Skip to main content

संगीतकार दत्ताराम***

आतापर्यंत ज्या ज्या संगीतकारांवर लिहिल ते सगळे चांगल्या प्रकारे नावलौकिक, पैसा, प्रसिध्दी मिळवलेले संगीतकार होते पण आज ज्यांच्याबद्दल लिहीलय ते गुणवत्ता असूनही *दुर्लक्षित* राहिलेल्या संगीतकारांपैकी एक आहेत. *परवरीश* चित्रपटातील "*आंसूभरी है जीवनकी राहे*"हे गाणं कितीतरी दिवस मी शंकर जयकिशन यांचेच समजत होते इतकी त्या गाण्यावर एस जें ची छाप आहे. पण नंतर कळले कि, ती सुंदर रचनां संगीतकार *दत्ताराम* यांची आहे. तेच दत्ताराम ज्यांनी "शंकर जयकिशन" बरोबर प्रथम वादक मग सहाय्यक आणि अरेंजर म्हणून "बरसात" पासून "मेरा नाम जोकर पर्यंत काम केले. दत्ताराम वाडकर हे मूळचे गोव्याचे. परिस्थिती अतिशय हलाखीची. त्यामुळे शालेय शिक्षण नाही घेतले. त्यांची आई गायिका होती व गाण्याचे छोटे छोटे कार्यक्रम करीत असे. तिने दत्ताराम यांना ढोलकी आणि तबल्याचे प्रशिक्षण घ्यायला लावले. सुप्रसिध्द तबलावादक "पंढरी नागेशकर" यांच्याकडे ते तबला शिकले. मुंबईत आल्यावर ढोलकी आणि तबल्याची साथसंगत करत. एक दिवस व्यायामशाळेत त्यांची गाठ संगीत कार शंकर यांच्याशी पडली. येताना दत्तारामजींनी त्यांना आपल्या खोलीवर नेले. तिथे दत्तारामजींची ढोलकी होती. बोलताबोलता शंकरजींना कळले कि दत्तारामजी ढोलकी आणि तबला वाजवतात तेव्हा त्यांनी दत्तारामजींना "पृथ्वी" थिएटरला येण्यास सांगितले. तिथे कॅंटीनमधे गीतकार शैलेंद्र, हसरत जयपुरी, जयकिशनजी, राजकपूर सर्वांची गांठ पडे. राजकपूरशी परिचय करुन दिल्यावर दत्तारामजी पण त्या कंपूत सामील झाले व साथसंगत करु लागले. एकदा एका चित्रपटासाठी संगीतकार म्हणून राजजींनी शंकरजींना विचारले. त्यात राजकपूर कामही करणार नव्हते आणि चित्रपटही त्याच्या Production House चा नव्हता. फक्त पैसा त्यांचा होता.शंकरजींनी दत्तारामजींचे नाव सुचवले आणि ही पण हमी दिली कि गरज पडली तर ते स्वतः मदत करतील. राजजी तयार झाले आणि अशाप्रकारे स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून दत्तारामजींना चित्रपट मिळाला *अब दिल्ली दूर नहीं!* यातली गाणी फारच मधुर आहेत आशाजींच *ये चमन हमारा अपना है* लताजींचं *जियो लाल मेरे लाखो बरस* हे खूप लडीवाळ गाणे आहे. *माता ओ माता जो तुम आज होती* अगदी ह्रदय स्पर्शी..*चुन चुन करती आई चिडिया, डाल का दाना लाई चिडिया, मोर भी आया कौवा भी आया बंदर भी आया* खूपचं मजेदार! तुम्ही प्रत्यक्ष ऐकाल तेव्हाच कळेल कि ही सगळी गाणी खूप छान आहेत. नुसते शब्द बघून कदाचित कळणार नाही पण यू ट्यूब वर जरुर ऐका! त्यांचे मोजून १२/१३ चित्रपट आले. पण ते सगळे आपली छाप पाडून गेले. दत्तारामजींना जास्त नांव, प्रसिध्दी आणि स्वतंत्र कामही नाही मिळाले आणि ते पण गुणवत्ता असून! पण वादक सहाय्यक म्हणून त्यांनी शेवटपर्यंत काम केले. त्याचा ठेका *दत्तू ठेका*" म्हणून खूप प्रसिध्द होता. शंकर जयकिशनच नाही तर रौशनजी, सलीलदा, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मी प्यारे...