Skip to main content

Meena Kumari***

दादरच्या "रुपतारा" स्टुडियोच्या आवारात एक लहान मुलगी खेळत होती. बाल कलाकार म्हणून छोट्या मोठ्या भूमिका करत असे.त्यावेळचे महान अभिनेते अशोक कुमार तेथूनच जात असता त्यांनी कौतुकाने त्या मुलीच्या गालाला हात लावला. जवळच उभे असलेले तिचे वडील म्हणाले साहेब ही माझी मुलगी आहे. तेव्हा अशोककुमार त्या मुलीला हसत हसत म्हणाले, अब तो तुम बहोत छोटी हो, पर काम अच्छा करती हो! किसी दिन बडी हो जाओगी तो तुम्हारे साथ हम भी काम करेंगे! आणि खरचं पुढे *तमाशा* चित्रपटात तिने अशोक कुमार यांच्या बरोबर काम केले. ती होती हिंदी चित्रपट सृष्टीतील एक महान, भावुक,बोलक्या चेहेर्याची अभिनेत्री"मीनाकुमारी, जिचे अभिंनय सामर्थ्य खुद्द दिलितकुमार जाणून होते, मधुबाला तिच्या आवाजाची चाहती होती, सत्यजीत रें च्या मते निःसंशय तिच्यात जबरदस्त अभिनयगुण होते,अभिताभच्या दृष्टिने तिच्यासारखी संवाद फेक कुणाकडेच नव्हती आणि नौशादजी म्हणायचे हिरोईने आती जाती रहेगी लेकिन दूसरी मीना नहीं होगी !!! मीनाकुमारीचे खरे नाव महजबीन! अजून दोन बहिणी..मोठी खुर्शिद धाकटी मधू! आईवडिल दोघेही थिएटर कलाकारं!खरं तर जन्मल्याबरोबरच तिला मुस्लीम अनाथालयाच्या बंद दारासमोर ठेवलेले. पण छोट्या मीनाचा रडल्याचा आवाज ऐकून वडिल माघारी फिरले आणि तिला घरी घेऊन आले. अतिशय गरिबीमुळे शिकायची खूप इच्छा असूनही छोट्या मीनाला शाळेत जाता आले नाही. नंतर परिस्थिती सुधारल्यावर खाजगी शिकवणी ठेवली हिंदी, उर्दू आणि इंग्रजी साठी. कारण सोन्याची अंडी देणारी कोंबडी अशिक्षित राहून कसे चालेल? अगदी लहान म्हणजे सात वर्षांची असताना तिची आई सिनेमात काम मिळावं म्हणून निर्माते विजय भट यांच्याकडे घेऊन गेली. गोबर्या गालाची मोहक चेहेर्याची छोटी मीना भट साहेबांना आवडली आणि लगेचच "लेदरफेस" या चित्रपटात भूमिका दिली. मीनाजींनी एकूण २० चित्रपटात बालकलाकार म्हणून आणि काही स्टंटपटातही भूमिका केल्या. *तमाशा* चित्रपटाच्या सेटवर अशोक कुमारनी तिची कमाल अमरोहिंची ओळख करुन दिली. त्यांनी तेव्हा *महल* सारखा हिट चित्रपट केलेला. आता मीनाजींबरोबर *अनारकली* चित्रपट करायचे ठरले. करारपत्रही झाले. कमालजी लोकेशन्स पहाण्या साठी दिल्लीला रवाना झाले. दरम्यान मीनाजी बहीण मधू आणि वडिलांसहित महाबळेश्वरला गेले असता येताना गाडीला अपघात झाला. मीनाजींना डाव्याहाताला जबरदस्त जखम झाली आणि त्यांची डाव्या हाताची करंगळी तुटली. कित्येक दिवस हे कोणालाही माहीत नव्हते कारण मीनाजी ते पदराने किंवा ओढणीने शिताफीने दडवत. मीनाजी तेव्हा चार महिने पुण्याच्या ससूनमध्ये अॅडमीट होत्या. कमालजींना हे कळल्यावर ते भेटायला जात राहिले आणि सहवासाने प्रेम फुलत गेले. मात्र अनारकलीचा विषयच बाजूला पडला.