Friends...आज आठवणीत भेटू the most good looking, stylish & charming personality of हिंदी फिल्म इंडस्ट्री....Mr. विनोद खन्ना..,जन्म ६ ऑक्टोबर १९४६, पेशावर, पाकिस्तान येथे झाला.फाळणीनंतर सर्व कुटुंब मुंबईला आले.
दुसरीपर्यंत सेंट मेरीज मधे शिक्षण घेतल्यानंतर कुटुंब काही कारणाने दिल्लीला गेले. १९६० पर्यंत दिल्ली पब्लिक स्कूल मधे शिक्षण घेतले. पुन्हा १९६० मध्ये मुंबई गाठली पण विनोद खन्नानी पुढील शिक्षण नाशिक जवळ देवळाली येथील Barnes School येथे पूर्ण केले. इथल्या वास्तव्यात *सोलवा साल* *मुगल ए आझम* असे क्लासिक्स पाहुन इंडियन मोशन पिक्चर्सच्या प्रेमात पडले.
मुंबई येथील सिडनहॅम कॉलेज मध्ये Commerce graduation पूर्ण केले. दरम्यान क्रिकेट ची जबरदस्त आवड होतीं. हिंदू जिमखाना येथे सुप्रसिध्द क्रिकेटर "बुधी कुंदरन" आणि "एकनाथ सोलकर" यांच्या बरोबर क्रिकेट खेळल्याच्या त्यांच्या सुखद आठवणी आहेत. क्रिकेट हे माझे पहिले प्रैम होते असे ते म्हणत.
विनोदजींची चित्रपट कारकिर्द १९६८ साली सुनिलदत्त निर्मित *मनका मीत* या चित्रपटात खलनायकी भूमिकेने झाली. सुनिलजींचे भाऊ सोमदत्त हे नायक होते. त्यानंतर *नतीजा*, *सच्चा झूठा*, *आन मिलो सजना*, *ऐलान*, *मेरा गांव मेरा देश*, *रेशमा और शेरा* *रखवाला* ह्या सर्व चित्रपटात खलनायकी भूमिका रंगवल्या. मात्र गुलजारजींचा *मेरे अपने* हा एक वेगळ्या ढंगाच्या चित्रपटात "शाम" ही सशक्त भूमिका मिळाली. भरकटलेली तरुणाई चुकीच्या मार्गाने गेल्यावर त्याचे काय परीणाम होतात हे गुलजारजींनी अतिशय संवेदनशीलतेने मांडले आहे. विनोदजीं बरोबरच शत्रुघ्न सिन्हा, डॅनी, पेंटल, असराणी, दिनेश ठाकूर अशी सगळीच त्यावेळची नवखी मंडळी त्यात आहेत. आतआपल्या छोट्याशी भूमिका पण सुंदर निभावल्या आहेत. मीनाकुमारींचा पण हा शेवटच्या दोन तीन चित्रपटा तील एक...
१९७१ साली *हम तुम और वो* यात भारती बरोबर नायक म्हणून पहिल्यांदा सकारात्मक भूमिका मिळाली. त्यातले *प्रिये प्राणेश्वरी ह्रदयेश्वरी यदी आप हमें आदेश करे* हे किशोरदांचे गाणे खूप गाजलेले.त्यानंतर योगिताबाली वरोबर *मेमसाब*, *एक बेचारा* मधे जितेंद्र रेखा बरोबर आणि गुलजारजींच्या *परीचय* मधे जितेंद्रच्या मित्राची छोटिशी भूभिका केली.*एक हसीना दो दीवाने* मध्ये जितेंद्र बबीता आणि *कच्चे धागे* मध्ये मौसमी चटर्जी नायिका होती.
गुलजारजी दिग्दर्शित*अचानक* हा १९५८ मध्या गाजलेल्या "कावसजी नानावटी" मर्डर केसवर आधारीत होता.एक नेव्ही ऑफिसर विरुध्द महाराष्ट्र स्टेट गव्हर्नट असा हा खटला खूप गाजला होता.चित्रपटात विनोदजी आर्मी ऑफिसर दाखवले आहेत.
१९७३ साली आला मल्टिस्टारर *हाथ की सफाई* रणधीर कपूर, हेमा मालिनी, सीमी ग्रेवाल असे कलाकार. ह्यात परिस्थितीने वाईट मार्गाला लागलेला मोठा भाऊ विनोदजींनी असा झकास रंगवला कि त्या वर्षीचे "फिल्मफेअर बेस्ट सपोर्टीग actor " अवॉर्ड मिळाले. त्याच वर्षी सायराबानू विनोद मेहेरा बरोबर *आरोप* सुभाष घई आणि कुमकुम बरोबर *धमकी*" हे चित्रपट आले.
