Skip to main content

Suman Kalyanpur...

आज भेटीला येतेय माझी खूssssssप आवडती गायिका जी मधूर आवाजाचे आणि सोज्वळ सौंदर्याचे मूर्तिमंत प्रतिक आहे..... सुमन कल्याणपूर! त्यांचा जन्म २८ जानेवारी १९३७ साली ढाक्का येथे झाला. वडील शंकरराव हेमाडी Central बॅंक ऑफ़ इंडिया मधे मोठ्या हुद्यावर! तसे हे कुटुंब मूळचे मॅंगलोर, कर्नाटक येथील सारस्वत ब्राह्मण. ढाका येथे रहात असताना आर सी बोराल, के सी डे, के एल सैगल, काननबाला यांच्या गाण्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. तसचं सचिन देव बर्मन यांची बंगाली गाणी, रविंद्र संगीत त्या खूप ऐकायच्या. १९४२ मध्ये हे कुटुंब मुंबईला आले. सुमनताईंच्या चित्रकला आणि संगीत या दोन कला खूप आवडीच्या. प्रभातचे केशवराव भोळे यांच्याकडे त्या संगीत शिकू लागल्या. "कोलंबिया" हायस्कूल मधे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी "जे जे स्कूल आफ आर्टस" मधे प्रवेश घेतला. पण जेव्हा संगीत हे फक्त आवड म्हणून नाही, तर त्यातंच करीयर करायचं असं ठरल्यावर त्यांनी "उस्ताद खान अब्दुल खान" आणि गुरुजी मा.नवरंग यांच्या कडे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. प्रथम जरी हौस आवड म्हणून गाणं शिकल तरी बाहेर जाहीर कार्यक्रम करायला बंदी होती. पण जेव्हा १९५२ ऑल इंडिया रेडियो कडून गायची संधी आली तेव्हा मात्र त्या नाही म्हणू शकल्या नाहीत. १९५३ मधे "शुक्राची" चांदणी ह्या मराठी चित्रपटात एक गाणं म्हटलं. तेव्हाच शेख मुख्तार *मंगू* नावाचा चित्रपट बनवत होते. संगितकार महंमद शफी होते. सुमनजीं बरोबर ३ गाणी संगीतबध्द झाली आणि काही कारणाने शफी चित्रपट सोडून गेले आणि त्यांच्या जागी ओ पी नय्यर आलें. त्यांनी त्यातलं एकच गाणं चित्रपटात ठेवलं ते "कोई पुकारे धीरेसे" हे अंगाईगीत होतं. नंतर १९५४ साली *दरवाजा* ह्या चित्रपटा साठी सं. नाशाद यांनी ५ गाणी संगीतबध्द केली. खरं तर "मंगू" हा त्यांचा साईन केलेला पहिला चित्रपट पण निर्मात्या ईस्मत चुगताई आणि दिग्दर्शक शाहिद लतीफ यांचा " दरवाजा" पहिला रिलीज झाला. ह्या चित्रपटात तलत मेहेमूद यांच्या बरोबर त्यांचे एक ड्यूएट आहे. "एक दिल दो है तलबगार बडी मुश्कील है"! तलतजी सुमनजींचे गाणे एका concert मधे ऐकून, प्रभावित झाले. त्यावेळी नवीन कलाकार असूनही त्यांची गाण्याची तयारी एवढी चांगली होती की त्यांच्या बरोबर गाणं गायची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. ती संधी एवढ्या लवकर येईल असे सुमनजींना वाटले नव्हते. त्याच वर्षी "आरपार" ह्या चित्रपटात *मुहब्बत करलो जी करलो अजी किसने रोका है* या गाण्यात कोरस सदृश काही सोलो लाईन्स आहेत. बस! ओ पीं बरोबरचे त्यांचे हे पहिले आणि शेवटचे गाणे! त्यानंतर साठच्या दशकात त्यांना मिया" बीबी राजी", "बात एक रातकी", "दिल एक मंदीर", "दिल ही तो है," "साथी" "शगुन", "जहांआरा","पाकिजा" अशा चांगल्या बॅनरच्या चित्रपटात शंकर जयकिशन, रोशन, मदन मोहन, सचिन देव बर्मन, चित्रगुप्त, हेमंत कुमार गुलाम महंमद आणी लक्ष्मी कांत प्यारेलाल अशा सर्व प्रस्थापित संगीतकारांकडे गाण्याची संधी मिळाली. त्यात "शंकर जय किशन" आणि "रोशन"जीं बरोबर त्यांनी जास्त काम केलयं! ६०च्या दशकात Royalty वरून वाद झाल्याने काही काळ लताजी रफीजीं बरोबर गात नव्हत्या त्यामुळे सहाजिकच संगीतकारांनी ती गाणी सुमनजींकडून गाऊन घेतली. त्याच दशकातलीच त्यांची सुमारे १४० युगलगीतं आहेत. हिंदी प्रमाणेच मराठीत सुध्दा सुमनताईंनी असंख्य गाणी गायली त्यात चित्रपटा पेक्षा भावगीते आणि भक्तीगीतांची संख्या अधिक आहे. पहीलं चित्रपटगीत गायचीसंधी त्यांना "पसंत आहे मुलगी" ह्या चित्रपटात सं. वसंत प्रभू यांनी दिली.