एका वाद्यांच्या दुकानातली ही गोष्ट आहे. एक अगदी साधा मध्यमवर्गीय दिसणारा मनुष्य या दुकानात गेला. विविध वाद्य पहात असतांना त्याची नजर गेली एका सतारीवर. त्याने ती सतार पाहण्यास मागितली. विक्रेत्याने सांगीतले “ती फार महाग आहे आणि मोठ्या आणि तज्ञ कलाकारांसाठी विशेष तयार केली आहे".ह्या गृहस्थाने पण आग्रहच धरला की “मला तीच सतार हवी आहे, जी किंमत असेल ती मी द्यायला तयार आहे." मालकम्हणाले,"ठीक आहे. तुम्ही ती फक्त दोन मिनिटं वाजवून दाखवा. जर आम्हाला योग्य वाटलं तर आम्ही तुम्हाला ती विकण्याचा विचार करू”.
ह्या शर्तीवर ती सतार काढून त्यांनी ह्या माणसाच्या हातात दिली. त्याने तारा स्वरात लावून सुरुवात केलीतब्बल एक तास अशी काही सतार वाजवली की दुकानात आलेले सर्व जण, स्वतः मालक मंत्रमुग्ध झाले. शर्त लावणाऱ्यांच्या डोळ्यातून तर घळघळा पाणी वाहू लागले. मालकाने ह्या वादकाचे चक्क पाय धरले, माफी मागून ती सतार त्या गृहस्थाला मानाने बक्षीस म्हणून दिली. ह्या माणसाचे नाव “सलील चौधरी”
ह्या सतारीचा पहिला वापर त्यांनी केला आहे ह्या गाण्यात “ओ sss सजना, बरखा बहार आयी . . . . . “
आजचे संगीत कार आहेत सलिल चौधरी. त्यांचे वडील पाश्चिमात्य शास्रीय संगीताचे जाणकार होते. सलिलदांना लहानपणापासून संगीताची आवड. त्यांचे बालपण आसामला चहाच्या बागांमधे गेले. कानावर सतत मजुरानी गायलेले आसामी लोकसंगीत पडे. त्यांचचे वडील डाॅक्टर होते आणि त्यांना पाश्चिमात्य शास्रीय संगीताची आवड होती. एका आयरीश डाॅक्टर मित्र त्यांना मोठ्या संखेने तिथून जाताना पाश्चिमात्य क्लासिकल संगिताच्या ग्रामोफोन रेकाॅर्डस देऊन गेला होता. तेही सलिलदांच्या कानावर पडे. सलिलदा "मोझार्ट, बिथोववेन ह्याच्या संगीताचे खूप चाहते होते. तसेच रोज च्या वातावरणातील वाहत्या पाण्याचा खळखळाट, पक्षांचा किलबिलाट, बासरीचे सूर, स्थानिक लोकगीतांचा नाद कानात साठवून त्याचा उपयोग त्यांनी आपल्या संगीतात चपखलपणे केलाय. ते गीतलेखनही करत तसेच त्यांन चालीही लावत.
सुमारे २० वर्ष बंगाली चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर, हिंदी चित्रपटसृष्टीत बिमलदांनी त्यांना पहिली संधी दिली.तो चित्रपट होता "सलीलदांच्याच कथेवर आधारीत "*दो बिघा जमीन* त्याला संगीतासाठी "फिल्मफेअर" पुरस्कार मिळाला. आणि फ्रान्सच्या सुप्रसिध्द "कान्स" चित्रपट महोत्सवात चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पारीतोषिकही मिळाले.
*मुसाफिर* चित्रपटात दिलीप कुमार ने लताजीं बरोबर गायलेले"*लागी नाही छूटे काहे जिया जाए*" हे अप्रतीम गाणं पण सलीलदांचच...
सलिलदांनी संगीतदिलेल्या"*अन्नदाता*" ची सर्वच गाणी अप्रतीम..त्यापैकी "*रातोंके साये घने जब बोझ दिलपर बने*"..मला अतिशय प्रिय.. गर्भश्रीमंत ओमप्रकाश त्याच्या लोभी नातेवाईकांना कंटाळून एका कुत्र्यासह गुपचुप घर सोडतो. योगायोगाने त्याची गाठं चित्रकार अनिल धवन आणि जयाभादुरी ह्या जोडप्याशी पडते. अतिशय खडतर परीस्थितीतही ते त्याला आश्रय देतात. एका रात्री परिस्थितीने हताश जयाभादुरी गात असताना ओमप्रकाशला जाग येते. तेव्हा जयाचा वार्र्याने उडलेल्या पदराखालचा पाठीवर फाटलेला ब्लाउज पाहून दुखाःने व्यथित झालेला तो क्षणात दरवाजा बंद करतो. काय जयाचा अभिनय आहे ! तिचा व्यथित चेहेरा, तिची अगतिक परिस्थिती, भावनांचा कल्लोळ स्पष्ट दिसतो. योगेशजींचे अर्थपूर्ण गीत आणि सलिलदांच साजेसं संगीत..खूप अस्वस्थ होते मी हे गाणंऐकल्यावर . . .
सलिलदांनी अशी सुंदर संदर गाणी देऊन आपल्याला समृध्द केलय. त्यांना कुठल्याही भाषेचं वावडं नव्हतं. हिंदी, बंगाली चित्रपटांनंतर त्यांनी दक्षिणेकड च्या विशेषतः "मल्याळम" चित्रपटांनाही संगीत दिले. हिंदी(७५) बंगाली (४७) आणि (२७)मल्याळम चित्रपटांना संगीत दिलं. शिवाय काही कन्नड, तामीळ, तेलगू, मराठी,उडिया गुजराथी आणि आसामी चित्रपटांनाही संगीत दिलयं.
अशा ह्या गुणी, प्रतिभाशाली संगीत काराचे 1995 मध्ये दुःखद देहावसन झाले. त्यांना मुकेशजींनी गायलेल्या त्पांच्याच गीतातून ही आदरांजली!!!
*नैन हमारे सांझ सकारे
देखे लाखो सपने
सच ये कहीं, होंगे या नहीं
कोई जानेना, कोई जानेना यहां*
कृपा देशपांडे...
Comments
Post a Comment