Skip to main content

Raj kapoor Part 2...@

continued....

एल व्ही प्रसाद  यांच्या *शारदा* ह्या चित्रपटात अपघात होऊन बेपत्ता झालेला नायक शेवटी मृत झाल्याचे कळल्याने नायिकेचे( मीनाकुमारी) तिच्या प्रियकराच्या (राजकपूर) वडिलां बरोबर   लग्न होते. फारच वेगळ्या नाविन्यपूर्ण कथेवर आधारीत हा चित्रपट होता. सी रामचंद्र यांचे संगीत होते. त्याच वेळेस राजजी निर्मित *अब दिल्ली दूर नहीं* हा अमर कुमार दिग्दर्शित चित्रपट आला. शंकर जयकिशनजींचे सहाय्यक, अरेंजर दत्ताराम वाडकर यांना राजजींनी पहिल्यांदाच स्वतंत्र संगित दिग्दर्शनाची संधी दिली आणि दत्तारामजींनी एकसे  एक गाणी देउन ह्या संधीचे सोने केले.

१९५८ साली "माणसाने जन्म कुठे घेतला ते महत्वाचे नसते तर त्याच्यावरचे संस्कार महत्वाचे असतात हा संदेश देणारा" एस बॅनर्जींचे दिग्दर्शन असलेला *परवरीश* हा चित्रपट आला.सोबत मालासिन्हा आणि मेहेमूद यांच्या मस्त भूमिका आहेत. तसेच त्याच वर्षी रमेश सहगल यांची निर्मिती दिग्दर्शन असलेला *फिर सुबह होगी*  हा  Fyodor Dostoevsky यांच्या Crime & Punish ment या कादंबरीवर आधारीत होता.
कायद्याचा अभ्यास करणार्या निराधार, होतकरु तरुणाच्या जीवनात  काय प्रसंग ओढवतात, हातून खून होऊन तुरुंग वासही घडतो. हे दिवसही जाऊन जीवनात नवी पहाट उगवेल असा सकारात्मक आशावाद दर्शवणारा सुंदर चित्रपट म्हणजे "फिर सुवह होगी" राजजींच्या सोबत याही चित्रपटात मालासिन्हा आहे. सुमधूर संगीत श्री खय्याम यांचे आहे.

१९५९  मध्ये राजजींचे चार चित्रपट आले. त्यात *मैं नशेमें हूं* याचे दिग्दर्शन नरेश सहगल यांचे होते. नायिका पुन्हा माला सिन्हाच! संगीतकार शंकर जय किशन यांचे. राजजींच्या सर्व चित्रपटा प्रमाणेच या चित्रपटचे संगीतही अप्रतीम च! *दो उस्ताद* हा शेख मुख्तार निर्मित एक चित्रपट ज्यात मधुबाला नायिका असून ओ पी नय्यर यांचे संगीत आहे. तिसरा आहे ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित *अनाडी*.राजजींनी साध्या सरळपण हुषार चित्रकाराची भूमिका केली आहे. कमाई नसल्यामुळे तो घरभाडे देऊ शकत नही.ललिता पवार यांची मिसेस डिसा ही प्रेमळ पण वरकरणी कडक लॅंड लेडी फारच भावते. राजजींचे आणि तिचे खटकेदार संवाद पण बहार  आणतात. नूतन, शुभा खोटे आणि मोतीलाल यांच्या सुंदर भूमिका आहे. आणि अप्रतिम संगीत हा चित्रपटाचा आत्मा!  शेवटचा  *चार दिल चार राहे* हा ख्वाजा अहमद अब्बास यांचे निर्मिती दिग्दर्शन असलेला मल्टीस्टारर चित्रपट!

