वैजयंती माला! टिपीकल दाक्षिण्यात्य सौंदर्य असलेलं मोहक व्यक्तिमत्व! कां कुणास ठाऊक पण त्यांच्याविषयी मनात थोडिशी अढी होती. त्या स्वभावाने खूपच गर्विष्ठ वाटायच्या. पण जेव्हा एका व्हिडियोत डॉ. विद्या ह्या चित्रपटाची आठवण सांगत असताना केवळ १२/१३ वर्षांच्या सरोज खानच्या नृत्यकौशल्या बद्दल हसून कौतुकाने बोलताना पाहिलं तेव्हा तिचा ग्रेटनेस कळला. एका कलाकाराने दुसर्या कलाकाराला दिलेली दाद होती. तिथे वय आड येत नव्हत. त्यावेळी वैजयंतीमाला एक प्रस्थापित नायिका होती आणि सरोज खान मास्टर सोहनलाल ह्यांची एक सहाय्यक!
वैजयंतीमालाचा जन्म १३ ऑगस्ट १९३६ साली त्रिप्लीकेन, तमीळनाडू येथे झाला. त्यांची आई वसुंधरादेवी ह्या पण अभिनेत्री होत्या. लहानपणा पासून भरतनाट्यम नृत्याचे शास्रशुध्द शिक्षण
तसेच कर्नाटक संगीतही शिकत होत्या.
१३ व्या वर्षी "अरंगेत्रम" सादर केल्यावर
नृत्याचे जाहीर कार्यक्रम करत असताना A V M प्राडक्शन्सचे निर्माते एम व्ही रमन प्रेक्षकात होते. वैजयंतीमालाचे नृत्य एवढे आवडले कि आपल्या पुढच्या चित्रपटाची नायिका हीच असे त्यांना वाटून वैजयंतीमालाच्या घरच्यांना तिच्या चित्रपटात काम करण्या विषयी विचारले. त्यांची आजी खूप कर्मठ असल्या मुळे ती या सर्वाच्या विरुध्द होती. पण त्यांचे मामा पार्थसारथी यांनी समजूत काढली आणि त्यांची चित्रपट सृष्टीची वाट मोकळी झाली.
१९४८ साली त्यांचा पहिलाच तमिळ चित्रपट हीट झाला. लागोपाठ एक तेलगू चित्रपटही केल्यावर १९५१ मधे पहिला हिंदी चित्रपट केला तो तमिळ चित्रपटाचा रिमेक होता, नाव होतं *बहार* आणि नायक करण दिवाण! नंतर एक कन्नड चित्रपटही केला. एकंदरीत दक्षिणेत चांगला जम बसत असतनाच १९५४ मधे निर्माते नंदलाल जसवंतलाल यांचा आदिवासी टोळ्यातील वैमनस्यावर आधारीत *नागीन* चित्रपट आला.ह्या चित्रपटाला हेमंतदांचं उत्कृष्ट संगीत लाभलेलं होतं. ह्यात कल्याणजी भाईंनी
उत्कृष्ट बीन वाजवली आहे.हा चित्रपट पण खूप चालला.
१९५५ मधे "विमल राय" यांचा *देवदास* हा चित्रपट आला. नायक दिलीप कुमार आणि नायिका सुचित्रा सेन जिने पारोची भूमिक् होती. आणि वैजयंतीमाला ची चंद्रमुखीची तोडीस तोड भूमिका होती. त्यासाठी त्यांना पहिला फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.पण त्यांनी तो हे कारण सांगून नाकारला कि देवदासच्या जीवनात जेवढे पारोचे स्थान आहे तेवढेच चंद्रमुखीचे आहे तेव्हा सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मी स्विकारणार नाही.
५० ते ६० या दशकातले एखाद दुसरा अपवाद सोडला तर सगळेच चित्रपट खूप चांगले चालले. *न्यू दिल्ली* ह्या रोमॅंटीक कॉमेडी चित्रपटात पंजाबी मुलगा किशोर कुमार आणि साऊथची मुलगी वैजयंती माला ह्यांची मजेशीर प्रेमकहाणी होती.तर किशोरदां बरोबरच आलेला *आशा* पण धमाल विनोदी चित्रपट होता. त्यानंतरचा बी आर चोप्रांचा *नया दौर*! ह्या चित्रपटात प्रथम मधुबाला होती पण तिच्या वडिलांना दिलीप कुमार बरोबर काम करणे पसंत नव्हते.
