Skip to main content

Raj kapoor..part 1..

दोस्तलोग, यावेळी मी हिंदी चित्रपट सृष्टीचा "द ग्रेटेस्ट शोमॅन" असे ज्यांचे आदराने नाव घेतले जाते त्या "रणबीर राज कपूर" यांच्या बद्दल लिहीण्या प्रयत्न केला आहे. राजजींची कारकिर्द हा खरोखर एक महासागर आहे. त्यामधील हाताला येतील तेवढे मोती वेचण्याचा प्रयत्न मी केलाय. याचा मागोवा एका भागात घेणे केवळ अशक्य आहे. म्हणून तीन भागात पेश करत आहे. लागोपाठच येत आहेत..फोटोंमधे राजजींचे संगीताचे अजीज शंकर जयकिशन शैलेंद्र आणि हसरतजी आहेत.

राजजींचा जन्म १४डिसेंबर १९२४साली पेशावर" येथे एका पंजाबी हिंदू  कुटुंबात  झाला. वडिल श्री पृथ्वीराज कपूर आणि आई रामेश्वरीदेवी यांना सहा अपत्य झाली त्यातले रणबीर राज सर्वात मोठे! दोन भावंड अगदी लहानपणीच गेली.कालांतराने कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईला आले. त्यांचे मामा जुगल किशोर मेहेरा हे गायक होते. त्यांची मुलगी "सलमा आगा" ही पण अभिनेत्री गायिका आहे.

 राजजींनी डेहराडूनची Colonal Brown Cambrige School  तसेच St Xavier (कलकत्ता, मुंबई) अशा ३/४ शाळांमधे शिक्षण झाले. राजजींना लहानपणा पासून चित्रपट क्षेत्रात करियर करायचे होते. पृथ्वीजींना राजजींचे एवढ्या लवकर चित्रपटात येणे पसंत नव्हते पण मॅट्रिक मधे नापास झाल्यावर पापाजींचे मन वळवून राजजींनी ह्याच क्षेत्रात यायचे ठरविले. राजजीना  मनापासून वाटे कि या क्षेत्रात इतके चांगले नाव कमवावे कि लोकांनी त्यांना पृथ्वीजींचा बेटा म्हणून नाही तर पृथ्वीजींना राज कपूरचे वडील म्हणून ओळखावे.

 प्रसिध्द अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा असूनही राजजींना या क्षेत्रात खूप उमेदवारी करायला लागली. त्यांनी त्यांची सुरु वात केदार शर्मांचे सहाय्यक म्हणून *विषकन्या* चित्रपटाने केली. तसं तर १९३५ साली आलेल्या देवकी बोस यांच्या *इन्किलाब* मधे अवघे १० वर्षांचे असताना पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटें  बरोबर त्यांची छोटीशी भूमिका होती.

त्यानंतर १९४३ सालच्या *गौरी* या  केदार शर्मांच्या चित्रपटातही पृथ्वी राजकपूर, मोनिका देसाई, शमीम, आणि राजकपूर  यांच्या भूमिका असून संगीत खेमचंद प्रकाश यांचे होते. १९४७ च्या दिग्दर्शक गजानन जाहगिरदार यांच्या *जेलयात्रा* मधे राजजीं बरोबर कामिनी कौशल होत्या आणि संगीत निनू मुजुमदार यांचे होते.

त्याच वर्षी आलेल्या मोहन सिन्हा यांच्या *चितोड विजय* मधे मधुबाला असून संगीतकार सचिन देव बर्मन होते. प्रसिध्द दिग्दर्शक केदार शर्मांकडे सहाय्यक म्हणून बरेच काम केल्यावर एक दिवस त्यांच्या मनात आले हा मेहनती मुलगा आहे. दिसायलाही चांगला आहे. ह्यालाच एक संधी कां देऊ नये. तो चित्रपट होता *नीलकमल* मधुबाला ह्या चित्रपटात नायिका होती. चित्रपट फारसा चालला नाही तरी  अनुभव गाठिशी आला. 