६० च्या दशकात विनोबा भावे यांनी डाकूंच्या समूहांना "शांतीसंदेश" देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची जोरदार मोहीम हाती घेतलेली, त्यावरुन प्रेरीत होऊन राजजींनी *जिस देशमें गंगा बहती है* हा सर्वांग सुंदर चित्रपट निर्माण केला. राजजींचे लाडके छायाचित्रकार रघू कर्माकर यांनी प्रथमच ह्या सुंदर चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अनाथ भोळा राजू डाकूंच्या मुखियाला  वाचविताना योगायोगाने त्यांच्या वस्तीत येतो. तिथे रहात असताना पोलिसांना
शरण येऊन चांगले जीवन जगा असे
त्यांना समजविण्याचा प्रयत्न करतो. पण
कबिल्यातला राका (प्राण) त्याला पोलीस समजून त्याच्या जीवावर उठतो.  शेवटी राजू सर्व डाकूंचे मतपरिवर्तन करण्यात यशस्वी होतो.

काही ठराविक चित्रपट सोडले तर राज जींनी अत्यंत साध्या वेशभूषेत आपल्या भूमिकेची जबरदस्त छाप सोडली आहे. यात राका म्हणजे प्राणची केशभूषा काही केल्या राजजींना पसंत येत नव्हती. अखे
रीस त्यांना एका विगची आठवण झाली
जो "अजंता" चित्रपटासाठी (जो कधीच पूर्ण झाला नाही) नर्गीस साठी बनवला होता. त्यात थोडे फेरफार करून तो प्राणसाठी बनविण्यात आला. राजजींची कल्पकता पहा. नायिकेसाठी बनविण्यात आलेला विग क्रूरकर्मा डाकूसाठी फिट्ट शोभला.

यात नऊ अप्रतीम गाणी आहेत आणि त्यातले "हो मैंने प्यार किया" हे एक गाणे हसरतजींचे आहे आणि बाकीची ८ ही शैलेंद्रजींची आहेत. या चित्रपटाला"राष्ट्रीय फिल्म पुरस्कर" मिळालाच तसेच "फिल्मफेअर " तीन पुरस्कार,बेस्ट आर्ट डायरेक्शन साठी  एम एम आचरेकर, बेस्ट एडिटींग साठी जी जी मयेकर बेस्ट फिल्म साठी निर्माते राज कपूरना मिळाले.

याच वर्षी मनमोहन देसाईंचा *छलिया*
हा फाळणी नंतर ताटातूट झालेल्या, काही दिवस तिथे मुस्लीम कुटुंबात आश्रय घेऊन भारतात परतलेली स्त्री व तिचा मुलगा यांच्या समस्येवर आहे.कल्याणजी आनंदजींचे मधुर संगीत आहे *श्रीमान सत्यवादी* हा एस एम अब्बास यांचा चित्रपट सामाजिक समस्येवर आधारीत आहे. आयुष्यात सचोटीने वागणार्या तरुणाला या अप्रामाणिक जगात जगण्यासाठी कशी स्पर्धा करावी लागते त्याचे चित्रण यात आहे. नायिका शकीला आणि संगीत दत्ताराम यांचे आहे

सी व्ही श्रीधर यांचा *नजराना* १९६१ मधे आला. नायिका वैजयंतीमाला! याच
चित्रपटाच्या शूटिंगसाठी मरीना बीचवर गेले असता पहिल्यांदा राजजींनी संगम
चित्रपटासाठी वैजयंतीमालाला विचारले होते will you be my Radha? पुढच्या वर्षी ह्रषीकेश मुखर्जीचा *आशिक* आला. पद्मिनी आणि नंदा ह्या नायिका
होत्या. ह्यात पण अतिशय सुंदर गाणी
आहेत. *दिल ही तो है*  हा सी एल रावल आणि पी एल संतोषी दिग्दर्शित चित्रपट,
सोबत सदाबहार नूतन! रोशनजींच
मधुर संगीत! "निगाहे मिलानेको...या
गाण्याची कोरीयोग्राफी मा.सोहनलाल परदेशात असल्यामुळे  सरोजखान यांनी
स्वतंत्रपणे अवघ्या १२ व्या वर्षी केली होती.