शेवटी वाद विकोपाला गेले आणि चित्रपटात मधुबाला जाऊन तिच्या जागी वैजयंती माला आली.नायक दिलीप कुमार! संगीतकार ओ पी नय्यर!हा पण चित्रपट सुपरहीट झाला.
१९५७ मधे आला अमिया चक्रवर्तींचा नृत्य संगीत प्रधान चित्रपट *कठपुतली गरीब घरातून आलेली एक नृत्यनिपुण गायिकेची ही भूमिका वैजयंतीमालानी समरसून केली. साथीला द ग्रेट बलराज साहनी. त्यानंतर त्याच वर्षी बी आर चोप्रांचाच अगदी वेगळा विषयावरचा *साधना* हा चित्रपट आला. वेश्यांच्या पुनरुज्जीवनावर आधारीत ह्या सुंदर चित्रपटाने वैजयंतीमालाला पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला.
यानंतर पुर्नजन्मावर आधारीत बिमल राय यांचा संगीत प्रधान *मधुमती* हा चित्रपट, वैजयंतीमालाच्या कारकिर्दी तला अजून एक सर्वांग सुंदर चित्रपट! सलील चौधरी यांचे सुमधूर संगीत, उत्तमोत्तम नृत्य सुंदर कथानक,अप्रतिम अभिनयाने परीपूर्ण चित्रपट! हा पण सूपर हीट झाला.याच सुमारास दिलीप कुमार बरोबरचा *पैगाम* आणि जेमिनी गणेशन यांच्या बरोबरचा*राजतिलक* हे चित्रपट आले.
याच सुमारास वैजयंतीमालाने तमीळ
चित्रपट सृष्टीत पुन्हा पदार्पण केले.तिथे सात! आठ चित्रपट केल्यानंतर १९६१ मधे आलेला नितीन बोस यांचा अजून एका सुंदर चित्रपट होता *गंगा जमना* त्यातली "धन्नोची" खूप गोड भूमिका वैजयंतीमालाने लीलया पेलली. त्यातली भोजपुरी भाषा हे सर्वात मोठे आव्हान होते. दिलीप कुमारचा सशक्त अभिनयजोडीला होता! या चित्रपटाने तिला २ रे "फिल्मफेअर" तसेच "बेंगाल फिल्मस जर्नलिस्ट असोसिएशन"चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यानंतर शम्मीकपूर बरोबर *कॉलेज गर्ल* देवआनंद, पद्मिनी बरोबर *अमरदीप* *
राजकपूर बरोबर *नजराना* हे चित्रपट येऊन गेले. ते एवढे गाजले नाहीत.
१९६४ साली आलेल्या *संगम* ने मात्र पुन्हा एकदा बहार आणली. नजराना च्या
शूटींगला कोवलम बीचवर प्रथम राजकपूने या रोलबद्दल विचारले, "will you be my Radha"? तिथू परत आल्या वर सात आठ दिवसातच राजकपूर कडूनटेलीग्राम आला "बोल राधा बोल संगम होगा के नहीं? तो पर्यंत वैजयंतीजींनी घरच्यांशी बोलून ठेवलं होतच आणि एवढ्या मोठ्या R K बॅनर चा चित्रपट मिळणार म्हणून घरचेही खुश होते.त्यांनी उत्तर पाठवले,"संगम होगा जरुर होगा!"
*संगम* चित्रपट म्हणजे उत्तम कथानक, उत्तम दिग्दर्शन, प्रथमचं परदेशात चित्रीकरण, रघू कर्मकारांच्या कॅमेर्याची कमाल अर्थात राजजींची सौंदर्याची पारखी नजर साथीला होतीच, श्रवणीय संगीत आणि राजकपूर, राजेंद्र कुमार आणि वैजयंती मालाच्या अभिनयाची बहार! ह्यातल्या "मैं का करु राम मुझे बुढ्ढा मिल गया" ह्या गाण्याची आठवण वैजयंतीमाला सांगतात, "लोकं म्हणतात this is your one of the best dance numbers. पण खरं तर त्यात डान्स नव्हताच. तो कोरियोग्राफ केलाचनव्हता. मला सुचत गेलं ते ते मी उत्सूर्त पणे करत गेले. या गाण्यात सर्वस्वी नवीन, वेगळी पण मोहक "राधा" आपल्याला दिसते. या चित्रपटामुळे त्यांना तिसरे फिल्मफेअर मिळाले.
