Skip to main content

Mehmood***

एका फिल्मस्टुडिओच्या कंपाउंड मधे तीन लहान मुले खेळत असत. एकाचा मोठा भाऊ चित्रपटात काम करत असे..दुसर्र्या मुलाचे वडील चरीत्र अभिनेता होते आणि तिसरी मुलगी स्वतःच बाल अभिनेत्री म्हणून काम करत असे. घर घर खेळताना, आई बाबांचा रोल करताना दोघा मुलांमधे भांडणं होत कि त्या छोटीचा नवरा कोण बनणार? बरीच वर्ष लोटल्यावर एकजण खरचं त्या मुलीचा नवरा बनला. ती मुलगी होती बेबी मुमताज अर्थात मधुबाला, पहिला मुलगा आभास अर्थात किशोर कुमार आणि तिसरा, विनोदाचा बादशहा मेहमूद! मेहमूद वर जेव्हा लिहायचं ठरवलं तेव्हा वाटलं कि ही सगळ्यात लहान पोस्ट असेल , आणि गाण्यांना तर स्कोपचं नसेल फारसा! पण जसजशी माहिती समोर आली मी अवाक झाले. किती नाट्यमय आयुष्य होतं ह्या माणसाचं! वडील मुमताजअली आणि आई लतिफुन्निसा यांच हे अपत्य! एकूण आठ भावंड! वडील चरीत्र अभिनेता तसेच डान्सर होते. त्यांचा नृत्याचा ग्रुप होता आणि वेगवेगळ्या गावात, शहरात ते कार्यक्रम करीत. मेहमूदची मोठी बहीण "मीनू मुमताज"(साकिया आज मुझे नींद नहीं आएगी हे प्रसिध्द नृत्य सादर करणारी) ही अभिनेत्री होती. तसेच भाऊ अन्वर अली हा पण अभिनेतामधील बस ड्राईव्हर. ती कंडक्टर - ड्राईव्हरची जोडी (राजेश - खन्ना) कोण विसरेल? मेहमूदला पहिली संधी मिळाली ती अशोक कुमार नायक असलेल्या "किस्मत"चित्रपटात! पण रोल खूपच लहान होता! वडील, बहीण, भाऊ आणि स्वतः मेहेमूद थोड फार कमवत होते. घरी जसजसा पैसा येत होता तसतसे वडील दारुच्या जास्तच आहारी जात होते. एकेकाळी श्रीमंत असलेलं हे कुटुंब हळूहळू रसातळाला जात होतं. मेहमूद आणि त्याची भावंड घर चालवण्यासाठी चहुबाजूनी प्रयत्न होते. दोघे भाऊ ट्रेनमधे गोळ्या बिस्किटे विकत असत. बहीण मीनू छोटे मोठे रोल करत होती. थोडं मोठं झाल्यावर मेहमूदनी ड्राईव्हींग शिकून प्रसिध्द कवी नेपाली आणि नंतर प्रसिध्द निर्माते पी एल संतोषी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम केले. त्या बरोबर मिळेल ते छोटे, मोठे रोलही करत असे. काम मिळायच्या आशेनी मेहेमूदच्या स्टुडिओच्या चकरा चालूच असायच्या! तिथे एकदा टेबल टेनिस खेळताना त्यांना मीनाकुमारीने पाहिलं आणि मला टे टे शिकवशील कां अशी विचारणाही केली. महिना रु. १००/-पगार. तेव्हा ती खूप मोठी रक्कम होती. मग त्यांच्या घरी जाणे येणे सुरु झाले. मीनाजींची धाकटी बहिण मधूला हा हसतमुख, खेळकर माणूस खूप आवडलां दोघांनी लग्न करायचे ठरविले. पण इथे तर सगळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली. भाडं थकवल्यामुळ मालकाने घराबाहेर काढलेले. घरात जे काही थोडेफार शिल्लक होते ते घेऊन यांनी मालाड गाठले. कधीकाळी चांगले दिवस असताना जागा घेऊन अर्धवट बांधकाम झालेल घरं! दार खिडक्याही नसलेल्या घरात सुनेला कसं आणायचं म्हणून आईला चिंता! पण सर्व परिस्थिती उमजूनही दोघांनी लग्न केलेच. मीनाकुमारीने बहिणीच्या सुखासाठी मेहेमूदला चांगल्या बॅनरखाली काम मिळावे म्हणून मद्रासची प्रसिध्द Production कंपनी A V M कडे शब्द टाकला पण त्यांनी मेहेमूदला काम देण्यास साफ नकार दिला. मेहेमूदला खरा ब्रेक मिळाला तो जाॅनीभाईंच्या सांगण्यावरुन गुरुदत्तच्या *सी आय डी* मधे.