मीनाजींना गरज होती ती एका व्यावसायिक दृष्ट्या सफल चित्रपटाची! तिही संधी दिली "विजय भट" यांनी *बैजूबावरा* ह्या चित्रपटात! उत्तम कथा, संगित,अभिनय सर्वांगाने जमून आलेल्या ह्या चित्रपटासाठी मीनाजींना उत्कृष्ट अभिनयासाठी पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर दिलिपकुमारबरोबर चा पहिला चित्रपट *फुटपाथ* आणि बिमलदांचा *परिणिता*! ह्या चित्रपटासाठीही त्यांना "फिल्मफेअर" मिळाले. त्यानंतर १९५३ मधे कमाल अमरोहींचा *दायरा* हा चित्रपट त्यांच्याच सहजीवनावर आधारीत होता.तेव्हाच आलेल्या बिमलदांच्या *दो बिघा जमीन* मधे पाहुणी कलाकार म्हणून त्या झळकल्या. त्यानंतर *चांदनी चौक*, दिलिपजीं बरोबर *आझाद*, *यहुदी*, अजित बरोबर *हलाकू*, सुनिलदत्त बरोबर *एकही रास्ता*, मग आला *शारदा*! मीनाजींची अतिशय आव्हानात्मक भूमिका होती. परिस्थितीवश प्रियकराची आई बनलेल्या स्रीची भूमिका त्यांनी समरसून केली.राजकपूर नायकाच्या भूमिकेत! मीनाजींना ज्या काही अगदी थोड्या निखळ विनोदी भूमिका मिळाल्या त्यातला एक *मिस मेरी* सोबत जेमिनी गणेशन आणि किशोर कुमार! नंतर राजेंद्र कुमार बरोबरचा *चिराग कहां रौशनी कहां* आणि राजकुमार बरोबरचा अतिशय श्रवणीय संगीत असलेला *दिल अपना प्रीत पराई*! एका विवाहित डाॅक्टरच्या आयुष्यात आलेल्या नर्सची भूमिका मीनाजींनी अतिशय संयमाने केली. त्यावर्षीचा उत्कृष्ट संगिताचा पुरस्कारही याच चित्रपटाला मिळाला शर्यतीत *मुगल ए आझम* असूनही. मग मल्टीस्टारर *चार दिल चार राहे* सोबत राजकपूर, शम्मीकपूर, निम्मी! त्याचवर्षी दिलीकुमार बरोबरचा *कोहीनूर* असं म्हणतात कि सतत गंभीर भूमिका करणार्या दिलिप कुमार आणि मीनाकुमारी यांच्यासाठी हा चित्रपट एक उत्तम बदल होता. राजा, राणी, राज्य, तलवारबाजी, घोडेस्वारी, संगीत आणि नृत्य अशी रेलचेल असलेला हा चित्रपट करताना दोघांनाही मजा आली. शिवाय ह्यात काही हलकी फुलकी विनोदी द्रृष्यही होती. दोघांच्याही आधीच्या चित्रपटापासून हा जरा वेगळा होता. त्यांचे *दिल एक मंदीर* (राजकुमार, राजेंद्र कुमार), *अकेली मत जईयो* (राजेंद्र कुमार), *चित्रलेखा* (प्रदीप कुमार) *सांझ और सवेरा* (^गुरुदत्त) *गजल* ( सुनिलदत्त) असे एकसे एक चित्रपट यानंतर आले. *साहब बीबी और गुलाम*..मीनाजींच्या अभिनय कौशल्याला पूर्णपणे वाव होता ह्यातल्या "छोटीबहूच्या" भूमिकेला! अस्ताला जात असलेली जमीनदारी, त्यांच्या शोभेच्या बाहुल्या असलेल्या बायका, कि ज्यांना काहिहि किंमत नाही. जेव्हा पतीचे प्रेम जिंकण्यात असफल ठरलेली छोटी बहू नवर्याने दुसर्या स्रीकडे जाऊ नये म्हणून मद्य प्यायलाही कमी करत नाही पण दोन दिवस घरात काढून " बाहेरख्यालीपणाला चटावलेला नवरा तिला झिडकारुन बाहेर पडताना म्हणतो, घरातल्या इतर