अवघी ८ वर्षाची असल्यापासून तीने चित्रपट सृष्टीत पाऊल टाकलं. वडील मा विनायक, सुप्रसिध्द चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार! मामा चित्रमहर्षी व्ही. शांताराम! अशा मातब्बरांच्या घराण्यातली एक बालकलाकार जिने पुढे प्रथितयश अभिनेत्री म्हणून मोठंच यश कमावलंच पण वडिलांच्या मागे सर्व भावंडांच पालनपोषण , करुन त्यांना मार्गी लावलं. आपल्या करियरमधे तीने भाभी, छोटी बहन, बेटी, आदर्श बहू, मां अशा सगळ्या भूमिका निभावल्या पण खर्या आयुष्यात तिच्या हाताला कधी मेहंदीच लागली नाही. ती होती अतिशय गोड, निरागस,सुंदर अभिनेत्री नंदा!
नंदाचा जन्म ८जानेवारी १९३९ साली कोल्हापूर मधे झाला. एकूण सात भावंड
आणि नंदा सगळ्यात मोठी. नंदा ८ वर्षाची होती. वडील शाहू मोडक आणि शांता आपटेंना घेऊन "मदीर" चित्रपट बनवत होते. एक दिवस नंदाला बोलावून म्हणाले उद्या स्टुडीयो मधे तयार होऊन माझ्या बरोबर चल. नंदाला अजिबात जायचे नव्हते.तसे तीने आपल्या आईला सांगितले. आईने तिची समजूत काढली. एवढ्या भावंडांच्या मध्ये बाबा तुलाच का बोलावतात.तुझ्यात काही गुण आहेत म्हणून ना! ते पटल्यामुळेन नंदा नटून थटून, परकर पोलका घालून स्टुडियोत गेली. पण तिथे गेल्यावर विनायकांच्या मनात काय आले कोणास ठाऊक? त्यांनी तिला कपडे बदलून मुलगा बनवले. मोठ्या बहिणीच्या रोलमधे तर साक्षात लताजी! ह्या पहिल्याच चित्रपटा तले काम लोकांना फार आवडले.
*मंदीर* रिलीज झाला आणी त्याच वर्षी दुर्दैवाने वडिलांचा मृत्यू झाला. घरची परिस्थिती बिकट झाली. तशात राहता बंगलाही एका फायनान्सरने कर्जफेडी साठी विकायला लावला. कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. नंदाच्या एका मावशीने आसरा दिला. तिथे एका खोलीत हे सर्व कुटुंब एका खोलीत राहू लागले. नंदावर सगळी जबाबदारी आली.त्यानंतर बाल कलाकार म्हणून बेबी नंदा ह्या नावाने तिने जग्गू,कृष्ण सुदामा,शंकराचार्य, अंगारे, पंढरीचा पाटील, मातेविना बाळ, कुलदैवत, शेवग्याच्या शेंगा अशा अनेक चित्रपटात कामे केली.या सर्वामधे तिच्या शिक्षणावर यरीणाम होत होत म्हणून नावाजलेले शिक्षक तसेच मुंबई स्काऊटस कमिशनर "श्री गोकुळ दास व्ही माखी"यांच्या मार्गदर्शनाखाली तिचे शिक्षण घरीच पार पडले.
व्ही. शांताराम, नंदाचे मामा यांनी तिला *तुफान और दिया* या हिंदी चित्रपटात ब्रेक दिला. अनाथ भावंडांच्या नशिबात येणार्या दुःख आणि त्रासाची, ग दि माडगूळकरांची कथा आणि वसंत देसाई यांचे संगीत होते. *"पिया ते कहां गयो नेहरा लगा गयो*" हे अप्रतिम गाणे वसंत देसाईंनी दिलय. यातल्या सिरीयस सीन मधली नंदाचा अभिनय बघून राजेंद्र कुमार नेहमी म्हणे, तुम तो पूरी छोटी मीना हो।
त्यानंतर साऊथच्या ए व्ही एम ह्या मोठ्या बॅनरचा *भाभी* आला. त्यातली एक मूल असलेल्या विधवेची भूमिका खूप गाजली. त्यात नंदाला अंधत्व येतं.
चित्रपटाच्या प्रिमियर शो ला आलेल्या मीनाजी नंदाला म्हणाल्या," मैंने भी अंधी लडकी की भूमिका की थी पर तुमने तो उससे भी बेहतर किया!"त्यानंतर १९६९ मध्ये एल व्ही प्रसाद यांचा *छोटी बहेन* चित्रपटात दोन मोठ्या भावांच्या भूमिकेत बलराजसाहनी आणि रहमान! यातल्या भूमिकेची पण खूप स्तुती झाली. यातल "भैया मेरे राखीके बंधन को निभाना! हे गीत तर *राखी पोर्णिमा* स्पेशल आहे.