रोल छोटा असला तरी लक्षात रहाण्यासारखा होता. यानंतर आला "*परवरीश* राजकपूर बरोबर तेवढ्याच ताकदीने मेहेमूदनी काम केले. जबरदस्त टाईमिंग सेन्स,उत्स्फूर्त अभिनय आणि जन्मजात असलेले नृत्यकौशल्या च्या जोरावर हळूहळू कामं मिळू लागली आणि मेहेमूदला खर्या अर्थाने "स्टारडम" मिळाले. हिरोच्या बरोबरीने पैसे मिळू लागले. ज्या मद्रासच्या निर्मात्यांनी नाकारले होते त्यांचे ह्याच्याशिवाय पान हलेना. ७० च्या दशकात मेहेमूदकडे इतका पैसा होता कि त्याच्या मालकीचा बेंगलोर येथे "Stud Farm" होता आणि थोड्याथोडक्या नाही..२४ उत्तम स्थितीतल्या मोटारी होत्या.या मागे पण एक जिद्द असावी. एकेकाळी कमाल अमरोहींनी सिनेमात काम नाही पण मीनाने मदत करायला सुचवल्यामुळे ट्रक घ्यायला मदत करतो. ड्रायव्हिंग येत असल्याने हे काम तुला जास्त चांगले जमेल असे सुचविलेले... आता सुबत्ता होती पण पडत्या काळात जीने साथ दिली ती पत्नी मात्र दुरावली. त्यांचा तलाक झाला. नंतरची त्यांची पत्नी (ट्रेसी) अमेरिकन होती जी शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर होती. आता एकापेक्षा एक चांगले चित्रपट मिळू लागले. *छोटी बहेन* *दिल तेरा दिवाना* *जिद्दी* *औलाद* *गुमनाम* दरम्यान मेहेमूदने आपल्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती..*छोटे नबाब* मेहेमूदला गुणी लोकांची पारख होती. आर डी म्हणजे पंचम यांना पहिला ब्रेक ह्याच चित्रपटात मिळाला आणि पंचमने त्याचे सोने केले. नंतर दुसरी निर्मिती*भूत बंगला*हा रहस्यमय चित्रपट तनुजा बरोबर! हा चित्रपटही खूपच चालला. खूप वेगळ्या प्रकारचे पंचमदांचे संगीत होते यात!.. *प्यार किये जा* एक धम्माल विनोदी चित्रपट! सोबत बुजुर्ग अभिनेते ओमप्रकाश, किशोर कुमार, धुमाळ असे दिग्गज! ह्यात मेहेमूदला फिल्म डायरेक्टर बनायच असतं आणी आपले श्रीमतं वडील ओमप्रकाश यांच्याकडून चित्रपट बनविण्यासाठी पैसे हवे असतात. ओमप्रकाशना रहस्यमय चित्रपटाची कथा सांगतानाचा सीन कोण विसरेल? मेहेमूद नेहमी विनयाने सांगायचा.. ओमप्रकाश यांनी कथा ऐकतानाचा अभिनय इतका उत्कृष्ट केला त्यामुळेच मला ते शक्य झालं. त्यानंतर त्याचा स्वनिर्मित *पडोसन* मला स्वतःला "पडोसन" आणि "कुंवारा बाप" हे चित्रपट कमालीचे आवडतात. पडोसन मधे तर विनोदवीरांची फौज होती. किशोरदा, मुक्री,केश्टोमुखर्जी, राजशेखर आणि !स्वतः मेहेमूद! मेहेमूद कर्नाटक संगीत शिक्षक तर किशोरकुमार बंगाली गवैया! पंचमदांची एक से बढकर एक गाणी! कितीही वेळा पहावा असा चित्रपट! यांतर *सांज और सवेरा* *आंखे* *दो कलियां, साऊथचा *मैं सुंदर हूं* *साधू और शैतान* *लाखोमें एक* *दोफूल*... बाॅबे टू गोवा..ह्या चित्रपटात मेहमूदने अमिताभ ला मुख्य नायकाची भूमिका दिली. खूप कमी जणांना माहित असेल कि सुरुवातीच्या काळात थोडे दिवस अमिताभ मेहेमूदच्या घरी रहात असे. *सात हिंदुस्तानी* ह्या चित्रपटात काम करताना मेहेमूदचे बंधू अन्वर अली यांच्याशी ओळख झाली. ह्या चित्रपटानंतर अमिताभला जंजीर* मिळाला आणि पुढचा इतिहास तुम्हाला माहीतच आहे. आणखी एक अजरामर चित्रपटाची निर्मिती मेहमूदने केली ती म्हणजे *कुंवारा बाप* एका रस्त्यावर सापडलेल्या मुलाचा सुरुवातीला जबरदस्तीने सांभाळ करावा लागतो. त्या मुलाला पोलिओ होतो.