स्रियांप्रमाणे ते पण "गहने बनवाओ गहने तुडवाओ" हेच कर! तेव्हा ती चवताळून उठते. खरचं मीनाजींचा तो अभिनय, ती नवर्याचं प्रेम मिळवण्याची धडपड! हसं ऐकलय कि ह्या ट्रॅजेडीक्वीनने कधिही ग्लिसरीनचा वापर केला नाही. ते नशेने जड झालेले डोळे, तो इफेक्ट दाखवण्यासाठी त्या डोळ्याखाली यू डी कोलन लावत. ह्या कितीही वेळा चित्रपट पाहिला तरी समाधान होत नाहीं केवळ अविस्मरणिय! या चित्रपटासाठी मीनाजींना तिसरं फिल्मफेअर मिळवून दिलं. यावेळी तर तीनही मानांकन त्यांचीच होती. दुसरे दोन चित्रपट होते *आरती* आणि '*मैं चुप रहूंगी* मीनाजींचा चित्रपटाचा आलेख चढता होता पण वैयक्तिक आयुष्यात खूप दुःखी, निराश झालेल्या.त्या म्हणत मेरी आवाज, अंदाज ओर हुस्नकी तारीफ तो सभीने कि मगर सच्चा हमसफर कोई न मिला. झोपेसाठी औषध म्हणून एक पेग ब्रॅंडी पिण्याची परवानगी डाॅक्टरांनी दिलेली. तिथेच घात झाला. दुःखापासून दूर जाण्यासाठी त्यांनी अगदी चुकीचा मार्ग निवडला.१९६४ च्या सुमारास मीनाजींना "Liver Sirrhosis चे निदान झाले. अतिरिक्त मद्यसेवनाने त्यांचे लिव्हर खूप खराब झालेले. त्या उपचारासाठी लंडन आणि स्वित्झर्लंड येथे गेल्या होत्यां. चार महिन्यानंतर त्या परत आल्या. मद्यापासून पूर्णपणे दूर झालेल्या.थोड्या विश्रांतीनंतर त्यांनी पुन्हा कामही सुरु केले. नंतर आलेल्या *काजल* मधे राजकुमार, धर्भेंद्र, पद्मिनी असे सह कलाकार होते. प्रसिध्द हिंदी साहित्यिक गुलशन नंदा ह्यांच्या "माधवी" ह्या कादंबरीवर आधारीत होता. यातल्या भूमिकेबद्दल मीनाजींना शेवटचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.त्यानंतर *भिगीरात* (सुनिलदत्त), पूर्णिमा, फूल और पत्थर, ,बहारोंकी मंजिल (धर्मेंद्र) नूरजहान,बहुबेगम (प्रदीप कुमार) हे चित्रपट! आले. मीनाजी आणि कमाल अमरोही या दोघांनी एकत्र बघितलेल सुंदर स्वप्न म्हणजे चित्रपट *पाकिजा*! पाकीजा चा मुहुर्त खरं तर १९५६ साली झालेला. परंतु मीनाजी आणि कमाल अमरोही यांच्यात काही बेबनाव झाल्याने शूटिंग थांबले. नर्गिस, सुनिल दत्त, खय्यामजी आणि त्यांची पत्नी जगजित कौर यांच्या मध्यस्थीमुळे ९ वर्षांनी मीनाजींनी पाकिजा साठी पुन्हा काम सुरु केले.पण आता अशोक कुमार प्रौढ दिसू लागले. मीनाजींच पण वय वाढलेलं! आजाराने शरीर बेढब आणि खिळखिळीत झालेल. पण या सर्वावर मात करुन, शक्य तिथे विशेषतः नृत्यात डुप्लीकेट (पद्मा खन्ना) वापरुन शूटिंग लवकरात लवकर पूर्ण केले.फेब्रुवारी '१९७२ ला "मराठा मंदीर" येथे पहिला शो होता. त्यानंतर मीनाजींची तब्येत ढासळतचं गेली. एलिझाबेथ नर्सिंग होम मध्ये त्यांना दाखल केले.