त्याच वर्षी आलेला  *एक दिल सौ अफसाने* हा आर सी तलवार यांचा चित्रपट! यात आधी मधुबाला होती पण ह्रदयाचे दुखणे बळावल्यामुळे तीने तो चित्रपट सोडला आणि वहिदा रहमान नायिका म्हणून आली. याचेही संगीत शंकर जयकिशन यांचे आहे. तुमही तुम हो मेरे जीवनमे...या गाण्याची एक मस्त आठवण आहे. या गाण्याच्या रेकॉर्डिंग ला काही कारणाने मुकेशजींना येता आले म्हणून रफीजींच्या आवाजात डबिंग वर्जन रेकार्ड केले. ते ऐकून राजजी एवढे प्रभावित झाले कि तेच वर्जन फायनल केले. मुकेशजींनी पण रफीजींनी ज्या गोडव्याने ते गायले त्याचे कौतूक केले.

*संगम* चित्रपट म्हणजे राजजींचं जणू स्वप्नच होतं! उत्तम कथानक, उत्तम दिग्दर्शन, उत्तम स्क्रीनप्ले! पहिला वहिला रंगीत चित्रपट! प्रथमच परदेशात (व्हेनिस,पॅरीस, स्वित्झर्लंड) चित्रीकरण रघू कर्माकरांच्या कॅमेर्याची कमाल अर्थात राजजींची सौंदर्याची पारखी नजर साथीला होतीच, श्रवणीय संगीत आणि राजजी, राजेंद्र कुमार आणि वैजयंती मालाच्या अभिनयाची बहार! राजजींनी एक सोडून सगळी गाणी एकाच ठिकाणी उभं राहून म्हटली आहेत. चेहर्यावरचे आणि डोळ्यातले भावच सर्वकाही बोलून जातात!

ह्यात "*दोस्त दोस्त ना रहा*...या गाण्यावरुन राजेंद्रकुमारचा राजकपूर बरोबर वाद झाला होता.त्यांचं म्हणणं दोस्ताने तर समजून स्वःच्या प्रेमाचा त्याग केलाय आणि स्वतःच्या प्रेयसीची पण समजूत घातली आहे. तिने तुझ्याशी लग्न पण केलय तर हे गाणं संयुक्तिक वाटतं नाही. राजकपूरने कशीबशी समजूत घालून अशा रितीने चित्रिकरण केलं कि कुठेही भूमिकेला निगेटीव्ह शेड येणार नाही तर उलट राजेंद्रकुमार बद्दल सहानुभूती वाटेल. वैजयंतीमाला या चित्रपटात एवढी सुंदर दिसली आहे की बस रे बस!

 हा चित्रपट सोव्हिएट युनियन, टर्की, बल्गेरिया, ग्रीस, हंगेरी येथेही रिलीज झाला होता. ह्याची गणना एका क्सासिक चित्रपटात होते. यात सगळीच गाणी अप्रतिम आहेत पण त्यातले एक "विव्हियन लोबो"ने म्हंटलेलं  fantastic इंग्रजी गाणे राजजी वैजयंतीमाला हनिमून साठी परदेशात जातात तेव्हा बॅकग्राऊंड ला आहे Ich liebe ditch I Iove you... बहुदा जर्मन भाषाआहे. ग्रँड picturisation आहे. such a lovely song!

राजजींचे लाडके कवीराज शैलेंद्र यांची निर्मिती असलेला आणि बासु भट्टाचार्य दिग्दर्शित *तिसरी कसम* हा क्लासिक चित्रपट. गरीब हिरामण टांगेवाला आणि त्याच्या आयुष्यात औट घटकेसाठी आलेली नौटंकीत (तमाशा) नाचणारी हीराबाई , तसेच गावोगावी फिरणार्या
तमाशातील बायकांचे शोषण यावर हा
चित्रपट आधारीत आहे.याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

यानंतरचा महेश कौल यांचा *दीवाना*
नायिका सायराबानू! राजजींनी सर्वात जास्त भूमिका साध्याभोळ्या, सरळ, निष्पाप तरुणाच्या केल्या. स्वतःपेक्षा आपली नायिका कशी सुंदर दिसेल हेच
पहिले. संगीत शंकर जयकिशनजींचे!
पाछी यांचा *अराऊड द वर्ल्ड* त्याच्या नावाप्रमाणेच परदेशात शूटिंग झाले. हा
पहिला 70 M M चित्रपट! नायिका व्ही
शांतारामजींची कन्या राजश्री.

