Skip to main content

देव आनंद ***

"मैं जिंदगीका साथ निभाता चला गया, हर फिक्रको धुएमें "मैं जिंदगीका साथ निभाता चला गया, हर फिक्रको धुएमें उडाता चला गया"...हे गीत ज्याच्या जीवनशैलीला अगदी चपखल बसते, असा चिरतरुण,स्टायलिश,चैतन्यमूर्ती, देवआनंद!...देवसाब.!त्यांच्याविषयी आज लिहाय प्रयत्न केलाय! देवआनंदनी Lahore Govt. College मधून English litterature घेऊन Graduatation केलं होतं. चित्रपटाच्या वेडापायी अवघे तीस रुपये खिशात ठेऊन मुंबई गाठली.सुरुवातीला के ए अब्बास यांच्या बरोबर राहिले. नंतर सधी येताच पुणे गाठले. प्रभात कंपनीत हिरोसाठी auditions चालल्या होत्या. तिथे देवआनंद audition तर पास झाले पण प्रभातच्या बाबुराव पै यांनी त्यांच्या दाताला दोन्ही बाजूला असलेल्या गॅप मुळे दाताला कॅप बसवायला सांगितली. पण त्या कॅपमुळे देवआनंद ना बोलायला त्रास व्हायला लागला तेव्हा त्यांनी ती काढून टाकली. पण खरं तर ती गॅपच त्यांच्या हसर्या चेहेर्र्याच्या गोडव्यात भरचं घालते. देवआनंद यांना पहिला एक चित्रपट मिळाला.."हम एक है"...तिथे योगायोगाने गुरुदत्त पण होते. एकदा धोब्याकडून नजर चुकीने त्यांचे shirts बदलले गेले. अशा प्रकारे झालेल्या भेटीचे मैत्रीत रुपांतर झाले. दोघांनी एकमेकांना वचन दिले कि ज्याला पहिली संधी मिळेल त्याने दुसर्र्याला पण बरोबर घ्यायचे. जेव्हा देवआनंद यांनी मोठ्या बंधूंबरोबर "*नवकेतन*" चित्रपट संस्था स्थापन केली. प्रथम नवकेतनच्या बॅनरखली बनलेले काही गाजलेले चित्रपट.... *नवकेतनचा* पहिलाचित्रपट *अफसर* पण व्यावसायिक यश मिळालेला चित्रपट *बाजी*..देवआनंदने आपला शब्द पाळला. त्यांनी दिग्दर्शक म्हणून गुरुदत्त ना संधी दिली! त्यातली ही गाणी खूप गाजली. *तदबीरसे बिगडी हुई तकदीर बनाले* *सुनो गजर क्या गाए समय गुजरता जाए* त्यानंतर *जाल*.. *ये रात ये चांदनी फिर कहां सुन जा दिलकी दासतां* *चोरी चोरी मेरी गली आना है बुरा आके बिना बात किए जाना है बुरा* ...ही दोनही गाणी सुपरहीट झाली... *टॅक्सीड्राईव्हर* त्यात नायिका होती कल्पना कार्तिक, जिच्याशी देवसाहेबांचे सूर जुळले आणि त्यांनी लग्न केले. टॅक्सी ड्रायव्हरची सगळीच गाणी हीट होती.. *जाये तो जाए कहां समझेगा कौन यहां* *दिल जले तो जले गम पले तो पले* *जीनेदो और जियो चढती जवानीके दिन है *House No. 44* *फैली हुई है सपनोंकी बाहे* *चुप है धरती चुप है चांद सितारे* *तेरी दुनियामें जीनेसे*... मग *C I D* यात नायिका शकीला असून वहिदाचा रेहेमानचा हा पहिला चित्रपट.... *लेके पहला पहला प्यार* *आंखोही आखोमे इशारा हो गया* *बूझ मेरा क्या नाव रे* *कहींपे निगाहे कहींपे निशाना* मग आला..*फंटूश*....नायिका..शीला रमानी...यात किशोरदांचे *दुखी मन मेरे सुन मेरा कहना* आणी *आ मेरी टोपी पलटके आ* ही दोन्ही गाणी छानच! दरम्यान च्या काळात चेतन आनंद *नवकेतन* मधून बाहेर पडले आणि विजय आनंद यांनी दिग्दर्शक म्हणून धडाक्यात entry केली...चित्रपट होता *नौ दो ग्यारह*.... *आजा पंछी अकेला है* *हम है राही प्यारके, हमसे कुछ न बोलिये* *आंखोमें क्या जी रुपहला बादल* ही गाणी खूपच गाजली. त्यानंतर *तेरे घरके सामने*..सोबत नूतन! सदाबहार संगीत.... *दिलका भंवर करे पुकार* *तू कहा ये बता इस नशीली रातमें* *ये तनहाई हाए रे हाए*...काय अवीट गोडीची गाणी.. यानंतर आला *कालापानी* या मधे होती मधुबाला..*अच्छाजी मैं हारी चलो मान ओ ना* मधला देवचा झूठमूठका गुस्सा आणि मधुबालाची आर्जवं कोण विसरु शकेल. लगेचच आला '*कालाबाजार* सोबत वहिदा रेहेमान! *अपनी तो हर आह एक तूफानहै... *सच हुए सपने तेरे झूमले ओ मन मेरे*.. *हम दोनो*...नवकेतनची अजून एक सुंदर निर्मिती..देवआनंदचा डबल रोल..