त्या दिवशी टेलिव्हिजन वर देशभक्तीपर गाणी लागलेली. त्यात *कर चले हम फिदा जान- ओ- तन साथियो* हे गाणे बघताना नजरेसमोर आला तो नितांत सुंदर चित्रपट *हकिकत* आणि तेवढीच मधूर त्यातली सर्वच गाणी!
*मैं ये सोचकर उसके दरसे उठा था
*जरासी हट होती है तो दिल सोचता हैं
*होके मजबूर मुझे उसने बुलाया होगा
*खेलो ना मेरे दिलसे ओ मेरे साजना
ही गाणी आठवताना साहजिकच डोळ्यासमोर नाव आले संगीतकार मदन मोहन कोहली. तेच मदन मोहन ज्यांच्या बद्दल ओ पी नय्यर म्हणायचे ईश्वराने लतासाठी मदन मोहन बनवलेत कि मदन मोहनसाठी लता ....
मदनजींचा जन्म इराकचा. त्यांचे वडील रायबहादूर चुनिलाल कोहली इराकी सरकारच्या नोकरीत होते. त्यांची फिल्म व्यवसायात, Bombay Talkies आणि Filmistan कंपनीत भागिदारी होती. साहजिकच मदनजींना पण चित्रपट व्यवसायामधे यायचे होते. पण मदन जींनी वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी आर्मीत नोकरी पत्करली. पण त्यांचे मन तिथे रमलेच नाही. मुळात संगीताची आवड आणी तशी संधी आली म्हणून ते दिल्ली आकाशवाणीत रुजू झाले. त्यांनी लाहोरला असताना त्यानी कर्तारसिंग ह्या संगीत शिक्षकांकडून बेसिक शिक्षण घेतले होते. पण शास्रशुध्द शिक्षण घेतले नाही. तरी भविष्यात त्यांनी शास्रीय संगीतावर आधारीत उत्तमोत्तम गाणी दिली. कालांतराने ते मुंबईत आले. तिथे त्यांची भेट एस डी बर्मन, शामसुंदर, सी रामचंद्र अशा दिग्गज संगीतकारांशी झाली १९४८,४९ ही दोन वर्ष ते सं.सचिन देव बर्मन आणि सं.शामसुंदर यांच्याकडे अनुक्रमे *दो भाई* आणी *निर्दोश* चित्रपटांसाठी सहाय्यक होते.
त्यानंतर स्वतंत्रपणे संगीत दिलेला पहिला चित्रपट १९५० सालचा *आंखे* त्यानंतरचा *अदा* आणि मग मदनजींनी मागे वळून पाहिलेच नाही. एकापेक्षा एक सरस असे चित्रपट दिले जसे कि मदहोश, बागी, रेल्वे प्लॅटफाॅर्म, इल्जाम, भाई भाई, देख कबिरा रोया, जेलर,गेटवे ऑफ़ इंडिया ,अदालत, खजांची, शराबी, संजोग, नींद हमारी ख्वाब तुम्हारे, देख कबिरा रोया, मनमौजी, पूजा के !फूल,अकेली मत जईयो,सुहागन , जहांआरा,अनपढ, आपकी परछाईया, वह कौन थी, मेरा साया, हकीकत, हंसते जख्म, हीर रांजा, दस्तक, साहिब बहादूर, हिंदुस्तानकी कसम, मौसम, चिराग, लैलामजनू इत्यादी..
लताजी त्यांना "गजल सम्राट" म्हणत. लताजी आणि मदन मोहन हे Unique Combination आहे. त्यांची सर्वच्या सर्व गाणी अतिशय गाजली. *लग जा गले के फिर ये फिर ये हंसी रात* आणि *वो चुप रहे तो मेरे दिलके दाग जलते हैं* ही दोन गाणी माझी सर्वात आवडती आहेत.
मदनजी आणि लताजींची अजून काही गाणी....
*बेताब दिलकी तमन्ना यही है
*तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा
*तेरी आंखोके सिवा दुनियामेंरखा क्या है
*यूं हसरतोंके दाग मुहब्बतमें धो लिए
*आपकी नजरोंने समझा प्यारके काबिल मुझे
*मिलो ना तुम तो हम घबराए
*नैनोमें बदरा छाए बिजली सी चमके
*वो भूली दासतां लो फिर याद आगई
*माई री मैं कासे कहूं पीड अपने जियाकी
*रस्मे उल्फत को निभाई
*नैना बरसे रिमझिम रिमझिम
*हम प्यारमें जलनेवालोंको
*मेरी बीना तुमबीन रोए
*तू प्यार करे या ठुकराए
Duets
*एक मंजिज राही दो फिर प्यार ना कैसे हो
*दो घडी वो जो पास आ बैठे
*देख तेरे संसार की हालत क्या हो गई
*वो चांद मुसकाया सितारे शरमाए
*हमसफर साथ अपना छोड चले
*कभी तेरा दामन ना छोडेंगे हम
इतरांनी गायलेली
आशाजींचे *झुमका गिरा रे बरेली के बाजारमें किंवा *शोख नजर की बिजलिया*
रफीजींची *ये दुनिया ये महफिल*, *आपके पहलूमें आकर रो दिये*
*बस्ती बस्ती परबत परबत गाता जाए बंजारा*,
*तू मेरे सामने हैं तेरी जुल्फे हैं खुली*
*यूं रुठो ना हसीना मेरी जानपे बन आएगी*
*तुझे क्या सुनाऊ मैं दिलरुबा*
*तुम्हारी जुल्फके सायेमें शाम कर लूंगा*, *मेरी आवाज सुनो प्यार का राग सुनो*
*कभी ना कभी कहीं ना कहीं कोई ना कोई तो आएगा*
.*सावनके महिनेमें इक आगसी सीनेमें*
तलतजींच *फिर वोही शाम वही गम वही
तनहाई है*
*हमसे आया न गया तुमसे बुलाया न गया
मुकेशच *भूली हुई यादों मुझे इतना ना सताओ* किशोर कुमार चं जरुरत है जरुरत है
महेंद्रकपूरचं आणि आशाजींच "छोडकर तेरे इश्क का दामन"
ही सर्व गाणी एकसे बढकर एक आहेत.
मदनजींनी ५०, ६० दशकात आणि ७०सुरुवातीला मिळून मदनजींनी सुमारे १०० चित्रपटांना संगीत दिले. राजा मेहंदी अली खां, राजेंद्रकृष्ण आणि कैफी आजमी हे त्याचे आवडते कवी होते. जाता जाता एवढच कि असा हा मनाने हळवा, कवी ह्रदयाचा माणूस अवघ्या ५१ व्या वर्षी हे जग सोडून गेला. त्यांनी काही करुन ठेवलेल्या चाली यशजींनी "वीर झारा" साठी वापरल्या. त्यातलीच एक...
*तेरे लिए हम भी जिए हर आसूं पिए
दिलमें मगर जलते रहे चाहत के दिए
तेरेलिए.... तेरेलिए*.....
अलविदा!!!
© कृपा देशपांडे...

Comments
Post a Comment