बी आर चोप्रा यांच्या *धूलका फूल* या चित्रपटातही नंदा सहनायिका असली तरी चांगली भूमिका होती. राजेंद्र कुमार, अशोक कुमार मालासिन्हा असे सह कलाकार होते. एन दत्ता म्हणजे दत्ता नाईकांचे सुमधूर संगीत तर कैदी नंबर ९११ मध्ये पण शेखमुख्तार, मेहमूद आणि मीनू मुमताज हे सहकलाकार होते. याचे संगीत दत्ताराम वाडकर यांचे होते.आणि योगायोग म्हणजे हे दोनही मराठमोळे दत्ता गोव्याच्या संगीतमय मातीतलेच! नानाभाई भट्ट यांचा *नया संसार* ज्याची कथा सुप्रसिध्द लेखक ख्वाजा अहमद अब्बास यांची होती. प्रदीप कुमार जयश्री गडकर हे सहकला कार होते.
१९६० मध बिमल राय यांचे सहाय्यक असलेल्या "मौनी भट्टाचार्य" यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेल्या *उसने कहा था* मध्ये सुनिलदत्त नायकाच्या भूमिकेत तर सलीलदांचे बहारदार संगीत होते. देव आनंद च्या *कालाबाजार* चित्रपटा त देव आनंदने बहिणीच्या भूमिकेसाठी विचारले असता नंदाने प्रथम नकारच दिला. देवआनंदने कारण विचारले तेव्हा नंदा म्हणाली एकदा बहिणीचा रोल केला कि तुम्ही नायिकेच्या भूमिकेसाठी विचारच करणार नाही. पण देवआनंदने शब्द दिला आणी पुढच्या दोन चित्रपटात नंदा नायिका होती. *हम दोनो* आणि *तीन देविया* हम दोनो मधले मधली सोज्वळ पत्नीची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली.
बी आर चोप्रा पण नंदाला मुली सारखेच वागवत. त्यांच्या *कानून* मधेही नंदाची
चांगली भूमिका होती.अर्थात हा कोर्टरुम ड्रामा असल्याने अशोक कुमार आणि राजेंद्र कुमारच्या मुख्य भूमिका होत्या.
तेव्हाच आलेल्या वसंत जोगळेकरांच्या *आंचल* ह्या चित्रपटातील भूमिकेला
पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेचं फिल्म फेअर पारीतोषिक मिळालं. सी रामचंद्र यांच्या संगितापैकी नंदा आणि सुदेश कुमार वर चित्रित झालेले *गा रही है जिंदगी हर तरफ बहारमें किसलिये, चार चांद लग गये है तेरो मेरे प्यार मे किसलिये*.... हे महेंद्रकपूर आशाजींनी गायलेलं गाणं खूप सुरेल आहे.
१९६१ साली आलेला *चार दिवारी* हा शशी कपूरचा पहिला चित्रपट. नंदाने नवीन नायकांना नेहमीच प्रोत्साहन दिले. स्वतः प्रस्थापित नायिका असून नवीन नटा बरोबर काम करायला नंदा नेहमीच तयार असे. शशीजी आणि नंदाचे एकूण ८ चित्रपट आले त्यातले ६ खूप गाजले.
नंतर साठच्या दशकात नितीन बोसयांचा Joy मुखर्जी बरोबर *उम्मीद*, राजकपूर, पद्मिनी बरोबर *आशिक*, शशी कपूर बरोबर *मेहंदी लगी मेरे हाथ*, आणि *मुहब्बत इसको कहते हैं*, अशोक कुमार, सुनिल दत्त आणि तनुजा बरोबर *आज और कल*! नितीन बोस यांचाच सामाजिक चित्रपट *नर्तकी* ज्यात सुनिल दत्त नायक आहे आणी देवआनंद बरोबर चा *तीन देविया* यात कल्पना मोहन, सिम्मी या सहनयिका होत्या. मनोजकुमार, हेलन प्राण...यांच्याबरोबर *गुमनाम* हा रहस्यपट असे एकापेक्षा एवरचढ चित्रपट आले.
