Skip to main content

Mohamad Rafi...

फ्रेंडस! मी आतापर्यंत कलाकार, संगितकार, गीतकार मिळून एकूण ३० लेख लिहिलेत. तुम्ही सर्वांनी मला भरभरुन कमेंटस दिल्यात, कौतुक केलेत. ३१ जुलै हा रफीजींचा स्मृतीदिन! त्यांच्यावर लिहीणे हा खूप अवघड टास्क होता. रफीजी हे एक विद्यापीठ आहे. पण माझ्या शालेय मित्राने विनंती वजा आज्ञा करुन तुला हे नक्की जमेल असा विश्वास दाखवला. विनोद प्रधान हे धाडस केवळ तुझ्यामुळेच आणी हा लेख द ग्रेट रफीसाहेबांना समर्पित! 🙏🌹🙏🌹🙏 अमृतसर जवळ कोटला सुलतानपूर या छोट्याशा प्रांतात रोज एक फकीर फार सुंदर आवाजात एकतार्यावर पंजाबी गीते भजने म्हणत म्हणत गावातल्या मोहल्यां मधे फिरत असे. त्याच्या मागे मागे एक सात आठ वर्षाचा मुलगा जात असे. जी जी गाणी तो फकीर म्हणे तसंतसं तो मुलगा आपल्या गोड आवाजात म्हणत असे. गावातल्या लोकांनाही त्याचे गाणे आव डू लागले. त्या फकिराने पण त्याचे गाणे ऐकून आशिर्वाद दिला एक दिवस खूप मोठा गायक होशील. हा छोटा मुलगा म्हणजे बुलंद आवाजाचा बादशहा महंमद रफी! काही दिवसांनी हे कुटुंब लाहोरला गेले. साधारण 13/14 वय असेल त्यांच! त्यांनी बडे गुलाम अली खां, अब्दुल वाहीद खां, पंडीत जीवनलाल मट्टू आणि फिरोज निजामयांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आहे. रफीजी १३/१४ वर्षाचे असतील.त्यांच्या भावाचे मित्र अब्दुल हमीद त्यांना एकदा ऑल इंडिया रेडियो येथे के एल सैगल यांच्या कार्यक्रमाला घेऊन गेले. दुर्दैवाने तिथली वीज गेल्यामुळे सैगल यांचा कार्यक्रम सुरू झाला नाही. प्रेक्षक येऊन बसलेले. म्हणुन हमीद यांनी वीज येई पर्यंत रफीजींना गाऊ द्यावे अशी व्यवस्थापकांना विनंती केली. प्रेक्षकांनी गोंधळ घालू नये म्हणून त्यांनी पण ती मान्य केली. आणि रफीजींना आपली गायन प्रतिभा पहिल्यांदाच दाखविण्याची संधी मिळाली. प्रेक्षकांमधे संगीतकार श्यामसुंदर पण होते. त्यांना रफीजींचे गाणे खूप आवडले. त्यांच्या गाण्याचा वकूब जाणला. त्यानी रफीजींना मुंबईला बोलावले. रफीजी अब्दुल हमीद यांच्या बरोबर मुंबईत येऊन भेंडी बाजार येथे छोटीशी खोली घेऊन राहू लागले. *शहाजहान* चित्रपटाच्या गाण्यांचे रेका र्डिंग चालू होते. रफीसाहेब तेव्हा कोरस मध्ये गात असत. काही कारणाने एके दिवशी रेकॉर्डिंग रहीत झाले. सगळे जण आपआपल्या घरी निघाले. संगीतकार नौशाद यांनी पाहिले एक मुलगा खाली पायरीवर बसून आहे. नौशाद जींनी घरी कां नाही गेलास असे विचारले असता तो म्हणाला माझ्याकडे पैसे नाहीत. एक रुपया होता तो येतना खर्च झाला. रेकॉर्डिंग झाले असते तर पैसे मिळाले असते. नौशादजींनी त्याला १रुपया देऊ केला पण तो मानी मुलगा म्हणाला जर मी कामच नाही केले तर मी हे पैसे कसे घेऊ ? पण नौशाद साहेबांनी त्याला आशिर्वाद देऊन समजावून तो रुपया घेऊन घरी जायला सांगितले. त्यानंतर मध्ये बराच काळ लोटला. महंमद रफी गायक म्हणून नावारुपाला आले. एक दिवस नौशादजी रफीजींच्या घरी आले असता त्यांना भिंतीवर एक रुपयाचे नाणे फ्रेम मधे चिकटवलेले दिसले. नौशादजींनी त्याबद्दल विचारले असता रफीजींनी ती जुनी