१९७० साली आलेला *मेरा नाम जोकर*
राजजींचा महत्वाकांशी चित्रपट! सर्कसमधे काम करणार्या जोकरच्या आयुष्यावर आधारीत आहे. हा स्वतःचं दुःख बाजूला ठेउन जगाला हसवितो.
नेहमीपेक्षा जास्त लांबीचा हा चित्रपट असून थोड्या वेगळ्या पध्दतीने मांडला होता. एकूण ३ तास ४४ मिनिटाचा हा चित्रपट होता.

पहिल्या भागात पौगंडावस्थेतल्या राजूचे जीवन दाखवलय. एका टीचर विषयी त्याला प्रथम आकर्षण वजा प्रेम वाटतं पण तीच्या आयुष्यात आधीपासूनच कोणीतरी असतो. मधल्या भागात त्याच्या आयुष्यात सर्कस मधली ट्रॅपिझ आर्टिस्ट मरीना येते. भाषेची अडचण असूनही त्यांची मनं जुळतात. तिसर्या भागात अनाथ मीनूबरोबर सूर जुळतात. तिचे अभिनेत्री व्हायचे स्वप्न असते. दोघे मिळून थिएटर काढतात. तिला फिल्मची ऑफर येताच तीही याला सोडून जाते. यशाची शिडी म्हणून तिने राजूचा वापर केलेला असतो.

राजूचा सर्कशीतला शेवटचा शो...
आयुष्यात आलेल्या तिन्ही स्रियांना बोलवायची परवानगी राजू सर्कशीचा मालक धर्मैंद्रकडे मागतो. जीना यहां मरना यहां..शेवटचे वर्जन..गाणं गाताना  डोळ्यात आसू आणि ओठावर हसू.....गाता गाता हातातील ह्रदय पडून  फुटतं त्या तुकड्या तुकड्यामधे पुर्वायुष्यातल्या स्रिया दिसतात. सिनेमा संपताना तो म्हणतो यह इंटरवल चाहे १५ मिनिटका
होगा, या १५ घंटेका, या १५ महिनेका लेकिन जोकरका तमाशा कभी खतम नहीं होगा...सगळे सर्कसचे कलाकार फेर धरतात..मागे कोरस चालूच..आणि टाळ्यांच्या गजरात..अत्यंत भारलेल्या वातावरणात चित्रपट संपतो..

हा चित्रपट तयार होताना ६ वर्ष लागली. सगळे बजेट कोलमडले. एवढं होऊनही चित्रपट चाललाच नाही. राजजी खूप आर्थिक अडचणीत आले. दोन दोन इंटरव्हल असलेला चित्रपट लोकांना कंटाळवाणा वाटून त्यांनी पाठ फिरवली. शेवटी थोडे  एडिट करुन ८० साली पुन्हा रिलीज झाल्यावर भरपूर चालला. इतका की "क्लासिक" चित्रपटात त्याची गणना होऊ लागली. हा चित्रपट पाहिल्यावर राजजींना "द ग्रेटेस्ट शोमन"
कां म्हणतात ते कळते.