निर्माते सूरज प्रकाश यांच्या *जब जब फूल खिले* या चित्रपटाने तर कमालच केली. भारताचे नंदनवन असलेल्या काश्मिरच्या पार्श्वभूमीवर फुललेली एक
सुंदर प्रेमकहाणी! आधुनिक रहाणी, विचारसरणीची नायिका आणि अगदी उलट पार्श्वभूमी असलेला भोळा, प्रेमळ
नायक! उत्तम संगीत! नंदा शशीकपूर यांच्या बहारदार अभिनयाने नटलेला हा चित्रपट! नंतरचे *परिवार* (जितेंद्र) *जुआरी*, *अभिलाषा*, *राजासाब* ( सर्व शशीकपूर) ह्या काही चित्रपटांनंतर बी आर चोप्रांचा *इत्तेफाक* हा सस्पेन्स थ्रीलर आला. त्यात गाणीच नव्हती. राजेश खन्ना नुकताच चित्रपट सृष्टीत नवीन होता. नंतर राजेश खन्ना'? बरोबर अजून एक रहस्यपट *द ट्रेन* आला ज्यात पंचमदांचे चित्रपटाला साजेसे संगीत होते.
राजेशखन्ना बरोबर अजून एक कौटुंबिक विनोदी चित्रपट आला *जोरु क गुलाम* परिणीता, जुर्म और सजा, छलिया असे काही चित्रपट केल्यानंतर मनोज कुमार चा *शोर* हा नितांतसुंदर चित्रपट नंदाने केला. पाहुणी कलाकार! पण "इक प्यारका नगमा है" या अप्रतीम गाण्यामुळे छोटासा रोल असूनही कायम स्मरणात राहिली. *नया नशा* हा नशेच्या आहारी गेलेल्या श्रीमंत तरुणी च्या जीवनावर आधारित चित्रपट होता. नंदाला ड्रगच्या आहारी गेलेल्या भूमिकेत प्रेक्षकांनी स्विकारले नाही. आणि तो फार वाईट रितीने बॉक्स आफीस वर आपटला. त्यानंतर मात्र नंदाने कामं थांबवली. ती पाच सहा वर्ष पूर्णपणे लांब होती.
१९८१ मधे राजकपूरच्या विनंतीवरून *प्रेमरोग* या चित्रपटात पद्मिनी कोल्हा पुरेच्या "कणखर" आईची भूमिका केली जी स्वतःच्या विधवा मुलीमागे खंबीरपणे उभी राहून समाज्यातल्या कुप्रथांपासून रक्षण करते. लागोलाग *आहिस्ता आहिस्ता* मधे कोठ्यावरील गणिकेची मुलगी जी खानदानी तरुणाच्या प्रेमात पडून एका मुलीला जन्म देते आणि *मजदूर* मधे दिलीप कुमार च्या पत्नीची भूमिका केली. योगायोगाने तीनही चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरेच्याच आई ची भूमिका केली. यानंतर मात्र नंदाने काम पूर्णपणे थांबविले.
नंदाचे आयुष्य त्याग आणि समर्पणाने भरलेले आहे. अवघ्या ८ व्या वर्षी वडील गेल्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी तिने समर्थपणे पेलली. ह्या सगळ्यात स्वतःकडे लक्षचं द्यायला वेळच मिळाला नाही. ह एक छोटेसे उदाहरण! बर्यापैकी पैसे मिळायला लागल्यावर नंदाने ४०० रुपये साठवून रेडीयो घ्यायचे ठरविले. खरेदी करायला जाणार तोच तिचा भाऊ प्रफुल्ल पडून त्याला फ्रॅक्चर असल्याचे कळले. नंदाने तेच रुपये हॉस्पिटलमधे जाण्यासाठी आईच्या हातावर ठेवले.
सगळं स्थिरस्थावर झाल्यावर तिने पण सेटल होऊन स्वतःचे आयुष्य मार्गी लावावेअसे घरच्यांना वाटत होते. तसे भावांनी सुचवून योग्य स्थळे पण आणली होती पण नंदाने साफ नकार दिला. पण तिची जिवलग मैत्रिण वहिदाने खूपचं आग्रह केल्यावर निर्माते मनमोहन देसाईंशी १९९२ मध्ये तिने साखरपुडा केला. सगळं सुरळित चाललं असताना १९९४ मधे अचानकपणे एक दिवस मनमोहन देसाईं राहत्या घराच्या बाल्कनीतून खाली पडल्याची बातमी आली.
हा अपघाप कि आत्महत्या हा प्रश्न तर होताच! पण नंदा मात्र हा आघात सहन करु शकली नाही. यानंतर आपली भावंड आणि जिवलग मैत्रिणी (वहिदा, साधना, हेलन, सायरा बानू, आशा पारेख,शम्मीजी) एवढेच तीचे विश्व राहिले होते! "नटरंग" चित्र पटाच्या स्क्रिनिंग साठी तिचा मैत्रिणींबरोबरचा फोटो पाहिलेला. हा तिची शेवटचा पब्लिक appearance. २५ मार्च २०१४ मध्ये वर्सोवा येथील राहत्या घरी तिचा ह्रदयविकाराने दुःखद मृत्यू झाला.
