!" याहून चांगली कामाची पावती आणखी कोणती असेल बरं? यातही फार सुंदर गाणी आहेत.... *जीवनमें पिया तेरा साथ रहे* *कह दो कोई ना करे यहां प्यार* *दिलका खिलौना हाए टूट गया* तिसरा चित्रपट बी आर चोप्रांचा "*कानून*"...कोर्टरुम ड्रामा! ह्यात एकही गाणे नव्हते. अशोक कुमार जज्जच्या भूमिकेत आणि राजेंद्र कुमार वकील! त्या वेळी जस्टीस छगलांची उत्सूर्त प्रति क्रिया होती कि "मेरे ४० बरसके करीयरमें मैंने ना अशोककुमारसा जज्ज देखा न राजेंद्रकुमारजैसा वकील! दुसरा अनुभव असा कि राजेंद्रकुमारना खरोखरीचा वकील समजून एक माणूस त्याच्या मुलाला सोडवण्यासाठी आर्जवं करत होता. त्याची कशीबशी समजूत घातली. चवथा..*दिल एक मंदीर*...मीनाकुमारी राजकुमार सारखे मातब्बरसहकलाकार! हा चित्रपट महिन्याभरातच पूर्ण झाला. त्यांच्या शब्दात सांगायचं तर "हम खाते पीते जागते सोते" बस दिल एक मंदीर की धुन में रहते थे! एका डॉक्टरची भूमिका अक्षरशः जगले ते! दिल एक मंदीरचे संगीत शंकर जयकिशनचे होते. काही आवडती गाणी... दिल एक मंदीर है* *याद न जाए बीते दिनोंकी* *रुक जा रात ठहर जा रे चंदा* *हम तेरे प्यारमे सारा आलम* *यहां कोई नहीं तेरा मेरे सिवा* पाचवा "मेरे मेहेबूब"...यात साधना सुरुवातीला चित्रपट करायला तयार नव्हती पण कोणीतरी सांगितलं कि ह्यांचे प्रत्येक चित्रपट सिल्वर किंवा गोल्डन जुबिली गाठतातच! तेव्हा कुठे साधना तयार झाली आणि नंतर त्यांची पक्की दोस्त बनली. ह्या चित्रपटात"अन्वरमिया" चं कॅरेक्टर इतकं हूबेहूब जमलं कि खूप जण त्यांना मुस्लीम समजू लागलेले. ह्यातली नौशादजींची गाणी म्हणजे एकाहून एक सरस! *मेरे मेहेबूब तुझे मेरे मुहब्बतकी कसम *यादमें तेरी जागजागके हम* *अल्ला बचाए नौजवानोंसे* *मेरे मेहेबूबमें क्या नहीं* त्यानंतर सहावा *संगम*..त्यातही राज कपूर वैजयंतीमाला असे तोडीस तोड सहकलाकर. एस जेंचे अप्रतीम संगीत.सुंदर छायाचित्रण..लाजवाब अभिनय! ह्यात "*दोस्त दोस्त ना रहा*...या गाण्यावरुन राजकपूर बरोबर वाद झालेला..त्यांचं म्हणणं दोस्ताने तर समजून स्वःच्या प्रेमाचा त्याग केलाय आणि स्वतःच्या प्रेयसीची पण समजूत घातली आहे. तिने तुझ्याशी लग्न पण केलय तर हे गाणं संयुक्तिक वाटतं नाही. राजकपूरने कशीबशी समजूत घालून अशा रितीने चित्रिकरण केलं कि कुठेही भूमिकेला निगेटीव्ह शेड येणार नाही तर उलट राजेंद्रकुमार बद्दल सहानुभूती वाटेल. संगम ची गाणी एकसे एक... *दोस्त दोस्त ना रहा* *ये मेरा प्रेमपत्र पढकर* *हर दिल जो प्यार करेगा* *ओ मेरे सनम ओ मेरे सनम* सातवा चित्रपट *आरजू*..साधनाच नायिका...नायक अपघातात पाय गमावलेला..नायिकेला अपंग व्यक्तींबद्दल अजिबात सहानूभूती नसते...