राजजी त्यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या म्युझिकल सिटींगला हमखास हजर असायचे. त्यांना हर वाद्य वाजवायची आवड होती. वाद्य नवीन असले तर २/४ वेळा बघितले की त्यांना कळायचे. शंकर, जयकिशन, शैलेंद्र, हसरत जयपुरी यांच्याशी त्यांची नाळ जुळली होती. राजजींच्या मनातले नेमके भाव शैंलेंद्र, हसरतजी कागदावर उतरवीत आणि शंकर जयकिशन त्याला स्वरसाज चढवित.  जोकर चं संगीतही अतिशय श्रवणीय असून शंकर जयकिशन यांना
८ वे फिल्मफेअर मिळाले. मन्नाडे यांना उत्कृष्ट पार्श्वगायन, अल्लाउद्दिन खान कुरेशींना उत्कृष्ट संकलक तर बेस्ट डायरेक्शन चा पुरस्कार खुद्द राजजींना मिळाला.  पण कां कोण जाणे यानंतर राजजींनी स्वतः दिग्दर्शन केलेल्या चित्रपटात कधीही काम केले नाही.

१९७१ साली आलेल्या *कल आज और कल* मधे कपूर घराण्याच्या तीन पिढ्या होत्या* पृथ्वीराज, राज आणि रणधीर कपूर. रणधीर कपूसचे दिग्दर्शन होते.
त्यावेळची त्याची होणारी बायको बबीता नायिका असून यात दोन पिढ्यांमधला वैचारिक संघर्ष दाखवला आहे. मेरा नाम जोकरच्या अपयशाने राजजी दुःखी होते पण खचले नव्हते. नव्या उमेदीने त्यांनी सळसळत्या तरुण रक्ताची प्रेमकहाणी पडद्यावर आणली *बॉबी* या चित्रपटात! श्रीमंत उद्योगपती प्राणचा  मुलगा ॠषीकपूर आणि प्रेमनाथची गरीब, ख्रिश्चन मुलगी बॉबी डिंपल कापडिया ही फ्रेश तरुण जोडी आहे ! या चित्रपटाने प्रसिध्दीचे आणि आर्थिक यशाचे सगळे उच्यांक तोडले. कोवळ्या वयातील ही प्रेमकहाणी प्रेक्षकांना भावली. जोकरचे
सगळे अपयश बॉबीने धुवून काढले. याच्या  संगीतासाठी राजजींनी संगीत कार म्हणून ताज्या दमाच्या लक्ष्मी प्यारेंना घेतले. सर्व गाणी हीट झाली.

१९७८ साली राजजी निर्नित दिग्दर्शित
*सत्यम शिवम सुंदरम* ह्या चित्रपटात
शशीकपूर, झीनत अमान अशी स्टार
कास्ट होती. मंदीरात भजन गाणारी
साधी मुलगी म्हणून झीनत अजिबात शोभली नाही ना की तिचे कपडे! चांगले संगीतही चित्रपटाला तारु शकले नाही. १९८२ साली आलेला *प्रेमरोग* या चित्रपटात कोवळ्या वयात विधवा होणार्या मुलींची समस्या मांडली आहे. ॠषीकपूर ,पद्मिनी, मुलीची कणखर आई नंदा अशी छान स्टार कास्ट होती. संगीत लक्ष्मी प्यारेंचे!

राजजींचे शेवट शेवटचे चित्रपट होते दारासिंग यांच्यासह त्यांचाच चित्रपट *मेरा देश मेरा धरम*, दुलाल गुहा यांचा *खान दोस्त* ज्यात त्यांची सह्रदय हवालदाराची भूमिका होती, जोडीला शत्रुघ्न सिन्हा, नरेश कुमार यांचा *दो जासूस* राजेंद्रकुमार बरोबर, संजय खानचा *अब्दुल्ला* ज्यात त्यांनी धर्माभिमानी पण सहिष्णू अब्दुल्ला सादर केलाय. नरेश कुमार यांचाच *गोपीचंद जासूस* आणि शेवटचा *वकिल बाबू*
हा कोर्टरुम ड्रामा होता ज्यात त्यांनी पहिल्यांदा बंधू शशीकपूर बरोबर काम
केलय.