नंदाच्या चित्रपटातली काही श्रवणीय
गाणी आणि चित्रपट!
*भाभी*
*चली चली रे पतंग मेरी चली रे
*चल उड जा रे पंछी के अब ये देस हुआ बेगाना..
*छोटी बहेन*
*बागोमें बहारोमें इठलाता गाता आया कोई
*भैया मेरे राखीके बंधन को निभाना
*धूल का फूल*
*झुकती घट गाती हवा सपने जगाए
*कासे कहूं मनकी बात
*तेरे प्यारका आसरा चाहता हूं
*धडकने लगे दिलके तारोंकी दुनिया
*कैदी नंबर ९११*
*प्यारभरी ये घटाए राग मिलनके सुनाए
*तेरे तीरको हमने प्यारसे दिलमें रख लिया
*मीठी मीठी बातोंसे बचना जरा
*उसने कहा था*
*आहा रिमझिमके ये प्यारे प्यारेगीत लिए
*मचलती आरजू खडी बाहे पसारे
*आंचल*
गा रही है जिंदगी हर तरफ बहारमे, किसलिये....
*काला बाजार*
*ना मैं धन चाहूं ना रतन चाहूं तेरे *चरणोंकी धूल मिल जाए
*चार दिवारी*
*कैसे मनाऊ पियवा गुण मेरे एकहूं नाही
*हम दोनो*
*अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम
*प्रभू तेरो नाम जो झाए फल पाए
*उम्मीद*
*मुझे इश्क है तुझीसे मेरी जान ए जिंदगानी
*मेहेंदी लगी मेरे हाथ*
मेहेंदी लगी मेरे हाथ रे
*आज और कल*
*मुझे गलेसे लगालो बहुत उदास हूं मैं
*इतनी हंसीन इतनी जवां रात
*ये वादिया ये फिजाए बुला रही है तुम्हे
*नर्तकी*
* जिंदगीके सफरमें अकेले थे हम
*कैसे कहूं*
*मनमोहन मनमें हो तुम्ही
*तुम हमें प्यार करो या ना करो
*हौले हौले जिया डोले
*आकाशदीप*
*मिले तो फिर झुके नहीं नजर वहीं प्यारकी
*दिलका दिया जलाके गय
*तीन देविया*
लिखा है तेरी आंखोमें किसका अफसाना
ऐसे तो ना देखो के हमको नशा हो जाए
*जब जब फूल खिले*
*एक था गुल और एक थी बुलबुल
*ये समां समां है ये प्यारका
*परदेसियोंसे ना अखिया मीलाना
*गुमनाम*
*जाने चमन शोला बदन पहलूमें आ जाओ
*इस दुनियामें जीना हो तो सुनलो मेरी बात
*मुहब्बत इसको कहते है*
*ठहरिये होशमें आ लू तो चले जाईयेगा
*नींद हमारी ख्वाब तुम्हारे*
*यूं रुठो ना हसीना मेरी जान पे बन आएगी
*कभी तेरा दामन ना छोडेंगे हम
*जुआरी*
हमसफर अब ये सफर कट जाएगा
नींद उड जाए तेरी चैनसे सोनेवाले
न जाने क्या करेगी तेरी झुकी झुकी नजर
*अभिलाषा*
*वादिया मेरा दामन रासते मेरी बाहे
*प्यार हुआ है जबसे मुझको नहीं चैन आता
*राजासाब*
*सजना के तेरेबिन सजना, जिया जलजल जाए तेरी याद सताए
*हमने आजसे तुम्हे ये नाम दे दिया जाने मन जानेजा जानेजा
*तू जंगलकी मोरनी ते मैं बागादा मोर
*राजूका है एक ख्वाब राजू राजा राजासाब
*धरती कहे पुकारके*
*जे हम तुम चोरीसे बंधे इक डोरीसे
*जारे कारे बदरा बलम के द्वार
*खुशी की वो रात आ गई
*धरती कहे पुकारके
*दिये जलाए प्यारके
*द ट्रेन*
*किसलिए मैंने प्यार किया दिल तो !यूंही बेकरार किया
*गुलाबी आंखे जो तेर देखी
*मुझसे भला ये काजल तेरा
*परीवार*
*हमने जो देखे सपने सच हो गए वो अपने
सच हो गए वो अपने
*रुठा ना करो*
*ए मेरी शोला बदन तुमको इस दिलकी कसम
*आपका चेहेरा माशाल्ला जुल्फका पहरा सुभानअल्ला
*जोरु का गुलाम*
*नैंनोमें निंदिया है माथेपे बिंदिया हैं
*हम दो मुहब्बत के मारे कहां जाए
© कृपा देशपांडे..
Comments
Post a Comment