*इम्सिहान* हा तनुजा बरोबरचा उल्लेखनीय चित्रपट! भरकटलेल्या गुंड प्रवृत्तीच्या विद्याथ्यांना शिस्त वळण लावणार्या आदर्श प्राध्यापकाच्या भूमिकेत विनोदजी शोभले. तनुजाची उत्तम साथ,मधूर संगीताने एक जमून आलेला चित्रपट! फक्त एक गोष्ट खटकते ती म्हणजे बिंदू कोणत्याही अंगाने कॉलेज विद्यार्थिनी वाटत नाही
तो काळ मल्टिस्टारर चित्रपटांचा होता.
त्याच काळात आलेले राजेश खन्ना, शशीकपूर मुमताज बरोबर *प्रेमकहानी* अमिताभ, सायराबानू बरोबर आलेला *जमीर*, सुनिल दत्त सायराबानू बरोबरचा *नेहेले पे देहेला*, अमिताभ, सायराबानू, सुलक्षणा पंडीत बरोबरचा ,*हेराफेरी* हे चित्रपट याची साक्ष आहेत.
१९७६ चा मनमोहन देसाईंचा *अमर अकबर अँथनी * आणि राखी, अमिताभ, रेखा बरोबरचा *मुकद्दर का सिकंदर*, हे कमर्शियली ग्रेट सक्सेसफूल चित्रपट होते. अमिताभ रेखा बरोबर *खूनपसीना* केल्यानंतर राज खोसला यांच्या *मैं तुलसी तेरे आंगनकी* ह्या चित्रपटात नूतन, आशापारेख आणि विजय आनंद अशा दिग्गजां बरोबर काम करायची संधी मिळाली.ह्याच काळातला रेखा बरोबरचा *आपकी खातीर* हा *For Your Sake* या अमेरिकन सिनेमाचा रीमेक होता.
विनोदजींनी १९७८/७९ मध्येही खूप हीट चित्रपट दिले. महेश भट्ट यांचा *लहूके दो रंग ही* हा पूर्णपणे Hong kong मधे चित्रीत झालेला चित्रपट. सोबत शबाना आझमी, डॅनी! यात हेलनची महत्वपूर्ण भूमिका आहे. लगोलग राज सिप्पी यांचा *इन्कार*, नायिका विद्या सिन्हा. हा सुप्रसिध्द जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा ह्यांच्या High & Low या चित्रपटावर आधारीत होता.
गुलजारजींचा *मीरा* हेमामालिनी बरोबर! त्यानंतर दिग्दर्शक रवी चोप्रा यांचा Action Thrillar *द बर्निंग ट्रेन* यात धर्मेंद्र, जितेंद्र,हेमा, परवीन बाबी,नीतू सिंग आणि विनोद मेहेरा अशी तगडी स्टार कास्ट! फिरोज खान झीनत अमान आणि प्राण यांच्याही महत्वाच्या भूमिका असलेला *कुर्बानी* पण खूप चालला.
अशाप्रकारे यशाच्या शिखरा वर असताना एकदिवस विनोदजीनी प्रेस कॉन्फरन्स बोलावली आणि आपण चित्रपटसृष्टी सोडत असल्याच जाहीर केलं. प्रथम बहुतेकांना हा पब्लिसिटी
स्टंट वाटला. पण विनोदजी अतिशय शांत, गंभीर होते. त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी गितांजली आणि मुले अक्षय आणि राहुलही उपस्थित होते. आपण ओशो (रजनीश) यांच्या अमेरिका येथील आश्रमात जाऊन रहाणार असल्याचे सांगितले व हा निर्णय पूर्ण विचारांती घेतला असल्याचे सांगितले. तसा हा निर्णय अचानक नव्हता. काही काळ अगोदर पासूनच विनोदजी पुणे येथील रजनीश यांच्या आश्रमात दर शुक्रवारी जात आणि रविवारी परत येत.
१९८२ ते १९८७ ही पाच वर्ष विनोदजी पूर्णपणे चित्रपट सृष्टीपासून दूर होते.पण जसे गेले तसेच एके दिवशी परत आले. दरम्यानच्या काळात १९८५ मध्ये त्यांचा प्रथम पत्नी गीतांजली बरोबर घटस्फोट झाला. परत आल्यावर १९९० साली प्रसिध्द इंडस्ट्रियालिस्ट शरयू दफ्तरी यांची कन्या कविता हिच्याशी लग्न केले. इथे आल्यावर पहिला चित्रपट मिळाला तो मुकुल आनंद यांचा *इन्साफ* सोबत डिंपल कापडिया! मात्र नंतर फिरोजखानच्या .*दयावान* ने चित्र बदलले. तामीळ चित्रपट"नायकन" ह्या चित्रपटचा रिमेक होता.सोबत माधुरी, फिरोजखान आणि आदित्य पांचोलीही महत्वपूर्ण भूमिकेत आहे.