पुढच्याच वर्षी राजजींनी R K Films हे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु करून स्वतःच्या  *आग* ह्या पहिल्या चित्रपटा
ची निर्मिती केली. त्या वेळी त्यांचे वय अवघे तेवीस होते आणि त्यावेळचे ते अगदी तरुण दिग्दर्शक होते. नाट्यक्षेत्रा चा ध्यास घेतलेल्या  तरुणाची भूमिका
राजजींनी केली. नर्गिसनेही पहिल्यादा नायिकेचे काम केले. शशीकपूरने लहान
पणीचा राज रंगवला. राम गांगुली यांचे  संगीत हीट झाले. त्याच वर्षी महेश कौल यांचा *गोपीनाथ* नायिका तृप्ती मित्रा
आणि एन एम केळकर यांचा *अमर प्रेम*
नायिका मधुबाला हे दोन चित्रपट आले.

१९४८  मध्ये प्रसिध्द निर्माते दिग्दर्शक मेहेबूब खान यांचा *अंदाज* हा चित्रपट आलां. साथीला अभिनयाचे बादशहा दिलीप कुमार आणि नर्गीस! दिलीपजी
तोपर्यंत अभिनेता म्हणून यशस्वी झालेले पण राजजींचा *अंदाज* हा major successfl movie as an actor! हा चित्र
पट म्हणज दोन दिग्गज्यांच्या  अभिनयाची जुगलबंदीच! पण दुर्देवाने यानंतर त्यांनी पुन्हा कधीच एकत्र काम केले नाही. पण त्यांच्या मनात इर्षा नसून एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता.

रिषीकपूरने एके ठिकाणी म्हटलयं कि, मी ह्या क्षेत्रात येऊन दहा वर्ष झाली होती तरी *प्रेमरोग* चित्रपट करताना माझ्या चेहेर्यावर हवे ते उत्कट भाव आले नाहीत कि ते युसुफजींचे (दिलीपजी) उदाहरण देऊन त्या तोडीचा अभिनय करायला सांगायचे. जावेद अख्तर यांना एकदा पार्टीत  दिलीपजी म्हणाले होते कि *अंदाज* बनत असतानाच राजचे स्वतःच्या *बरसात*चे पण काम चालले होते.दोन्ही चित्रपटांना तेवढाच न्याय द्यायची राजजींची धडपड त्यांनी स्वतः पाहिली आहे.

*बरसात* हा राजजींचा स्वतःचा दुसरा
चित्रपट. दोन नायक नायिका आणि दोन
प्रेमकहाण्या! राज-नर्गिस आणि प्रेमनाथ निम्मी. यावेळी राजजींनी  "शंकर जय किशन" या दोन नवीन, हुषार तरुणांना संगीताची जबाबदारी सोपवली जे पृथ्वी थिएटरमधे काम करत होते. त्यांनी राजजींचा विश्वास सार्थ ठरवला. दहाही गाणी एकदम सुपरहीट! चित्रपट पण सुप्परहीट!

या सुमारासच आलेल्या सतिश निगम यांच्या *सुनहरे दिन* चित्रपटात राजजीं बरोबर रेहाना, निगार सुलताना होत्या आणि ज्ञान दत्तंचे संगीत होते. १९५० साली *जान पहचान*  आणि *प्यार* हे चित्रपट आले. दोन्हीत नर्गिस नायिका होती.पी एल संतोषी यांच्या *सरगम* मध्ये रेहाना नायिका होती  आणि सी रामचंद्रजींचे संगीत होते. "तू छेड सखी सरगम" हे लताजींचे गाणे त्यातलेच.१९५० मध्येच जी राकेशच्या *बावरा* निम्मी नायिका होती.