आठवण सांगून म्हणाले तुम्हाला आठवतो ना तो मुलगा ज्याच्याकडे भाड्यासाठी पण पैसे नव्हते तेव्हा तुम्ही ज्याला मदत केलीत तो मीच! मला त्या कठीण दिवसांचा विसर पडू नये आणि तुमच्या सारख्या सह्रदय माणसाची आठवण कायम रहावी म्हणून मी त्या दिवशी चालत आलो आणि ते नाणे जपून ठेवले. जेव्हा चार पैसे हातात आले तेव्हा मी ही फ्रेम केली कायम स्वरुपी तुमची आठवण रहावी म्हणून! धन्य धन्य ते रफीजी! रफीजींनी पहिल्यांदा पार्श्वगायन केले ते १९४४ साली आलेल्या "गुलबलोच" ह्या पंजाबी चित्रपटात. संगीतकार शाम सुंदर! त्यानंतर हिंदी चित्रपटात संधी दिली नौशाद यांनी! खरं तर "ए आर कारदार" यांच्या "पहले आप" या चित्रपटात रफीजींनी शामकुमार आणि अल्लाउद्दीन यांच्या साथीने "हिंदुस्तानके हम है" हे गाणे गायले आणि त्याच वेळी नौशाद यांच्याच संगीत दिग्दर्शनाखाली " गांव की गोरी" या चित्रपटात "अजी दिल हो काबूमें" हे गाणे रेकॉर्ड केले. रफीजी हेच त्यांच पहिलं गाणं मानायचे. पण ज्या गाण्याला प्रसिध्दी मिळाली ते १९४६ साली आलेल्या "अनमोल घडी"या चित्रपटतल्या "तेरा खिलौना टूटा बालक तेरा खिलौना टूटा" या गाण्याने! त्यानंतर *शहीद* मधे "वतन की राहमें वतन के नौजवां शहीद हो" *मेला* मधले "ये जिंदगीके मेले" *दुलारी * मधले "सुहानी रात ढल चुकी" अशा प्रसिध्द गाण्यांनतर १९५१ मधे *बैजूबावरा* ह्या चित्रपटात अगदी सर्व गाणी as a main stream गायका प्रमाणे रफीजींना मिळाली. "तानसेन" ह्या राजगायका समोर तोडीस तोड गाणारा हा "बैजू" उभा ठाकतो. यामुळे ती सगळीच गाणी शास्रीय संगीतावर, मुख्यतः *मालकंस* रागावर आधारीत होती. अस ऐकलयं कि ह्या रागात खर्जापासून अगदी वरच्या स्वरापर्यंत रियाज केल्याने रफीजींचा घसा सोलवटून रक्त यायचे.*मन तडपत हरीदरशन को आज* हे गाणे पारंपारीक बंदिश "मुख मोड मोड मुसकात जात" ह्या वर आधारीत आहे. ह्या नंतर नौशाद आणि रफी हे समीकरण द्रृढ झालं. दिलीपकुमार, भारतभूषण, प्रदीप कुमार यांच्यासाठी रफीजींचा आवाज ठरलेला असे. कालांतराने रवीजी,सलीलदा,सचिनदा. जयदेवजी यांची पण पहिली पसंती रफीजींना असे. शंकर जयकिशन सुध्दा रफीजींचाही आवाज वापरु लागले. राजकपूर आणि मुकेश हे समीकरण असतानाही त्यांनी कधी कधी राजजीं साठी रफीजींचा आवाज वापरलाय.उदा. "तुमही तुम हो मेरे जीवनमें" (एक दिल सौ अफसाने) "मैं जिंदगीमें हरदम रोता ही रहा हूं" (बरसात) प्रामुख्याने देवआनंदश्रशम्मीकपूर,जाॅयमुखर्जी,विश्वजीत, धर्मेंद्र, शशी कपूर,प्रदीप कुमार, राजेंद्रकुमार अशा असंख्य नायकांसाठी संगीतकार रफीजींचा आवाज वापरु लागले. शम्मीकपूर आणि रफीजी हे समीकरण इतके हीट होते कि त्यांची अनेक गाणी याची मिसाल आहे. १९५० ते १९७० हा काळ रफीजींनी अक्षरशः गाजवला. प्रत्येक नायकाला वाटे आपलं गाणं रफीजींनीच गावं. १९६० मधे आलेल्या *चौदहवी का चांद* मधे "चौदहवी का चांद हो या आफताब हो" या सुंदर गाण्यासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. संगीत रवी यांच होतं. हे गाणं ऐकताना रफीजींचे मधाळ स्वर कानात साठवायचे की वहिदाचे निरागस सौंदर्य