एवढ्या कष्टाने पूर्ण केलेला चित्रपट म्हणावा तेवढा चालला नाही. मात्र ३१ मार्च १९७२ रोजी मीनाजींच्या निधनानंतर चित्रपट "न भूतो न भविष्यती" असा चालला. मीनाकुमारी एक अत्यंत सह्रदय व्यक्ती होती जिनं आयुष्यात सगळ्यांना भरभरुन दिलं पण दुर्दैवाने तिची ओंजळ रितीचं राहिली. नको त्या वयात आलेल्या जबाबदारीने बालपण करपलेच होते. नंतरच्या आयुष्यात त्या खरं प्रेम शोधत राहिल्या. करीयर सुरु होतानाचं वडिलांच्या मर्जीविरुध्द जाऊन त्यांनी गुपचुप लग्न केलं तेही जेमतेम १० वर्ष टिकलं. लहानपणी आई वडिलांसाठी नंतर नवर्यासाठी त्या पैसा कमवतं राहिल्या. त्या काळच्या त्या सर्वाधिक मानधन घेणार्या अभिनेत्री होत्या. अनेकांचे करीयर घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यातीलच एक नाव धर्मेंद्र! पण ज्या मीनाने लोकांना लाखो रुपयांची मदत केली त्या मीनाकडे शेवटी हाॅस्पीटलचे बिल भरण्यास पुरेसू पैसे नसावते यापेक्षा आणखी दैवदुर्विलास कोणता??? एका चित्रपटात मुमताजने मीनाजींच्या सांगण्यावरुन काम केलं पण आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने त्या मुमताजला ३ लाख रुपये देऊ शकल्या नाहीत. सर्व परिस्थिती जाणतं असल्याने मुमताजनेही ते कधी मागितले नाहीत. मीनाजींनी जायच्या काही दिवस आधी त्यांनी स्वतःचा वांद्रे येथील बंगला मुमताजच्या नावे केलाज्यात तिचा भाऊ आजही आपल्या कुटुंबा सहीत रहातो. त्यांच्या लोकप्रियतेचा एक किस्सा सांगतात. एकदा चित्रपटाच्या शूटिंग साठी मीनाजी कमालजभीं सहीत मध्यप्रदेश मधे शिवपुरी येथे गेल्या असताना पेट्रोस संपल्याने गाडीत थांबायचे ठरले. पण डाकूंना सुगावा लागलाच पण आत मीनाकुमारी दिसताच लुटायला आलेलं विसरुन आनंदानी बेहोष झाले. त्यांची जवळपासच्या हवेलीत रहाण्याची सोय केली. सकाळी गाडी जायला निघणार एवढ्यात त्यातल्या एकाने चाकू पुढे केला आणि चाकूच्या टोकाने हातावर नाव लिहिण्याची विनंती केली. मीनाजींनी थरथरत्या हाताने चाकूने आपले नाव त्याच्या हातावर लिहीले तेव्हात त्यांची सुटका झाली. हा चंबळचा कुप्रसिध्द डाकू अमृतलाल होता. मीनाजी एलिझाबेथ नर्सिंग मधे नेण्याचे ठरले.आप्तस्वकीय, नोकर, ड्राईव्हर, लिफ्टमन, चाहते सगळेच शोकाकुल अवस्थेत! मीनाजींना अॅम्ब्युलन्समधे ठेवणार एवढ्यात रस्त्यावरची झाडूवाली धावत आली आणि त्यांना असं बघून ओक्साबोक्शी रडू लागली मीनाजींनी तिच्या डोक्यावर थापटून बहिणीच्या हातातली त्यांची पर्स तिच्या हातात दिलीं. न जाणो त्या पर्समधे किती पैसे असतील. मीनाजी उत्तम शायरी करत. कथाही लिहीत.फार थोड्या लोकांना माहित असेल कि मीनाजींची आजी हेमसुंदरी ठाकूर(टागोर) ही रविंद्रनाथ टागोरांच्या धाकट्या भावाची मुलगी. कदाचित साहित्य आणि काव्याची जाण ही त्यांना आजोळाकडून आली असावी. *नाज* ह्या नावाने असलेलं सर्व साहित्य मीनाजींनी जाताना गुलजारजींच्या स्वाधीन केलं होतं आणि गुलजारजींनी ते प्रसिध्दही केलं. त्यातल्या मला अत्यंत आवडलेल्या *चांद तनहा*...