१९५१ सालचा *आवारा* हा R K Films
चा तिसरा चित्रपट! ह्याला "न भूतो न भविष्यती" अशी लोकप्रियता लाभली. आवारा म्हणजचे राज कपूर हे समिकरण तयार झाले.यात राजजींचे वडील पृथ्वीराज कपूर  होते तसेच आजोबा दिवाण बसेश्वरनाथ कपूर यांचा अगदी छोटा रोल आहे. राजजींनी यात अतिशय साध्या, निरागस भटक्याची भूमिका केली आहे ज्याच्यावर "चार्ली चॅप्लीनची" थोडीशी झाक आहे. निर्मिती दिग्दर्शन राजजींचे असून ख्वाजा अहमद अब्बास आणि व्ही पी साठे यांची कथा आहे.

एका रात्रीत या चित्रपटाची लोकप्रियता साऊथ एशिया आणि  सोव्हिएट युनियन, आफ्रिका, मध्यपूर्वेचे देश अशी सगळीकडे झाली. राजजींचे कवीराज "शैलेंद्र"जींनी लिहिलेले "आवारा हूं" हे गीत रशिया, टर्की,चीन,अफगाणिस्तान या सर्व देशात कमालीचे लोकप्रिय झाले.
कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये The most successful film of the time या कॅटॅगरी मधे हा nominate  झाला होता.
यातील राजजींचा अभिनय हा Time magazine's One of the 10 top performances of all the time आहे.

१९५२ मध्ये जयंत देसाईंचा अॅक्शन, रोमान्स थ्रीलरपट *अंबर* आला.नर्गीस
नायिका. यात बेबी तनुजाने लहानपणी
च्या नर्गिस ची भूमिका केली होती. एम
एल आनंद यांचा *बेवफा* हा राज नर्गिस जोडीचा One of the best films मध्ये
गणला जातो. यात अशोक कुमारां,ची पेंटरची महत्वाची भूमिका आहे. त्याच वर्षीचा *अनहोनी* हा Psychological dramaहोता. लेखक के ए अब्बास यांचे दिग्दर्शन होते. यात नर्गीसचा डबल रोल होता. रोशनजींचे संगीत होते. बी त्रिलोचन यांचा *आशियाना* हा चित्रपट
ही याच वर्षीचा अजून एक चित्रपट!याला
मदन मोहनजींचे मधुर संगीत होते. यात पण राज नर्गीस हीच मुख्य जोडी होती.

१९५३ साली आर के बॅनरचा अजून एक चित्रपट आला *आह* याचे दिग्दर्शन
मात्र राजजींनी स्वतः न करता "राजा नवाथे" यांना दिले जे आग, बरसात, आणि आवारा या चित्रपटासाठी राजजींचे
सहाय्यक होते. यात प्रथम नायकाला टी बी होऊन तो मरतो असा ट्रॅजिक शेवट
होता. प्रिमिअरला राजजींना चित्रपटगृहा
मधले वातावरण काही ठीक वाटले नाही.
म्हणून शेवट बदलून सुखांत केला गेला पण चित्रपटाची भट्टी बिघडली ती बिघडलीच आणि व्हायचे तेच झाले. हा चित्रपट काही चालला नाही. मात्र शंकर जयकिशनजींच्या श्रवणीय संगीताने थोडे तारले. 

त्याच वर्षी  चंदुलाल शहा यांचा *पापी* हा चित्रपट आला होता. राजकपूर -नर्गीस बरोबर दुलारी हिची महत्वाची भूमिका आहे. याला "एस मोहिंदर" यांचे  अतिशय श्रवणीय संगीत आहे. एम कुमार यांचा *धून* हा चित्रपटही याच वर्षी आला. यातही राज - नर्गीस जोडी आहे. अभिनेते मोतीलाल यांचीही महत्वाची भूमिका आहे. यातील गीते कैफी ईरानी,पी एल संतोषी आणि भरत व्यास ह्या तीन गीतकरांनी लिहिली असून मदन मोहन यांचे सुमधूर संगीत आहे.