न्याहाळायचेहा प्रश्न कायम पडतो. मग *जंगली*;, *काजल* *दो बदन* *कश्मीर की कली* *प्रोफेसर* *आरजू* *ससुराल* अशा असंख्य चित्रपटातील गाणी प्रचंड गाजू लागली. रफीजींना *ससुराल* मधल्या*"तेरी प्यारी प्यारी सूरतको किसिकी नजर ना लगे चश्मेबद्दूर* या गाण्यासाठी दुसरे फिल्मफेअर मिळाले. लक्ष्मीकांत प्यारेलालजींची सुरुवातच १९६३ मधे आलेल्या *पारसमणी* चित्रपटाच्या *वो जब याद आहे बहोत याद आए* या लता रफीजींच्या अप्रतीम गाण्यानी झाली. रफीजी अतिशय सह्रदयी होते. ते ऐकून होते ही गुणी मुले खडतर परिस्थितीतून संघर्ष करुन इथवर आली आहेत. लक्ष्मी प्यारेंनी जेव्हा रेकॉर्डिंग नंतर रफीजींच्या हातावर १०००/- मानधन ठेवले तेव्हा रफीजींनी खिशातून अजून २ रुपये काढले आणि दोघांच्य हातात ५०१/५०१ रुपये पुढच्या वाटचाली साठी आशिर्वाद म्हणून दिले. केवढं मोठं हे मन! त्या पाठोपाठ १९६५ मध्ये *दोस्ती* चित्रपट आला. "चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे", "मेरा तो जो भी कदम है वो तेरी राहमें है", "जानेवालों जरा मुडके देखो मुझे", "राही मनवा दुखकी चिंता क्यूं सताती है", "कोई जब राह न पाए" अशी एक से एक रफीजींची अप्रतीम गाणी ! "चाहूंगा मैं ... साठी त्यांना ३रे फिल्म फेअर मिळाले. याच सुमारास "कल्याणजी आनंदजी" पण जम बसवत होते. त्यांनी सुध्दा रफीजींना एक से एक बेहेतरीन गाणी दिली आहेत. *जब जब फूल खिले* तील "परदेसियोंसे ना अखियां मिलाना" आणि "एक था गुल और एक थी बुलबुल" ही गाणी तर लोकप्रियतेच्या शिखरावर होती. १९६६ सालच्या *सूरज* चित्रपटातलं *बहारो फूल बरसा ओ* हे पण असेच सुंदर गाणे, ज्याला ४ थे फिल्मफेअर मिळाले. १९६८ मध्ये आलेल्या *ब्रह्मचारी* मध्ये पण रफीजींची *चक्के में चक्का चक्के में गाडी*, *मैं गाऊ तुम सो जाओ*, *दिलके झरोकेमें तुझको बिठाकर*, *आजकल तेरे मेरे चरचे* हर जबानपर अशी सुपर्ब गाणी! ह्यातल्या "दिलके झरोकेमे" साठी पाचवे फिल्म फेअर मिळाले. खरचं रफीजींची ही गाणी अशी आहेत कि यातील कोणते अधिक चांगले हे ठरविणे केवळ अशक्य! १९६९ साली *आराधना* हा चित्रपट आला. सचिनदांचे संगीत! *गुनगुना रहे है भंवर खिल रही है कली कली* आणि *बागोमें* बहार है* ही दोन गाणी रफीजींनी लताजींबरोबर म्हटली आहेत. दुर्दैवाने सचिनदा त्यावेळी आजारी होते.त्यामुळे इतर गाण्यांची जबाबदारी आर डी,बर्मन ह्यांच्यावर होती. त्याच वेळेला रफीजींना "हज"ला जाण्याची संधी आली त्यामुळे *कोरा कागज था ये मन मेरा* आणि *मेरे सपनोंकी रानी* ही गाणी पंचमनी किशोरदां कडून गाऊन घेतली. ही दोनही गाणी हीट झाली आणि पुन्हा समीकरणं बदलली. राजेश खन्नाला किशोरदांचा आवाज चपखल बसला आणि पहिली पसंती किशोरदांना मिळू लागली. रफीजींना त्यामानाने कमी गाणी मिळू लागली. *ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं*, *ये जो चिलमन ह दुश्मन है हमारी* *नफरतकी दुनिया को छोडके प्यारकी दुनियामें*, *क्या हुआ तेरा वादा*, *परदा है परदा* इ. गाणी जणू रफीजींसाठीच बनलेली होती. १९७७ साली आलेल्या *हम किसीसे कम नहीं* मधील *क्या हुआ तेरा वादा* या गाण्यासाठी त्यांना शेवटचे म्हणजे ६ वे फिल्मफेअर मिळाले. रफीजी एक निर्व्यसनी, हसमुख,दिलदार,समर्पित सच्चे मुस्लिम व्यक्ती होते.