राजजींना निर्माता दिग्दर्शक म्हणून *हीना* ह्या चित्रपटाचे काम ॠषी कपूर, अश्विनी भावे आणि पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तियार यांना घेऊन सुरुही केले होतेपण त्यांच्या मृत्यूमुळे तो चित्रपट त्यांचा मुलगा रणधीर कपूर याने पूर्ण केले.राजजी आपल्या ५३ वर्षांच्या सिनेकारकिर्दीतशेवट पर्यंत कार्यरत होते. इतकी वर्ष या अस्थिर, मोहमयी दुनियेत प्रकाश झोतात रहाणे हे सामान्य माणसाचे काम नाही. त्यांनी आयुष्यात खूप चढ उतार पाहिले पण खचून जाईल तो राजकपूर नव्हेच!

चित्रपट बनवताना तांत्रिक गोष्टींवर पण कमालीचे प्रभुत्व होते याचे अगदी छोटेसे उदाहरण! दिग्दर्शक राहुल रवेल त्यांना गुरु मानत. त्यांनी *अर्जुन* चित्रपटाचे स्क्रिनिंग राजसाहेबांना दाखवले असता राजसाहेबांनी फ्लोराफाउंटन येथे चित्रित केलेल्या एका मोठ्या अॅक्शन सीनचे कौतुक केले. तेव्हा राहुलजी म्हणाले हो आम्ही ८कॅमेरे लावले होते. तेव्हा राजजी म्हणाले पण इथे ७ च angles दिसताहेत. राहुलजी आश्चर्याने म्हणाले हो एक कॅमेरा चाललाच नाही, पण हे तुम्हाला कसे कळले? फक्त एक वेळा चित्रपट बघून त्याचे इतके बारकाईने निरीक्षण
हे केवळ राजजीच करु जाणेत.

राजजींना अनेक पुरस्कारां बरोबर अतिशय मानाचा "दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला तेव्हा तो घ्यायला दिल्लीला गेले. पुरस्कारासाठी नाव पुका
रले असता त्यांना खुर्चीतून उठता येईना
कारण अस्थम्याचा जोरदार झटका आल्याने श्वासाचा त्रास होउ लागला.
तेव्हा सर्व प्रोटोकॉल बाजूला सारुन माननीय राष्ट्रपती व्यंकट रमणजी स्टेज
वरुन खाली आले आणि राजजींच्या खुर्चीजवळ जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर लगेच त्यांना इस्पितळात
भरती केले पण थोड्याच दिवसात त्यांनी इहलोकीची यात्रा संपविली...

कल खेलमें हम हो ना हो
   गर्दिशमें तारे रहेंगे सदा
        भूलेंगे हम भूलेंगे वो
            पर हम तुम्हारे रहेंगे सदा..

© कृपा देशपांडे...

राजकपूर..the greatest showman  ..सदाबहार गाने..

आग*
*जिंदा हूं इस तरह के गम ए जिंदगी नहीं
*देख चांदकी ओर मुसाफिर देख चांदकी ओर
*काहे कोयल शोर मचाए रे मोहे अपना कोई याद आएरे

*बरसात*
*बरसातमें हमसे मिले तुम सजन
*छोड गए बालम मुझे हाय अकेला छोड गए
*जिया बेकरार हैं छाई बहार है
*हवामें उडता जाए मोरा लाल दुपट्टा
*हो ओ ओ ओ मुहे किसिसे प्यार हो गया
*मेरी आंखोमें बस गया कोई रै
*अब मेरा कौन सहारा
*बिछडे हुए परदेसी इकबार आना तू
*में जिंदगीमें हरदम रोता ही रहा

*आवारा *
*एक दो तीन आजा मौसम है रंगीन
*एक बेवफासे प्यार किया
*आ जाओ तडपते हैं अरमां
*जबसे बलम घर आए जियरा मचल मचल जाए
*आवारा हूं या गर्दिशमें हूं आसमानका तारा हूं
*दमभर जो उधर मूहं फेरे ओ चंदा

*आह*
*ये शामकी तनहाईया ऐसेमें तेरा गम
*आजारे अब मेरा दिल पुकारा
*रात अंधेरी दूर सवेरा बरबाद है दिल मेरा
*जानेना नजर पहचाने जिगर
*राजा की आएगी बारात
*सुनते थे नाम हम जिनका बहारमें
*छोटीसी ये जिंदगानी रे चार दिनकी कहानी तेरी
*झनन झनन घुंघरवा बाजे

