Skip to main content

आर डी बर्मन...

राहुल देव बर्मन.... आजचे संगितकार आहेत "बापसे बेटा सवाई" अशी ख्याती असलेले आर डी म्हणजे *पंचम*... सचिनदांनी पंचमदांची संगतातली रुची पाहून त्यांना "अली अकबर खान" यांच्याकडे सरोद आणि "सामता प्रसाद" यांच्याकडे तबल्याची शिकवणी सुरु केली. शिवाय ते माऊथआॅर्गन उत्तम वाजवायचे.. मुंबईत आल्यावर ते वडिलांना संगीत दिग्दर्शनात सहाय्यक म्हणून मदत करु लागले. '*आराधना*चे संगीत खूपच गाजले. त्यात मोठ्ठा वाटा पंचमदांचा होता. पण त्याचे पूर्ण श्रेय सचिनदांना मिळाले. तेव्हाच पंचमनी स्वतंत्र संगीत द्यायचे ठरवले. त्यांचा पहिला चित्रपट मेहमूदचा *छोटे नबाब*...त्यातले *घर आजा घिर आई बदरा सावरिया*...हे गाणे तर त्यानंतर मेहेमूदचाच *भूत बंगला*. त्यातले *आओ ट्विस्ट करे* आणि *जागो सोने वालो* ही गाणी गाजली पण commercially hit झालेला पहिला चित्रपट...*तिसरी मंजिल*....सर्व गाणी सूपर हीट.पंचमदांनी संगीतात अनेक प्रयोग केले. त्यांच्यावर वेस्टर्न, "लॅटिन" आणी "अरेबिक" संगीताचा प्रभाव होता. त्यांचे काही चित्रपट व गाणी.... *तिसरी मंजिल* ओ हसीना जुल्फोंवाली जाने जहां आजा आजा मैं हूं प्यार तेरा तुमने मुझझे देखा होकर मेहरबां ओ मेरे सोना रे सोना रे सोना *प्यार का मौसम* नी सुलताना रे प्यारका मौसम आया मैं ना मिलूंगी नजर हटाओ ना जा ओ मेरे हमदम *बहारोंके सपने* चुनरी संभाल गोरी उडी चली जाए रे आजा पिया तोहे प्यार दूं *अनामिका* बाहोमें चले आओ हमसे सनम क्या पर्दा मेरी भीगी भीगीसी पलकोंपे रह गए *अजनबी* हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले भीगी भीगी रातोमें मीठी मीठी बातोमें *कटीपतंग* जिस गलीमें तेरा घर न हो बालमा प्चार दीवाना होता है मस्तान होता है ये शाम मस्तानी मदहोश किए जाए *कारवां* कितना प्यारा वादा है चढती जवानी मेरी चाल मस्तानी अब जो मिले है तो बाहोंको बाहोमें *हरे राम हरे कृष्ण* फूलोंका तारोंका सबका कहना है कांची रे कांची रे प्रीत मेरी सांची *अमरप्रेम* रैना बीती जाए शाम ना आए कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है चिंगारी कोई भडके तो सावन उसे बुझाए *आंधी* तुम आ गए हो नूर आ गया है इस मोडसे जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते तेरे बिना जिंदगीसे शिकवा *मेरे जीवन साथी* ओ मेरे दिलके चैन चैन आए मेरे दिलको अब जो मिले है तो बाहोंको बाहोमें चला जाता हूं किसीकी धुनमें *घर* आपकी आखोमें कुछ महके हुएसे तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा आजकल पांव जमींपर नहीं पडते मेरे फिर वोही रात है रित है ख्वाबोंकी *परिचय* मुसाफिर हूं यारो न घर है ना ठिकाना बीती ना बीताई रैना सा रे के सा रे ग म को लेकर गाते चले *आप की कसम* करवटे बदलते रहे सारी रात हम कहो सुनो कहा सुना कुछ हुआ क्या जय जय शिवशंकर *खूशबू* बेचारा दिल क्या करे ओ मांझी रे अपना किनार *दूसरा आदमी* चल कहीं दूर निकल जाए आओ मनाए जश्ने मुहब्बत *किनारा* नाम गुम जाएगा चेहैरा ये बदल जाएगा जाने क्या सोचकर नहीं गुजरा *इजाजत* छोटीसी कहानीसे बारीशोंकी पानीसे कतरा कतरा मिलती है मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है *कुदरत* - हमें तुमसे प्यार कितना(ह्याचं क्लासिकल वर्जन परवीन सुलतानांच्या आवाजात) *मेहेबूबा* परबत के पीछे चंबेला गांव मेरे नैना सावनभादों 1942 a lovestory रिमझिम रुमझुम भिगी भिगी रुतमें एक लडकी को देखा तो ऐसा लगा कुछ ना कहो कुछ भी ना कहो मला जी अधिक भावतात त्यांची एक झलक.... *पडोसन* - कहना है कहना है *बहारोंके सपने* - क्या जानूं सजन *प्यारका मौसम* - तुम बिन जाऊं कहां *बसेरा* - जहांपे सवेरा हो बसेरा वहीं है *मंजिल* - रिमझिम गिरे सावन पंचमदानी स्पर्धेत टिकून रहायला काही नवीन प्रयोग त्याची ही गाणी याची साक्ष आहेत... '* दैया ये मैं कहां आ फसीं *क्या जानू सजन होती है क्या.. *जब अंधेरा होता है आधी रात के बाद *धन्नो की आंखोमें रात का सुरमा *दम मारो दम मिट जाए गम *ममैया केरो केरो केरो मम्मा *दुनियामें लोगोंको धोखा कभी हो जाता *आजकी रात कोई आनेको है रे बाबा *मेरी जां मैंने कहां माझं सर्वात आवडतं गाण आहे *तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं*...एक सुखी कुटुंब..नवरा बायको..दोन मुली.. अचानक एक वादळ येतं ...नवर्र्याची एका बेसावध क्षणी झाललेली चूक..एका गोंडस आठ वर्षाच्या मुलाला त्याची आई गेल्यावर नवरा अचानकपणे घेउन येतो. तो स्वतः पण या घटनेने गोधळलेला, बायकोला फसवलं गेल्याचं दुःख, मुलींना काहीच कळत नाही..त्या मुलाला पोरकेपणाची जाणीव ....शबाना, नसीर आणि तिन्ही मुलांचा जबरदस्त अभिनय गुलजारजींचे समर्पक शब्द आणि पंचम ची ह्रदय हेलावणारी चाल...सगळचं अदभूतं..... पंचमदांचा शेवटचा चित्रपट होता 1942 A love Story...त्यातली सर्वच गाणी अप्रतीम! लोकाना खूप आवडली पण दुर्दैवाने हे यश बघायला पंचम राहिले नाहीत. 1994 मध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे देहावसन झाले. एक *GENIUS* अकाली हे जग सोडून गेला. "*जिंदगीके सफरमें गुजर जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते ...वो फिर नहीं आते*" © कृपा देशपांडे...

Comments