त्या नंतर एकटी, पुत्र व्हावा ऐसा, अन्नपूर्णा, मोलकरीण, मानिनी इ. चित्रपटातली सुमनजींची गाणी खूपच गाजली. इतर भाषातली विशेषतः बंगाली गीते पण खूप प्रसिध्द आहेत. त्यांनी मराठीत सुधीर फडके, दशरथ पुजारी,अशोक पत्की, कमलाकर भागवत आणि यांच्या बरोवर जास्त काम केलं. दशरथ पुजारीं बरोबरची सगळीच भक्तिगीते फारचं प्रसिध्द आहेत. १९५८ साली सुमनताईंचं लग्न झालं. सासर कडूनही त्यांच्या गाण्याला नेहमी प्रोत्साहनच मिळाल. लताजीं बरोबर सुमनताईंनी एकमेव युगलगीत गायलं ते १९५९ साली आलेल्या *चांद* ह्या चित्रपटात, हेमंत कुमार ह्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली! *कभी आज, कभी कल, कभी परसो, ऐसेही दिन बीते बरसो, हमारी सुनते ही नहीं साजना,देखोजी सुनते ही नहीं साजना* लताजीं बरोबर गायचं म्हणून त्यांना खूप टेंशन आलं होतं पण हेमंतदा त्यांना म्हणाले जरुरीपेक्षा वरचा स्वरात गाऊ नको आणि लताजींना अजिबात फॉलो करु नको. तुझ्या पध्दतीने गा! त्यांच्या आवाजात इतका सारखेपणा आहे कि हेडफोन लावून ऐकलं तरचं किंचीत फरक जाणवतो.नक्की ऐका. असं म्हणतात कि रेडियो सिलोन वर जेव्हा गाणी लागायची तेव्हा दोघींच्या आवाजातील साम्यामुळे गायिकेच्या नावात खूप गोंधळ होई. आणि गाणं सुमनजींच असलं तरी गायिका लता मगेशकर असं सांगितलं जाई. "न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने" या गाण्याच्या वेळी तर लोक मानेनात कि ते गाणं लताजींचं नाही आहे. ग्रामोफोन रेकार्ड वर सुध्दा चुकीचे नाव छापले जाई.पुढे पुढे जेव्हा कन्फ्युजन असे तेव्हा ते गायिके चं नाव सांगतचं नसतं. अर्थात सुमनजीं वर त्याचा काही परीणाम झाला नाही. त्या आपले काम चोख करत राहील्या. स्वतः सुमनजी सांगतात कि कॉलेजच्या दिवसात त्यांच्यावर लताजींच्या आवाजा चा खूप प्रभाव होता. "साम" टी व्ही वरच्या एका मुलाखतीत स्वतः सुमनजींनी हे सांगितलयं म्हणून या गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. १९६४ साली "ए मेरे वतनके लोगो" हे सुप्रसिध्द गाणं नेहेरुं समोर सुमनताई म्हणणार होत्या. तशा तालमी पण झाल्या होत्या. पण आयत्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की हे गाणं तुम्हाला गाता येणार नाही तुम्ही दुसरी गाणी म्हणा. त्यांना हे खूप धक्कादायक होतं. त्या म्हणतात कि मला अजूनही कळलं नाही कि ते गाणं माझ्याकडून कां हिरावून घेण्यात आलं? हे लिहिण्यामागे सुमन ताईंची GENUINE खंत जाणवली ती मांडणं एवढाच उद्देश आहे. ५० आणी ६० च्या दशकात लताजी आणि आशाजींचचं सगळीकडे प्रभुत्व होते. पण तरीही सुमनजींनी आपले अस्तित्व टिकवले. त्या स्पर्धेतही मागे न पडता स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. लताजींच्या आवाजाशी विलक्षण साम्य असून कधिही त्यांची कॉपी केली नाही. त्यांना "सूर सिंगार संसद" हा सन्माननीय पुरस्कार तीन वेळा मिळाला. "ग दि माडगूळकर" पुरस्कार मिळाला पण दुर्दैवाने कोणताही चित्रपट पुरस्कार मिळाला नाही अगदी तोडीची गुणवत्ता असूनही याचे खूप वाईट वाटते. मी ९वी किंवा १०वी त असेन त्यावेळी! माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीमुळे सुमन ताईंना प्रत्यक्ष बघण्याचा योग आला. तेव्हा एवढी समज नव्हती पण अजून त्यांची गोड हसरी मूर्ती डोळ्यासमोर आहे. गेल्या वर्षी त्यांचा ८० व्या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या "षण्मुखानंद हॉल " मधे कार्यक्रम झाला तेव्हा त्यांनी काही गाणी म्हटली. आवाजात तोच गोडवा, कंपन नाही थरथर नाही..