आपण नीट लक्ष न दिल्याने असं झालं ह्याची त्याला खंत वाटते. त्या मुलावर अतीव माया जडते आणि त्या मुलासाठी परिस्थिती नसतानाही शक्य ते उपचार करतो. कालांतराने त्या मुलाचे खरे आई वडील शोध घेत येतात. आता त्या मुलाला आणि त्याला एकमेकांपासून दूर व्हायचे नसते...फार ह्रदयस्पर्शी चित्रपट आहे हा! ह्यात मेहेमूदचे वडील मुमताजअली यांचीही छोटीशी भूमिका आहे आणि *सज रही गली मेरी मां* ह्या गाण्यात त्यांचा साभाग आहे. मेहमूदने जेवढं हसवलं त्याच्या कितीतरी पटीने रडवलय यात! ह्यातही मेहेमूदच्या धर्मेंद्र, विनोद मेहेरा, विनोद खन्ना हेमा मालिनी इ. दोस्तांनी एका फोनवर पाहुणे कलाकार म्हणून फ्री काम केलय. या चित्रपटातही संगीतकार राजेश रोशन यांना मेहमूदने या चित्रपटात पहिली संधी दिली मेहमूद बरोबर ज्या स्त्री कलाकारांनी काम केलं आणि त्यांची जोडी हीट आणि फेमस झाली त्यात शुभा खोटे, आणि अरुणा ईराणी आणि थोडीफार मुमताज आहे. अरुणा ईराणीशी काही काळ खूप क्लोज रिलेशन होते ! मुमताजला प्यार किये जा मधे सहनायिका बनवण्याचे श्रेय मेहेमूदलाच जातं. मेहमूदने सुमारे ३०० चित्रपटात भूमिका केल्या. कोणताही विनोदी कलाकार आपल्या हसण्यामागे खूप सारं दुःख दडवून ठेवतो. त्यांच्या हसण्याला दुःखाची झालर असते.पण मेहेमूदने आपल्या कामावर त्याचा परीणाम होऊ दिला नाही. सदैव लोकांना हसवतच ठेवले. ।शेवटी शेवटी मेहेमूद उपचारासाठी दूसरी अमेरिकन पत्नी ट्रेसी हिच्या समवेत अमेरिकेत होते. मेहमूदचे भाचे नौशाद यांनी एकदा फोनवर विचारले मामू कैसे हो? मेहमूदने नेहमीच्या शैलीत मिश्किलपणे उत्तर दिले, "चिकन खा रहा हूं".. आजारी असल्याने खूप पथ्यपाणी होते त्यामुळे भाच्याने आश्चर्य व्यक्त केले तर त्याला म्हणाले," अरे अब बस हो गया! मरना ही है तो खा पी के मरुंगा"! आणि दोनच दिवसांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला. एक विनोदाचा बादशहा कायमचा पडद्याआड गेला. कुठल्याही विनोदी कलाकाराला मिळाली नसतील एवढी सुंदर गाणी मेहेमूदला मिळाली आहेत. *छोटी बहेन* मैं रंगीला प्यारका राही दूर मेरी मंजिल *छोटे नबाब* *आ हुआ मेरा दिल मतवाला *मतवाली आंखोवाले ^*जिद्दी* *मैं तेरे प्यारमें क्या क्या न बना दिलबर जाने ये मौसम *औलाद* *जोडी हम्मारी जमेगा कैसै जानी हम तो हैं अंग्रेजी तुम लडकी हिंदुस्तानी *गुमनाम* *हम काले है तो क्या हुआ दिलवाले हैं *सांज और सवेरा*..... *अजहुन आए बालमा सावन बीता जाए *भूत बंगला* *आओ ट्विस्ट करे या खुदा मौसम *जागो सोनेवालो सुनो मेरी कहानी *प्यार किये जा* *ओ मेरी मैंना तू मान ले मेरा कहना अरे *मुश्किल हो गया जीना तेरे बिना अयैयो पडोसन *एक चतुर नार करके सिंगार *दो फूल* *मुत्तुकोडी कौवारी हडा *आंखे* *तुझको रख्खे राम तुझको अल्ला रखे *साधू और शैतान* *कभी आगे कभी पिछे कभी उपर कभी नीचे जाने कहा कहा मुझे लेके चली मेरी लैला *मैं सुंदर हूं* *नाच मेरी जान फटाफाट बात मेरी मान *Bombay to Goa* *ये महकी महकी ठंडी हवा ये बता *कुवारा बाप* *आरी आ जा निंदीया तू ले चल कहीं *मैं हूं घोडा ये हैं गाडी मेरी रिक्षा सबसे निराली *लाखोमें एक*... *चंदा ओ चंदा किसने चुराई तेरी मेरी *जोगी ओ जोगी प्यारमें क्या होगा *मनमंदीर* *आ आजा अभी नहीं अभी नहीं तेरी ना ना में हां का मजा है *सबसे बडा रुपैया* ना बीबी ना बच्चा ना बाप बडा ना मैया © कृपा देशपांडे..

Comments