या कवितेच्या चार ओळी.. चांद तनहा है आसमां तनहा दिल मिला है कहां कहां तनहां छोड जाएंगे सदियोंतक याद करेंगा ये जहां तनहां.... मीनाजींच्या चित्रपटातील काही सुंदर गाणी आणि चित्रपट.. *बैजू बावरा* *मोहे भूल गएसावरिया *तू गंगाकी मौज मैं जमनाका धारा *आज गावत मन मेरो झूमके *झूलेमें पवनके आई बहार *परिणिता* गोरे गोरे हाथोमें मेहेंदी रचाके * आझाद* *बचपनके दिन भुला न देना *राधा ना बोले ना बोले *कितना हंसी है मौसम * एक ही रासता* *सांवले सलोने आए दिन बहारके *चली गोरी पी केमिलन को चली , *शारदा* * ओ चांद जहां वो जाए *मिस मेरी* *ब्रिंदावनका किशन कन्हैया *ओ राके मुसाफीर चंदा जरा बतादे *ये मर्द बडे दिल सर्द बडे *चिराग कहां रौशनी कहां* *टिम टिम करते तारे *चल मेरे घोडे टिक टिक टिक *.दिल अपना प्रीत पराई* *अजीब दासतां है ये *अंदाज मेरा मस्ताना *चार दिल चार राहे* *कच्ची है उमरिया कोरी है चुनरिया मोहे भी रंग देता जा *कोहीनूर* *दो सितारोंका जमींपर है मिलन *कोई प्यारकी देखे जादूगरी *दिलमें बजी प्यारकी शहनाईया यहुदी* मेरी जां मेरी जां प्यार किसीसे हो ही गया है ये मेरा दीवानापन है *आरती* *अब क्या मिसाल दूं *बार बार तोहे क्या समझाए *.कभी तो मिलेगी कहीं तो मिलेगी *आपने याद दिलाया तो मुझे याद आया *साहब बीबी और गुलाम* *न जाओ सैंया छुडाके बैंया *कोई दूरसे आवाज दे चले आओ *साकिया आज मुझे नींद नहीं आएगी *मैं चूप रहूंगी* *कोई बतादे दिल हैं जहा *मेरे दिल कभी तो कोई आएगा *दिल एक मंदीर* *यहा कोई नहीं तेरा मेरे सिवा *दिल एक मंदिर है *रुक जा रात ठहर जा *याद न जाए बीते दिनोंकी *हम तेरे प्यारमें सारा आलम *जुही की कली मेरी लाडली *अकेली मत जईयो* *ये तो कहो कौन हो तुम *थोडी देरके लिए मेरे हो जाओ *चित्रलेखा* *संसार से भागे फिरते हो *काहे तरसाए जियराm *मन रे तू काहे ना धीर धरे *ए री जानेना दूंगी *सखीरी मेरा मन आज उलझे तन डोले *सांझ और सवेरा*.. *यहीं है वो सांझ और सवेरा *अजहूं न आए बालमा *गझल*.. *रंग और नूरकी बारात किसे पेश करु *नगमा ओ शेरकी सौगात किसे पेश करू *काजल* *तोरा मन दर्पण कहलाए *छुन छुन घुंगरु बोले *छू लेने दो नाजुक होठोंको *भीगीरात* दिल जो न कह सका वही राज ए दिल *पूर्णिमा* *हमसफर मेरे हमसफर पंख तुम परवाज हम *फूल और पत्थर* *सुनले पुकार आई आज तेरे द्वार लेके * शीशेसे पी या पैमानेसे पी *मंझली दीदी* *तुम मुझे भूलभी जाओ तो ये हक है तुमको *बहुबेगम*... *हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक *दुनिया करे सवाल तो हम क्या जवाब दे *पाकिजा* *चलते चलते यूंही कोई मिल गया था *थाडे रहियो ओ बांके यार रे *मौसम है आशिकाना कृपा देशपांडे...

Comments