दिलीप कुमार बरोबर चा *लीडर* तसेच JOY मुखर्जी बरोबरचा *इशारा* हे चित्रपटही याच सुमारास आले.दोन्ही मधील गाणी श्रवणीय! पाठोपाठच ऐतिहासिक राजघराण्याची पार्श्वभूमी असलेला *आम्रपाली* हा चित्रपट ज्याचे
संगीतही अप्रतीम होते, ज्याच्यावर खूप आशा होत्पा तो अजिबात चालला नाही. या अपयशाने त्या खूप निराश झाल्या. हिंदी चित्रपटसृष्टी सोडावी असे मनात विचार येऊ लागले. तरीही करीयरचे शेवटचे *ज्वेलथिफ*, *संघर्ष*, *सूरज*, *प्रिन्स*, *प्यार ही प्यार*, *साथी *गंवार* असे काही चित्रपट कमर्शियली हीट झाले. दरम्यान १९ ६८ मधे डॉक्टर बाली यांच्याशी विवाह केल्यानंतर वैजयंती मालांनी हिंदी चित्रपटसृष्टीला राम राम ठोकला.
तामीळनाडूत परतल्यावर त्यांनी संगीत नाटक अकॅडमी तसेच नृत्यावर लक्ष केंद्रीत केले. त्या उत्तम गोल्फ खेळत. १९८४ पासून १५ ते २० वर्षे त्या राजकारणातही सक्रीय होत्या. १९७५ मध्ये आलेल्या दीवार* या चित्रपटासाठी यश चोप्रांनी * अमिताभ , शशीजीं च्या आईच्या रोलसाठी विचारले असता, मी नायिका म्हणूनच लोकांनी मला स्मरणात ठेवावे. चरीत्र भूमिकांमधे मला रस नाही असे सांगून नकार दिला.
आज ८१व्या वर्षीही त्या कार्यरत आहेत. अनेकविध पुरस्फारांबरोबरच भारत सरकारच्या मानाच्या "पद्मश्री" पुरस्कारा नेही त्या सन्मानित आहेत.डॉक्टर बालीं च्या निधनानंतर मुलगा सुचिंद्र याच्यासह एक समृध्द आयुष्य जगत आहेत. त्यांनी हिंदीसिनेसृष्टीला उपशास्त्रीय नृत्याची ओळख दिली. एक सुंदर अभिनय संपन्न, नृत्यनिपुण, अभिनेत्री या रुपात कायम स्मरणात राहतील.
वैजयंतीमालाच्या चित्रपटातली काही
सुंदर गाणी आणि चित्रपट..
*बहार*
सैंया दिलमें आना रे आके फिर ना जाना रे छम छमा छम
*नागीन*
*मन डोले मेरा तन डोले
*जादूगर सैंया छोडो मोरी या
*मेरा दिल ये पुकारे आजा
*तेरे द्वार खडा एक जोगी
*ओss जिंदगीके देनेवाले "
*उंची उंची दुनियाकी दीवारे सैंया छोडके
*देवदास*
*जिसे तू कुबूल करले वो अदा कहांसे लाऊ
*अब आगे तेरी मर्जी बेदर्दी
*आन मिलो आन मिलो शाम सांवरे
*न्यू देल्ही*
*नखरेवाली आ आ आ आ
*अरे भाई निकलके आ घरसे आ घरसे
*तुम संग प्रीत लगाई रसिया मैंने
*नयादौर*
*साथी हाथ बढाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना
*ये देश है वीर जवानोंका
*रेशमी सलवार कुर्ता जालीका
*उडे जब जब जुल्फे तेरी
*मांगके साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार
*कठपुतली*
*बोलरी कठपुतली डोरी कौनसंग बांधी
*बागड बम बमबम बाजे घुंघरु
*मंजिल वोही है प्यारकी राही बदल गए
*इतने बडे जहांमें तुझको अकेला छोडू कैसे तुम संग
*आशा*
*इना मिना डिका डाय डॅमे डिका माका नाका नाका
*साधना*
*औरतने जनम दिया मर्दोंको मर्दोंने उसे बाजार दिया
*कहो जी तुम क्या क्या खरीदोगे
*तोरा मनवा क्यूं घबराए
*मधुमती*
*आजारे परदेसी
*दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछुआ
*सुहाना सफर और ये मौसम हंसी
*दिल तडप तडपके कह रहा है आभीजा
*जुल्मी संग आंख लडी
*घडी घडी मोरा दिल धडके
*टूटे हुए ख्वाबोने हमको सिखाया है
*पैगाम*
*मैं क्यू ना नाचूं आज कहो जी
*इन्सान का इन्सान से हो भाईचारा
*अमरदीप*
*देख हमें आवाज न देना
*दिलकी दुनिया बसाके सावरिया
*मेरे मनका बांवरा पछी क्यू बार बार डोले
*नजराना*
*बिखराके जुल्फे चमनमें न जाना
*एक ये भी दिवाली थी एक वो भी दिवाली है
*गंगा जमना*
ना मानू ना मानू ना मानू रे
धुंडो धुंडो रे साजना मोहे कानका बाला
दो हंसोका जोडा बिछड गयो रे
तोरा मन बडा पापी संवरिया रे
*आस का पंछी*
*तुम रुठी रहो मैं मनाता रहूं
*दिल मेरा एक आस का पंछी
*रंगोली*
*रंगोली सजाओ रे तेरे पायल मेरे गीत
*छोटीसी ये दुनिया पहचने रास्ते है
*एक नजर किसीने देखा और दिल हुआ दीवाना
*Dr. विद्या*
*पवन दिवानी न मानी उडावे मोरा घुंघटा
*ए दिले आवारा चल फिर वहीं दोबारा चल
*खनके कंगना बिदिया हंसे
*संगम
*हर दिल जो प्यार करेगा
*ओ मेरे सनम ओ मेरे सनम
*ये मेरा प्रेमपत्र पढकर
*मेरे मनकी गंगा और तेरे मनकी जमना
*ओ मेहेबूबा तेरे दालके पास है मेरी
*दोस्त दोस्त ना रहा
*इशारा*
*दिल बेकरार सा है
*ए अब्दुल्ला नागिनवाला आगया
*चल मेरे दिल लहराके चल
*लीडर*
*एक शहनशाहने बनवाके हंसी ताज महल
*तेरे हुस्नकी क्या तारीफ करु
*मुझे दुनियावालों शराबी न समझो
*हमींसे मुहब्बत हमींसे लडाई
*आम्रपाली
*नील गगन की छाओमें दिन रैन गलेसे मिलते हैं
*जाओ रे जोगी तुम जाओरे
*तुम्हे याद करते करते जाएगी रैन सारी
*तडप ये दिन रातकी कसक ये बिन बातकी
*जिंदगी*
*घुंघरवा मोरा छम छम बाजे
*पहले मिले थे सपनोमें और आज सामने *आया हाय कुर्बान जाऊं
*मुस्कुरा लाडले मुस्कुरा
*सूरज*
*बहारो फूल बरसाओ
*तितली उडी उड जो चली
*कैसे समझाऊं बडी नासमझ हो
*इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदार
*ज्वेलथिफ*
*होठोंमें ऐसी बात मैं दबाके चली आई
*आसमां के नीचे हम आज अपने पीछे
*दिल पुकारे आरे आरे आरे
*रुलाके गया सपना मेरा
*ये दिल न होता बेचारा
* छोटीसी मुलाकात*
तुझे देखा तुझे चाहा तुझे पूजा मैंने
छोटीसी मुलाकात प्यार बन गई
कल न पाए जिया मोरे पिया
*संघर्ष*
*मेरे पैरोमें घुंगरु बंधाके तो फीर मेरी
*मेरे पास आओ नजर तो मिलाओ
*जब दिलसे दिल टकराता है
*दुनिया*
*दूरिया नजदिकिया बन गई
*फलसफा प्यारका तुम क्या जानो
.
*साथी*
*हुस्ने जाना इधर आ आईना हूंमै तेरा
*मेरा प्यार भी तू है ये बहार भी तू है
*मेरे जीवन साथी चली थी मैं तो प्यासी
*ये कौन आया रौशन हो गई महफिल
*प्रिन्स*
*ठंडी ठंडी हवामें दिल ललचाए
*मुकाबला हमसे ना करो
*बदनपे सितारे लपेटे हुए
*मदहोश हवा मतवाली फिजा
*बचके जाने ना दूंगी दिलदार
*नजरमें बाजली अदामें शोले
*प्यार ही प्यार*
*मैं कहीं कवी न बन जाऊ
*देखा है तेरी आंखोमें प्यार ही प्यार
© कृपा देशपांडे...
Comments
Post a Comment