सदैव कुणाच्याही मदतीला धावून जात.सचिन पिळगावकर यांनी सांगितलेलाएक प्रसंग अगदी बोलका आहे. एका निर्मात्याल्या काही कारणाने बायकोला घेऊन घर सोडावे लागले. रहायला घर नाही. रफीजींचा चांगला परीचय होता.रफीजी नुकतेच नवीन बंगल्यात शिफ्ट झालेले. रफीजींच्या घरी तो आल्यावर साहजिकच त्याने घडलेली गोष्ट सांगितली व त्यांच्या जुन्या घरात रहायची परवानगी मागितली. रफीजींनी काहिही लिखापढी न करता, भाडेही न ठरवता घराची चावी त्याला दिली. तो त्या जागेत दीड दोन वर्ष राहिला. काही दिवसांनंतर त्याच निर्मात्याच्या चित्रपटाचे रेकॉर्डिंग होते. रफीजींबरोबर लताजी आणि किशोरदा पण होते. टेक ओके झाल्यावर सगळे रेकॉर्डिंग रुमच्या बाहेर आले. निर्मात्याने दोन बुके आणले. एक लताजींना दिला. रफीजींना वाटले दुसरा आपल्याला असेल म्हणून ते पुढे सरसावणार एवढ्यात तो बुके किशोरदांना देण्यात आला. विचार करा काय अवस्था झाली असेल रफीजींची!तो जमाना किशोरदांचा होता आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी ही दुनिया! रफीजी झटकन तिथून निघून गेले आणि कधिही कुणाचीही पैशासाठी अडवणूक न करणार्या रफीजींनी जाता जाता आपल्या माणसाला सांगितले, पुरे पैसे लेके आना, एक पैसा भी कम नहीं! १९६० च्या सुमारास त्यांचा रॉयल्टी वरुन लताजींशी वाद झाला होता. लता जींचे म्हणणे होते संगीतकारां प्रमाणेच रॉयल्टीचा काही हिस्सा गायकांना ही हवा तर रफीजींना वाटत होते कि एकदा गाण्याचे मानधन घेतल्यावर पुन्हा रॉयल्टी घेणे योग्य नाही. कडाक्याचे वाद झाले आणि लताजींनी रफीजींच्या बरोबर गायचे बंद केले.पुढे नर्गिसजींनी समझौता करुन त्यांच्यात समेट घडवला त्यानंतर १९६७ साली आलेल्या *ज्वेल थिफ* या चित्रपटात त्यांनी पुन्हा एकत्र गाणे म्हटल ते होते, *दिल पुकारे आरे आरे आरे अभी ना जा मेरे साथी"! ३० जुलै १९८० हाच तो दिवस! जे ओम प्रकाश यांच्या *आस पास* ह्या चित्रपटाच्या गाण्याचे रेकार्डींग चालू होते. संध्याकाळ झाली. सगळे म्हणाले उरलेले उद्या करु. शेवटच्या ४ओळी राहिल्या होत्या. रफीजींना काय वाटले कुणास ठाऊक? खाली उतरलेले रफीजी पुन्हा वर आले. रेकार्डिंग पूर्ण करुया म्हणाले. त्यानंतर रफीजी घरी गेले. रात्री झोपले ते परत न उठण्यासाठी. एकश्रप्रेमळ व्यक्ती, एक यशस्वी गायक, एक पुण्यात्मा एक बुलंद आवाजाचा बादशहा आपल्याला पोरकं करुन पैगंबरवासी झाला. © कृपा देशपांडे... रफीजींची काही निवडक गाणी! नायकां नुसार! *दिलीप कुमार* *दो सितारोंका जमींपर है मिलन *कैसी हसीन आज बहारोंकी रात है *आजकी रात मेरे दिलकी सलामी ले ले *मुझे दुनियावालों शराबी न समझो *एक शहनशाहने बनवाके हंसी ताजमहल *देवआनंद* *तेरे मेरे सपने अब एक रंग है *अच्छाजी मै हारी चलो मान जाओ ना *तू कहां ये बता इस नशीली रातमें *अपनी तो हर आह इक तूफान है *मैं जिंदगीका साथ निभाता चला गया *शम्मीकपूर* *दिवाना हुआ बादल सावन की घटा छाई *जवानिया