त्या चित्रपटाची ठ्फौएक आठवण.. राजेंद्रकुमार यांना एक अपंग मुलगा पुण्याहून भेटायला आला आणि त्यांना म्हटला, माझी जगण्याची इच्छाच नष्ट झालेली पण तुमचं काम पाहिलं आणि जगण्याची उमेद जागवली. आरजूची गाणी पण एस जें ची... *अजी रुठकर अब कहां जाइयेगा* *बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है* *ऐ फूलोंकी रानी बहारोंकी मलिका* शेवटचा आहे *सूरज*..आतापर्यत राजेंद्रकुमारची इमेज रोमॅंटीक, इमोशनल हिरोची. त्यांनी आपला मित्र कृष्णमूर्ती यास सांगितले कि तुला खूप पैसे कमवायचेत कां? मला घेऊन अशी फिल्म बनव ज्यात तलवारबाजी वगैरे असेल कारण मी अशी भूमिकाच केली नाही. आणि खरचं वैजयंती माला मुमताज बरोबरचा *सूरज* जोरदार चालला. सूरजची गाणी पण चालली. *बहारों फूल बरसाओ... *इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदार* *चेहेरे पे गिरी जुल्फे कह दूं तो हटादूं मैं* राजेंद्रकुमारनी साठचे दशक अक्षरशः गाजवले. त्याचे २८ चित्रपट रिलिज झाले. दरवर्षी १ चित्रपट असायचाच. १९६१, १९६३ आणि १९६६ मध्ये तर दोन दोन चित्रपट block buster ठरले. त्यांचे काही आणखी चित्रपट....आई मिलनकी बेला...झुक गया आसमां, धूल का फूल, आंस का पंछी, ससुराल, धरती, साथी, गंवार, तलाश, गीत, आप आये बहार आयी, घराना, मेरा नाम जोकर आणि कितीतरी.... इतकी लोकप्रियता प्रसिध्दी मिळूनही हा माणूस हुरळून गेला नाही. शेवटी शेवटी थोड्याशा चरीत्र भूमिका केल्या त्यात *दो जासूस* *मेरा नाम जोकर* *साजन बिना सुहागन* वगैरे...त्यांनी मुलगा कुमार गौरव साठी ४/५ चित्रपट निर्माण केले त्यातले *लव्हस्टोरी* *नाम* हीट झाले. शिवाय टेलिव्हिजन साठी "जंगलबुक" ची निर्मिती केली. १९६९ साली त्यांना"पद्मश्री"सन्मान मिळाला. १९९० नंतर त्यांनी बाहेर जाणेयेणे कमी केले. जवळच्या मित्रांनाही ते फारसे भेटत नसत. ते लंडनला वारंवार जाऊ लागले कारण त्यांना तिथे कोणीही ओळखणारे नव्हते. मुलीला भेटण्या बरोबरच त्यांची कॅन्सर ट्रीटमेंटही चालू होती. सरतेशेवटी जुलै १९९९ ला त्यांचे दुःखद निधन झाले. डिंपल पटेल या त्यांच्या लहान मुलीने एकदा भारतात आल्यावर रिषीकपूरच्या घरी प्रसिध्द सिनेपत्रकार भावना सोमैया ह्यांना तिने काहिशी खंत व्यक्त करीत प्रश्न केला, तुम्ही पत्रकार हिंदी सिनेमा चा विषय निघाला कि दिलिपकुमार वरुन सरळ अमिताभ बच्चनवर येता. यांच्या मधे कोणीच नाही कां? इतके सारे सुपर हीट चित्रपट माझ्या वडिलांनी दिले त्यांचे या इंडस्ट्रीत काहीच contribution नाही कां? भावना सोमैया म्हणतात, हे खरे आहे पण कोणाकडेच याचे उत्तर नाही. © कृपा देशपांडे...

Comments