*श्री ४२०*
*मेरा जूता है जपानी
*दिलका हाल सूने दिलवाला
*इचक दाना बिचक दाना
*मुडमुडके ना देख मुडमुडके
*प्यार हुआ इकरार हुआ है
*रमैया वस्तावैया मैंने दिल तुझको दिया

*धून*
*बडी बरबादिया लेकर मेरी जिंदगीमें प्यार आया
*तारे गिन गिन बीते सारी रात घडी है बरसात
*हम प्यार करेंगे हम प्यार करेंगे, हम
लडके झगडके भी प्यार करेंगे
*निंदिया न आए तुम बिन पिया

*पापी*
*ए जज्बा ए मुहब्बत इतना असर दिखादे
*न पहलूमें दिल है न मुंहमें जबा है
मुहब्बत की कुछ औरही दासतां है
*आ जाने बहार आजा मेरे सिंगार आजा
दिलभी निसार तुझे मैं भी निसार आजा
*तेरा काम है जलना परवाने चाहे शमा जले ना जले
*अभी अभी बहार थी छा गई फिजा,दर्द
भरी आंखोसे अश्क है रवां
*कौन कहे उनसे जाके ए हूजूर, हमारा क्या कसूर, रहो जी दूर दूर

*बूट पाॅलीश*
*नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठीमें क्या है
*ठहर जरा ओ जानेवाले हम मतवाले पालिशवाले
*लपक झपक तू आए बदरवा
*चली कौनसे देस गुजरिया तू सजधजके

*चोरी चोरी*
*पंछी बनू उडती फिरु मस्त गगनमें
*आजा सनम मधुर चांदनीमें हम
*ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाए
*मनभावके घर जाए गोरी
*रसिक बलमा हाए दिल क्यूं लगाया
*तुम अरबोंका हेरफेर करनेळाले रामजी
*जहां मैं जाती हूं वहीं चले आते हो
*उसपार साजन इस पार धारे
*आॅल लाईन क्लियर

*आशिक*
*मेहेताब तेरा चेहेरा किस ख्वाबमे देखा था
मैं आशिक हूं बहारोंका, नजारोंका
*ये तो कहो कौन हो तुम कौन हो तुम
*तुम जो हमारे मीत ना होते
*मेर टूटे हुए दिलसे कोई तो आज ये पूछे
*लो आई मिलनकी रात सुहानी रात

*जिस देशमें गंगा बहती है*
*होठोंपे सचाई रहती है
*आ अब लौट चले नैन बिछाए बाहे पसारे
*क्या हुआ ये मुझे क्या हुआ
*बेगानी शादीमें अब्दुल्ला दीवाना
*प्यार करले नई तो फांसी चढ जाएगा
*हम भी है तुम भी हो दोनो है आमने सामने
*ओ बसंती पवन पागल
*मेरा नाम राजू घराना अनाम
*हो मैंने प्यार किया हाय हाय क्या जुल्म किया

*दिल ही तो है*
*लागा चुनरीमें दाग छुपाऊं कैसे
*निगाहे मिलानेको जी चाहता है
*तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात
*भूलेसे मुहब्बत कर बैठे
*चुरा ले ना तुमको ये मौसम सुहाना

*अनाडी*
*किसिकी मुस्कुराहटोंपे हो निसार
*वो चांद खिला वो तारे हंसे
*सबकुछ सीखा हमने ना सीखी होशियारी
*दिलकी नजरसे नजरोंके दिलसे
*बनके पछी गाए प्यारका तराना
*तेरा जाना दिलके अरमानोंका मिट जाना

*कन्हैया*
*याद आई आधी रातको कल रातकी तौबा
*रुक जा ओ जानेवाली रुक जा
*मुझे तुमसे कुछ भी न चाहीये
*नी बलिये रुत है बहारकी