सगळ्यांकडे त्यांनी वादक म्हणून काम केलय. सलिलदांची *मधुमती* मधील घडीघडी मोरा दिल धडके*, *आजारे परदेसी आणि *सुहाना सफर और ये मौसम हंसी* ह्या तीनही गाण्याला ढोलकी दत्ताराम जींची आहे. रौशन जींच्या *सारी सारी रात तेरी याद सताए* ह्यात तर आयत्या वेळी त्यांचा वादक वेळेवर न आल्यामुळे दत्तारामजींनी ठेका वाजवलाय. लोक त्यांची थट्टा करायचे, म्हणायचे स्वतंत्र चित्रपट करुनही तुम्ही दुसरीकडे का वाजवता? पण दत्तारामजींनी तिकडे दुर्लक्ष करुन एस जें कडे शेवटपर्यंत काम केले.पण त्यांना ते ग्लॅमर कधीच मिळाले नाही आणि आणखी चित्रपटही! . दुर्दैवाने दत्तारामजी एकदा आजारी पडले. पूर्वीसारखे काम होईना! हळूहळू त्यांना कामं मिळेनाशी झाली. त्यांच्या Gallbladder मधे किडनी स्टोन झाले. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितले. खर्च मोठा होता. त्याकाळी वादकांना कितीसे पैसे मिळायचे? पैशाअभावी ऑपरेशन न करता ते गोव्याला परत निघून गेले गेले. तिथेच त्यांचे चे निधन झाले. एक प्रश्न मनात येतो एवढा गुणी माणूस ज्याने कायम एस जेंना साथसंगत केली ते आणि इतरही लोक ज्यांच्या बरोबर त्यांनी काम केले त्या चित्रपटसृष्टीत त्यांना कोणीही कां नाही मदत केली नाही? कि आणखी काही कारणे?? सगळच अनुत्तरीत! दत्तारामजींच हे गाणं त्यांच्या शेवटच्या परिस्थितीला साजेसे... *भेज छनाछन खूब रुपैया हम तेरे कहलाते है हलवा पुरी खाते थे अब गमके पापड खाते है* कृपा देशपांडे... दत्ताराशजींची काही गाजलेली गाणी आणि चित्रपट... संतान* दिलने उसे मान लिया जिसका अंदाज नया बोले ये दिलका इशारा आंखोने मिलके पुकारा *बालक* *सुनले बापू ये पैगाम मेरी चिठ्ठी तेरे नाम चिठ्ठीमें सबसे पहले लिखता तुझको राम राम *फर्स्ट लव्ह* *मुझे मिल गई है मुहब्बत की मंजिल *बिते हुए दिन कुछ ऐसे ही है *जिंदगी और ख्वाब* *ना जाने कहां तुम थे न जाने कहा हम थे अतो मिलनके सपने खिले है *कटिले कटिले नशीले नशीले कैसे झोके आए, सजन मेरा मन उड उड जाए *कहती है झुकी झुकी नजर *कैदी नंबर ९११* *प्यारभरी ये घटाए राग मिलनके सुनाए राग मिलनके सुनाए *मीठी मीठी बातोंसे बचना जरा, दुनियाके लोगोमें है जादू भरा *तेरे तीरको हमने प्यारसे दिलमें रख लिया लै लै लै लै *परवरीश* *आंसु भरी है ये जीवनकी राहे, कोई उनसे कह दे हमें भूल जाए *मस्तीभरा है समा हमतुम है दोनो यहां आखोमें आजा दिलमें समा जा *मामा ओ मामा ओ मामा *आंसूभरी है....हे गाणं लताजींनी पण म्हटलयं त्याची चाल आवडल्यामुळे... *श्रीमान सत्यवादी* *हाले दिल हमारा जानेना बेवफा ये जमाना जमाना *एक बात कहूं वल्ला ये हुस्न सुभानल्ला *काला आदमी* *दिल ढूंढता है सहारे सहारे लुटे दिलके अरमां बुझे नैन तारे

Comments

Post a Comment