१९५४ साली आलेला आर के बॅनरचा  *बूट पॉलिश* हा प्रकाश अरोरा ह्यांनी दिग्दर्शित केलेला. भोला (रतनकुमार)  बेलू (बेबी नाझ) ह्या गोड चुणचुणीत पण अनाथ भावंडांची ही कहाणी आहे. आईच्या मृत्यूनंतर दुष्ट काकी त्यांना भीक मागायला लावून पैसे मिळवते. अवैध दारुचा धंदा करणारा प्रेमळ जॉन चाचा त्यांना बूट पॉलिश करुन स्वाभिमानाने जगायला शिकवतो. त्या भावंडांना आलेल्या अडचणी, त्यांची ताटातूट व पुनर्भेट अशी ह्रद्य कहाणी म्हणजे हा सुंदर चित्रपट! जोडीला शंकर जयकिशनजींचे बेमिसाल संगीत आहेच! याला  "कान्स" चित्रपट महोत्सवात विशेष नामांकन होते. बेबी नाझ हिला उत्कृष्ट बालकलाकार, डेव्हिड यांना सहाय्यक भूमिका आणि बेस्ट फिल्म असे तीन फिल्मफेअर पुरस्कार या अप्रतीम चित्रपटाला मिळाले.

१९५५ साली अजून एक राजजी निर्मित , दिग्दर्शित चित्रपट आला *श्री ४२०*.
के ए अब्बास यांची कथा शैलेंद्रजींची अतिशय सोप्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी गाणी आणि  शंकर जयकिशनजींचे अप्रतिम संगीत! एक गरीब पण शिकलेला, "गोल्ड मेडॅलिस्ट" तरुण मुंबईत रोजी रोटीसाठी येतो आणि या मायानगरीत कसा भरकटतो. अगदी त्याच्यावर ४२० हे फसवणूकीचे  कलम लागते, तो कोणकोणत्या दुष्टचक्रात अडकतो याची कहाणी म्हणजे हा चित्रपट! यातले पात्रही आवारा प्रमाणेच थोडे फार चार्ली चॅप्लीनशी मेळ खाते. राजजींच्या चित्रपटांचे संगीत हा त्यांचा चित्रपटाचा आत्मा असायचा. ती परंपरा येथेही कायम आहे.

*जागते रहो* हा हिंदी, बंगाली अशा दोन्ही भाषेत बनला होता.गरीब गावकरी चांगले आयुष्य जगण्यासाठी शहरात आला असताना त्याला एकदा तहान लागते आणि ती भागवताना त्याला ज्या अनंत अडचणी येतात, एका रात्रीत जे काही भयानक अनुभव येतात, लोक त्याच्या साध्या, बावळ्या वेशावरुन त्याला चोरही समजतात, त्याचीच ही साधी सरळ कथा आहे. या चित्रपटाला झेकोस्लोव्हाकियाच्या प्रसिध्द "कार्लोव्ही वेरी" इंटर नॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये  क्रीस्टल ग्लोब ग्रॅंड प्रिक्स मिळाले होते. ही पण आर के फिल्म्सची निर्मिती असून अमीत मैत्र आणि शंभू मित्रा यांचे दिग्दर्शन आहे.

१९५६ आलेला *चोरी चोरी* साऊथच्या
AVM Productions चा हा चित्रपट! अनंत ठाकूर यांचे दिग्दर्शन असलेला हा Romantic comedy चित्रपट अमेरिकन मूव्ही *It happened one night* ह्याचा रिमेक होता. एक श्रीमंत बापाला त्याच्या
मुलीसाठी त्याच्या पैशावर लक्ष न ठेवता तिच्यावर प्रेम करणारा जोडीदार हवा असतो. यावरुनच "दिल है के मानता नहीं " हा अमिरखान पूजा भटचा चित्रपट आधारीत होता. राजकपूर नर्गिसचा हा अजून एक सुंदर चित्रपट!

क्रमशः

Comments