साधना आणि नंदा ह्या दोन नायिका..,याचे अप्रतिम संगीत सचिनदांचे सहाय्यक जयदेव यांचे होते. *मैं जिंदगीका साथ निभाता चला गया* *अभी ना जाओ छोडकर* *अल्ला तेरो नाम ईश्वर तेरा नाम* त्यानंतरचा *गाईड*... देवआनंदच्या कारकिर्दितला *माईलस्टोन* एका टूरीस्ट गाईडच्या जीवनावर आधारीत "आर के नारायण" ह्यांची कसदार कथा, विजय आनंद ह्यांचे अप्रतीम दिग्दर्शन देव वहिदा यांचा सशक्त अभिनय!...ह्याचे दोन वर्जन बनले...हिंदी, इंग्लिश...एक सर्वांग सुंदर चित्रपट *गाईड* *तेरे मेरे सपने अब एक रंग है* * गाता रहे मेरा दिल* * कांटोंसे खींचके ये आंचल* * क्या से क्या हो गया* *पिया तोसे नैना लागे रे* *मोसे छल किये जाए *वहां कौन है तेरा...सचिनदांनी स्वतः गायलेले... *ज्वेलथिफ* वैजयंतीमाला आणि तनुजा या दोन नायिकांबरोबर... *रुलाके गया सपना मेरा* *होठोंमें ऐसी बात मैं दबाके चली आई* *दिंल पुकारे आरे आरे आरे* *आंसमां के नीचे हम आज अपने पीछे "हरे रामा हरे कृष्णा"..एक वेगळ्या पठडीतला. घरच्यां तणावग्रस्त वातावरणाने एक तरुण मुलगी हिप्पींच्या समुहाकडे वळली जाते. भाऊ त्यातून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो...पण ती इतकी नशेच्या आहारी गेलेली असते कि पुन्हा मूळ प्रवाहात यायला तिचे मन कचरते आणि ती आपला शेवट करुन घेते.याबाबत थोडं विस्ताराने लिहिलं कारण आतापर्यंत ह्या सगळ्या चित्रपटांना सचिनदांचे सुमधूर संगीत होते...एकापेक्षा एक सरस गाण्यांची बरसात त्यांनी जवळ जवळ दहा बर्ष केली होती...पण ह्या चित्रपटास संगीत देण्यास त्यांनी नकार दिला. त्यांच्या दृष्टीने चित्रपटाचा विषय थोडा बोल्ड होता. शेवटी त्याचेच सुपुत्र पंचम ह्यानी त्या चित्रपटालका बहारदर संगीत दिले. *दम मारो दम मिट जाए गम* *कांची रे कांचीरे प्रीत मेरी सांची* *फूलोंका तारोंका सबका कहना है* *देखो ओ दिवानो तुम ये काम ना करो* त्यानंतर ही Johny मेरा नाम, तेरे मेरे सपने,प्रेमपुजारी, इश्क इश्क इश्क, शरीफ बदमाश,देस परदेस असे सुमारे ३५/३६ चित्रपट नवकेतन ह्या Productio house ने बनवले. नवकेतन च्या व्यतिरिक्तही देवआनंदचे अनेक चित्रपट आहेत. जाता जाता काहींचाच उल्लेख. सर्वप्रथम नाव येतं ते *बंबई का बाबू* नायिका सुचित्रासेन..कथानक, अभिनय,संगीत सर्वच अतिउत्तम.. *साथी ना कोई मंजिल* *चलरी सजनी अब क्या सोचे* *दीवाना मस्ताना हुआ दिल* *देखनेमें भोला है दिलका सलोना* अजून थोडे उल्लेखनीय.. *महल* ये दुनियावाले पूछेंगे आंखोआखोमें हमतुम *तीन देविया* ये दिल न होता बेचा ख्वाब हो तुम या कोई *लव्हमॅरेज* धीरे धीरे चल चांद कहे झूम झूम रात ये सुहानी *असली नकली* तेरा मेरा प्यार अमर तुझे जीवनकी डोरसेबांध लिया है *प्रेमपुजारी* फूलोंके रंगसे दिलकी कलमसे रंगीला रे तेरे रंगमें यूं रंगा है देवआनंद अभिनयासाठी कधीच प्रसिध्द नव्हते. लोकांना ते आवडायचे ते त्यांच्या stylish, रुबाबदार रहाणीसाठी, विनम्र वागण्यासाठी, वेगळेपणासाठी...त्यांना त्यांच्या सहकलाकारांची स्पर्धा वाटली नाही. आपल्या चित्रपटाचे संगीत चांगलेच असेल ह्याची ते काळजी घेत. त्यांचे नंतरचे कितीतरी चित्रपट आले आणि गेले. काही प्रेक्षकांना नाही रुचले. पण हा माणूस कधी निराश झाला नाही, कधी स्वस्थ बसला नाही. लगेचच पुढच्या चित्रपटच्या कथानकावर विचार चालू असे.सतत काहीतरी वेगळं, creative करण्याचा त्यांचा ध्यास असायचा. चित्रपट हेच त्याच विश्व होतं. देवसाहेबांवर लिहायला अजून खूप आहे पण कसं आणि किती लिहिणार! जाता जाता देव साहेबांच्या हळुवार कप्प्पाबद्दल. *विद्या* चित्रपटाच्या शूटींग दरम्यान देवसाहेब आणि सुरैया खूप जवळ आले होते. दोघांनाही लग्न करायचे होते. पण सुरैयाच्या कर्मठ आजीला हे बिलकुल नापसंत होते. यात सुरैयाने माघार घेतली आणी एक उत्कट प्रेमकहाणी अपुरीच राहिली.. *ये न थी हमारी किस्मत के विसाल- ए- यार होता,अगर और जीते रहते यही इंतजार होता* वयाच्या ८८ व्या वर्षी चिरतरुण देवसाहेबांचे लंडन येथे दुःखद निधन झाले... कृपा देशपांडे..

Comments