ये मस्त मस्त बिन पिए *बार बार देखो हजार बार देखो *रातके हमसफर थकके घरको चले *यार चुलबुला है हसीन दिलरुबा है *शशीकपूर* *लिखे जो खत तुझे वो तेरी यादमें *नी सुलताना रे प्यारका मोसम आया *परदेसियोंसे ना अखियां मिलाना *कभी रात दिन हम दूर थे *बेखुदीमें सनम उठ गए दो कदम *धर्मेंद्र* *छलकाए जाम आईये आपकी आंखोंके नाम *आपके हसीन रुखपे आज नया नूर है *ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं *जाने क्या ढूंढती रहती है आंखे मुझमें *झिलमिल सितारोंका आंगन होगा *राजेंद्र कुमार* *ए फूलोंकी रानी बहारोंकी मलिका *मुझको अपने गले लगालो *कौन है जो सपनोमें आया *दिले बेताब को सीनेसे लगाना होगा *यादमें तेरी जागजागके हम *मनोजकुमार* *रहा गर्दिशोमें हरदम मेरे इश्कका सितारा *नसीबमें जिसके जो लिखा था *भरी दुनियामें आखिर दिल को समझाने *पत्थर के सनम तुझे हमने मुहब्बतका खुदा जाना *सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमें है *प्रदीप कुमार* *दिल जो न कह सका वही राज ए दिल *बार बार तोहे क्या समझाए *पांव छू लेने दो फूलोंको इनायत होगी *हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक *ऐसे तो न देखो के बहक जाए कहीं हम *भारत भूषण* *मन तडपत हरी दरशन को आज *जब जब बहार आई और फूल मुस्कुराए *इक परदेसी मेरा दिल ले गया *दो घडी वो जो पास आ बैठे *दुनिया ना भाए मोहे अब तो बुलाले *Joy मुखर्जी* *लाखो है निगाहोमे जिंदगी की राहोमें *मैं प्यार का राही हूं तेरी जुल्फ के सायेमें *वो है जरा खफा खफा तो नैन यूं चुराए है *दिल बेकरारसा है हमको खुमार सा है *ले गई दिल गुडिया जपानकी *सुनिल दत्त* *रंग और नूरकी बारात *तेरी आंखोंके सिवा दुनियामे रखा क्या है *तुम बिन सजन बरसे नयन जब जब बादल बरसे *आपके पहलूमें आकर रो दिये *कोई बतादे दिल है जहां क्यूं होता है दर्द वहां *जितेंद्र* *रात सुहानी जाग रही है धीरे धीरे *मस्त बहारोंक् मैं आशिक *आनेसे उसके आए बहार *कितना प्यारा वादा है इन मतवाली *ढल गया दिन हो गई शाम . *राजेश खन्ना* *ये रेशमी जुल्फे ये शरबती आंखे *यूंही तुम मुझसे बात करती हो *सजना साथ निभाना साथी मेरे बहारोंके *अकेले हैं चले आओ जहां हो *गुनगुना रहे हैं भवरे खिल रही है कली.. *राजकुमार* *छू लेने दो नाजुक होठोंको *मेरी दुनिया में तुम आयी क्या क्या अपने साथ लिये *मुहब्बतके सुहाने दिन जवानी हंसी राते * ये दुनिया ये महफिल मेरे कामकी नहीं *चलो दिलदार चलो चांदके पार चलो *विश्वजीत* *ये परबतोंके दायरे ये शामका धुआं *फिर मिलोगी इस बातका वादा करलो *पुकारता चला हूं मैं गलीगली बहारकी *न झटको जुल्फसे पानी ये मोती टूट जाएंगे *तुम्हारी नजर क्यूं खफा हो गई *जॉनी वाकर* *सर जो तेरा टकराए *ए दिल है मुश्किल जीना यहां *दिलपर हुआ ऐसा जादू तबियत मचल मचल गई *जाने कहां मेरा जिगर गया जी *अरे वा वा वा वा ऐसा कैसे होगा *फिरोजखान* *यार दिले दिवाना रुत जागी वसले यारकी *चंद्र शेखर* *सुबहा न आई शाम न आई *लाल किला* न किसीके आंखका नूर हूं <> <> <> <> <> <> <> <> <>

Comments