खरचं दैवी देणगी! सुमनताईंना परमेश्वराने दीर्घ आणि निरोगी आयुष्य द्यावे ही प्रार्थना! सुमनजींची काही निवडक सुंदर गाणी... जरुर ऐका . ओळखीचे वाटत नसेल तर यू ट्यूब वर ऐका. खूप छान आहेत. Duet songs... *मनमोहन मनमें हो तुम्ही मोरे अंगअंगमें तुम ही समाए *आजकल तेरे मेरे प्यारके चरचे हर जबानपर *तुमने पुकारा और हम चले आए *तुमसे ओ हसीना ये दिलकी हालत न मैंने करनी थी *ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे *ठहरिये होशमें आ लूं तो चले जाईयेगा *दिल एक मंदीर है प्यारकी जिसमें होती है पूजा ये प्रीतम का घर है *दिलने फिर याद किया बर्कसी लहर आयी है *चुरा ले न तुमको ये मौसम सुहाना *गरजत बरसत सावन आयोरे *आया न हमको प्यार जताना प्यार तुझीसे हम करते है *परबतोंके पेडोंपर शामका बसेरा है *कितना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदार *आपसे हमको बिछडे हुए एक जमाना बीत गया *ऐसे न कहो बात के मर जाए कहीं हम *अजहूं ना आए बालमा सावन बीता जाए *के जां चली जाए जिया नहीं जाय *तुझे प्यार करते है करते रहेंगे *दिले बेताब को सीनेसे लगाना होगा *दिलकी किताब कोरी है *रात सुहानी जाग रही है धीरे धीरे *तुझे देखा तुझे चाहा तुझे पूजा मैंने *तू जंगल की मोरनी ते मैं बागादा मोरp *ये किसने गीत छेडा दिल मेरा नाचे थिरक थिरक *मेरा प्यार भी तू है ये बहार भी तू है *जबसे हमतुम बहारो खो बैठे तुम नजारोमें *न जाने कहां तुम थे न जाने कहां हम थे *तुम जो आओ तो प्यार आ जाए *ये दिन दिन है जिंदगीके आजारे आजा मेरे साथी *तुम्हे दिलसे चाहा तुम्हे दिल दिया है *ये परबतोंके दायरे ये शामका धुआं Solo songs.... *न तुम हमें जानो न हम तुम्हे जाने *मेरे मेहेबूब न जा आजकी रात न जा *रहे ना रहे हम महका करेंगे (हे गाणे' चित्रपटात छौ लताजीं च्या आवाजात पण आहे) *अल्ला तू करम करना मौला तू रहम करना *हाले दिल उनको सुनाया न गया *चले जा चले जा चले जा ज प्यार मिले *कोई गीत सुहाना मेरे संग गा गुनगुना *जुही की कली मेरी लाडली *छोडो छोडो मोरी बैंया सांवरे *शराबी शराबी ये सावन का मौसम *फुलवा बन महके देखो लहके डाली डाली *दिल गम से जल रहा है पर धुआं ना हो *यूंहीं दिलने चाहा था रोना रुलाना *ना जाने कैसे पलमें बदल जाते है *अखियोंका नूर है तू अखियोंसे दूर है तू फिर भी ।पुकारे चले जाएंगे *डारी की डारी तेरी डार कल है इतवार के मुन्ना जाएगा बाजार निवडक मराठी गाणी... *जिथे सागरा धरणी मिळते *इथून द्रृष्ट काढते निमिष एक थांब तू *उमा म्हणे अग्नी माझे जळाले माहेर *पिवळी पिवळी हळद लावली *झिमझिम झरती श्रावणधारा *शब्द शब्द जपून ठेव बकुळिच्या फुलापरी *ओंकार प्रधान रुप गणेशाचे *जिथे सागरा धरणी मिळते *भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास *केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर *मृदूल करांनी छेडित तारा *सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले *श्रीरामाचे चरण धरावे *अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर *देवा दया तुझी की ही शुध्द दैव लीला *असावे घरटे अपुले छान *जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे *गेला सोडून मजसी कान्हा *जेथे जातो तेथे तू माझा सांगाती *वाट इथे स्वप्नातील संपली जणू © कृपा देशपांडे...

Comments