*छलिया*
*बाजे पायल छुन छुन होके बेकरार
*छलिया मेरा नाम चलना मेरा काम
*डम डम डिगा डिग मौसम भिगा भिगा
*मेरे टूटे हुए दिलसे कोई तो आज ये पूछे
*मेरी जान कुछभी किजिए

*श्रीमान सत्यवादी*
*हाल ए दिल हमारा
*भीगी हवाओमें तेरी अदाओमें कैसी बहार है कैसा खुमार है झूम झूम झूम ले ले मजा
*ए  दिल देखे हो हमने बडे बडे संगदिल
*एक बात कहूं वल्ला

*दिल ही तो है*
*निगाहे मिलानेको जी चाहता है
*लागा चुनरीमें दाग छुपाऊ कैसे
*तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात
*भूलेसे मुहब्बत कर बैठे नादां था हमारा
*चुरा लेना तुमको ये मौसम सुहाना

*परवरीश*
*आंसु भरी है ये जीवनकी राहे, कोई उनसे कह दे हमें भूल जाए
*मस्तीभरा है समा हमतुम है दोनो यहां
आखोमें आजा दिलमें समा जा
*मामा ओ मामा ओ मामा

*एक दिल सौ अफसाने*
*तुमही तुम हो मेरे जीवनमें
*एक दिल और सौ अफसाने
*कुछ शेर सुनाता हूं मैं
*सुनोजी सुनो हमारी भी सुनो
*दूरके ओ चंदा आ मेरी बाहोमें आ

*संगम*
*हर दिल जो प्यार करेगा
*ओ मेरे सनम ओ मेरे सनम
*ये मेरा प्रेमपत्र पढकर
*मेरे मनकी गंगा और तेरे मनकी जमना
*ओ मेहेबूबा तेरे दिलके पास है मेरी
*दोस्त दोस्त ना रहा
*मैं का करु राम मुझे बुढ्ढा मिल गया

*मेरा नाम जोकर*
*जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहां
*जाने कहां गए वो दिन
*ए भाय जरा देखके चलो
*दाग ना लग जाए
*तितरके दो आगे तितर
*अंग लग जा बालमा
*सदके हीर तुझपे हम फकीर

*तिसरी कसम*
*सजनवा बैरी हो गए हमार
*आ आभीजा रात ढलने लगी
*दुनिया बनानेवाले क्या तेरे मनमें
*सजनरे झूठ मत बोलो
*चलत मुसाफिर मोह लिया रे
*मारे गए गुलफाम अजी हां मारे गए गुलफाम

*अराउंड द वर्ल्ड*
*दुनियाकी सैर करलो
*चले जाना जरा ठहरो किसिका दम
*जोशे जवानी हाए रे हाए

*दिवाना*
*तारोंसे प्यारे दिलके इशारे
*तुम्हारी भी जय जय हमारी भी जय जय
*हम तो जाते अपने गांव सबको राम राम
*ए सनम जिसने तुझे चांदसी सूरत दी है
*दिवाना मुझको लोग कहे मैं समझू जग है दिवाना

*कल आज और कल*
*आप यहां आये किसलिये
*भंवरे की गुंजन है मेरा दिल
*हम जब होंगे साठ सालके और तुम होगी पचपनकी
*टिक टिक चलती जाए घडी

*Bobby*
*मैं शायर तो नहीं मगर ऐ हंसी
*बेशक मंदीर मस्जिद तोडो
*अखियोंको रहने दे अखियोंके आसपास
*घे घे घे रे घे रे सायबा प्यारमें सौदा नहीं
*मुझे कुछ कहना है मुझेभी कुछ कहना है
*हम तुम एक कमरेमें बंद हो
*झूठ बोले कौवा काटे

*सत्यम शिवम सुंदरम*
*यशोमती मैयासे बोले नंदलाला
*ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है
*भोर भए पनघटपे मोहे नटखट शाम सताए
*चंचल शीतल निर्मल कोमल संगीत की देवी स्वरसजनी

<><><><><><><><><><><><><><><><

Comments