महेश भट्ट यांचा *जुर्म*, अरुणा राजे निर्मित दिग्दर्शित *रिहाई*, यश चोप्रां चा *चांदनी* जे पी दत्तांचा *बंटवारा*, गुलजारजींचा *लेकिन* हे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट! अगदी शेवटचे काही चित्रपट होते *परंपरा*, *फरिश्ते*, *जनमकुंडली*, *क्षत्रिय* सलमान खानच्या *वांटेड* *दबंग* आणि* दबंग2* मधेही त्यांची चांगली भूमिका होती.त्यांचा शेवटचा चित्रपट होता २०१५ सालचा रोहित शेट्टी दिग्दर्शित शाहरुखचा दिलवाले! विनोदजींनी नायक आणि खलनायकही तेवढ्याच समर्थपणे सादर केले.
१९९७ मध्ये विनोदजी राजकारणात सक्रिय झाले. भा ज पा तर्फे लोकसभे साठी चार वेळा निवडून येणारे ते पहिलेच बॉलीवूड कलाकार. २००२ मध्ये त्यांना मंत्रीपदही मिळाले. राजकारणात असूनही मधून मधून चित्रपढ करतचं होते. २०१७ च्या सुरुवाती पासूनच त्यांची तब्येत ढासळू लागली. त्याचे आजार पणातले फोटो बघून त्यांच्या चाहत्यांना खूप वाईट वाटत असे. एके काळचा हा प्रिंन्स चार्मिंग अशा अवस्थेत बघणं हे सर्वांनाच खूप दुःखदायक होतं.सरतेशेववटी२७ एप्रिल २०१७ रोजी त्यांनी ब्लॅडर कॅंसर मुळे या जगाचा निरोप घेतला.
विनोदजींची चित्रपटातली काही श्रवणीय
गाणी...
*मेरे अपने*
*कोई होता जिसको अपना
*रोज अकेली आए रोज अकेली जाए
*मेरा गाव मेरा देश*
*मार दिया जाए के छोड दिया जाए
*हाय शरमाऊ किसी किसीको बताऊं
*आया आया अटरिया पे कोई चोर
*मेमसाब*
*दो बातोंकी मुझको तमन्ना
सुनो सुनो एक बात कहूं कहो जी पिया मैं सुनती हूं
*कैद
*ये तो जिंदगी है कभी खुशी है कभी गम
*जमीर*
*जिंदगी हसने गानेके लिए है पल दो पल
*तुम भी चलो हम भी चले
*हाथ की सफाई*
*वादा करले साजना
*तू क्या जाने वफा ओ बेवफा
*हमको मुाब्बत हो गई है तुमसे
*मुकद्दर का सिकंदर*
*प्यार जिंदगी है प्यार बंदगी है
*रोते हुए आते है सब हसता हुआ जो जाएगा
*आरोप*
*नैनोमें दर्पन है दर्पन में कोई देखू जिसे सुबह शाम
*धमकी*
*चांद क्या है रुपका दर्पण रुप क्या है *प्रीतका आंगन प्रीत क्या है दिलकी धडकन
*इम्तिहान*
*रुक जाना नहीं तू कहीं हारके
*रोज शाम आती थी मगर ऐसी न थी
*कच्चे धागे*
*कच्चे धागेके साथ जिसे बांध लिया जाए
*मेरे बचपन तू जा जा जवानी को ले आ
*हाय हाय इक लडका मुझको खत लिखता है
*इन्कार*
छोडो ये निगाहोंका इशारा
तू मुंगळा मै गुडकी डली
लहू के दो रंग*
*चाहिये थोडा प्यार थोडा प्यार चाहिये
* जिद ना करो अब तो रुको
*कुर्बानी*
*ओय ओय तुझपे कुर्बा मेरी जां
*हम तुम्हे चाहते है ऐसे
*लेकिन*
*यारा सिली सिली बिरहाकी रातमें जलना
*केसरिया बालम आवो नी
*सुनियो जी अर्ज म्हारी ओ
*चांदनी*
*लगी आज सावनकी फिर वो झडी है
*दयावान*
*आज फिर तुमपे प्यार आया है
© कृपा देशपांडे...
Comments
Post a Comment