Skip to main content

शम्मी कपूर...

याssssssहू...अशी आरोळी ऐकली की तारुण्य आणि उत्साहानं सळसळणारं एकच व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येतं ते.. म्हणजे "समशेर राज कपूर" म्हणजेच शम्मी कपूर! वडील the great पृथ्वीराज कपूर आणि मोठे बंधू राज कपूर असा संपन्न अभिनयाचा वारसा असलेले! कपूर खानदानात त्यांचा जन्म झाला. जन्म मुंबईत झाला तरी बालपण पेशावर येथे गेले. पुन्हा मुंबईला आल्यावर Saint Joseph, Don Bosco आणि New Era या शाळांमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर राम नारायण रुईया महाविद्यालयात "शास्त्र" शाखेत प्रवेश घेतला. त्यांना Aeronautical Engineer व्हायची इच्छा होती. पण कॉलेज मध्ये ते काही रमले नाहीत आणि दोन वर्षानी कॉलेज सोडून वडीलांच्या पृथ्वी थिएटर मधे महिना रुपये ५० वर काम करू लागले. १९५० च्या दशकात चित्रपटात छोटी मोठी कामे करता करता १९५३ मध्ये महेश कौल यांनी स्वतंत्रपणे *जीवन ज्योती* ह्या चित्रपटात काम दिले त्यात नायिका होती "चांद उस्मानी"! त्यानंतर पाच वर्षांत बरेच चित्रपट आले त्यापैकी काही.. *रेल का डिब्बा* आणि *नकाब* (मधुबाला) *लैला मजनू* (नूतन) *ठोकर* (शामा) *हम सब चोर है* (नलिनी जयवंत) *शमा परवाना* (सुरैया) *मेमसाब* (मीना कुमारी) *रंगीन राते* (गीता बाली, माला सिन्हा) सहज नजर टाकली तर दिसतय की शम्मीजीच्या ह्या सगळ्या नायिका लोकप्रिय होत्या. चित्रपट तर येतच होते पण शम्मीजीं ना एका कमर्शियल हिटची गरज होती. याच दरम्यान शम्मीजींचे सुप्रसिध्द अभिनेत्री गीताबाली बरोबर लग्न झाले.रंगीन राते या चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. 1957 मध्ये फिल्मालयचे शशधर मुखर्जी यांच्या *तुमसा नहीं देखा* ह्या रोमँटिक, म्युझिकल फिल्म मध्ये त्यांची निवड झाली. ह्याची पण एक स्टोरी आहे. दिग्दर्शक नासिर हुसेन त्या रोल साठी देवआनंदना साईन करणार होते. गीतकार साहीरजी होते. पण नायिका "अमिता " आहे हे कळल्यावर देव आनंद बाहेर पडले, आणि त्यांच्या मागे साहिरजी, ज्यानी *यूं तो हमने लाख हंसी देखे है तुमसा नहीं देखा* हे गाणं लिहिले जे चित्रपटात आहे. बाकी गाणी मजरुहजींची आहेत. शेवटी कॅमेरामन "द्वारका दिवेचा" जे शम्मीजीं मधले अभिनय सामर्थ्य पहिल्या चित्रपटा पासून ओळखत होते त्यांनी शब्द टाकला आणि शम्मीजींच्या नावावर पहीला हीट चित्रपट आला. ह्या चित्रपटानंतर एस मुखर्जी नासीर हुसेन द्वयीचाच *दिल देके देखो* हा आशा पारेख बरोबरचा हलका फुलका, करमणूक प्रधान, संगीतमय चित्रपट आला ज्याचे बहारदार संगीत उषा खन्ना यांचे होते. शम्मीजींची इमेज आता स्टायलिश आयोजित प्ले boy ची झाली होती.लोक त्यांना इंडियन "एल्वीस प्रिस्ले" म्हणू लागले.त्याच वर्षी "ख्वाजा अहमद अब्बास" यांचा *चार दिल चार राहे*हा मल्टी स्टारर चित्रपट ज्यात राज कपूर,निम्मी, मीना कुमारी, अजित होते. तसेच बिभूती मित्रांचा *बसंत* ज्यात नूतन नायिका होती. १९६०च्या दशकात मधुबाला बरोबरचा *बॉय फ्रेंड* आणि वैजयंती माला बरोबर *कॉलेज गर्ल* हेही चित्रपट आले. १९६१ मध्ये पुन्हा एक जबरदस्त म्युझिकल हीट! सुबोध मुखर्जी चा *जगली* हा सायरा बानूचा पहिलाच चित्रपट. *चाहे कोई मुझे जंगली कहे * ह्या गाण्यातली शम्मीकपूरनी मारलेली याsssssहू ही आरोळी रफीसाहेबांची नसून लेखक प्रयाग राज यांच्या आवाजात आहे आणि रफीसाहेबांनी गाणं पण त्याच जोशात म्हटलयं! त्याच दोन तीन वर्षात त्यांचे बरेच चित्रपट सगळ्या टॉपच्या नायिकांबरोबर आले त्यातले काही. *दिल तेरा दिवाना* (मालासिन्हा) *प्रोफेसर* (कल्पना), *चायना टाऊन* (शकीला), *ब्लफ मास्टर* (सायरा बानू) *राजकुमार* (साधना) *कश्मीर की कली* (शर्मिला टागोर) *काश्मीर की कली* मधील *ये चांदसा रोशन चेहेरा* ह्या गाण्याच्या रेकार्डिंगला हजर असताना शम्मीजींच्या मनात जरा नवीन विचार आला कि यात "तारीफ करु क्या उसकी" हे फ्लॅट म्हणण्यापेक्षा *तारीफ* या शब्दावर जोर देऊन प्रत्येक वेळी वेगळ्या स्टाईलने म्हणावं. शक्तीदा आणि रफीजींना हे मान्य झालं पण ह्या साठी संगीतकार ओ पी नय्यर अजिबात राजी नव्हते. कोणीच माघार घेईना तेव्हा असे ठरले कि शम्मीजी म्हणतात त्याप्रमाणे करुन बघायचे. चित्रिकरण बघून ओ पींना पसंत नाही पडले तर ते म्हणतील तसंच करायच. रफीजींनी तसंच गाणं म्हटलं आणि त्यात शम्मीजीं नी अभिनयाची जी कमाल दाखवली आहे त्यामुळे ओपींनी जसंच्या तसचं ओ के केलं. फ्रेंडस, तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल. शम्मीजी ५ वर्ष पं. जगन्नाथ मिश्रा यांच्या कडे शास्रीय संगीत शिकले आहेत. त्यामुळे त्यांची सूर तालाची समज पक्की होती. नूतन, मुकेशजी त्यांचे सह अध्यायी होते.सैगल, कानन बाला, आर सी बोराल ह्यांची सगळी गाणी त्यांना पाठ होती आणि कधी कधी रात्री एकांतात ते ही गाणी तल्लीन होऊन ऐकत आणि mhanat . त्यांना लॅटीन अमेरिकन *टॅंगो* आणि स्पॅनिश आणि क्यूबन *बोलेरो* या नृत्यप्रकाराची आवड होती आणी ते दादर येथील डान्सिंग स्कूलमधेही काही दिवस जात होते. शम्मीजींचा ह्रिदम सेंस जबरदस्त होता. त्यांना कोरियोग्राफरची फारशी गरज भासली नाही. त्यांच्या गाणीही एक दोन अपवाद सोडले तर रफीजींनीच म्हणली आहेत. शम्मीजींची मस्ती, धम्माlल उछलकूद रफीजी सही सही गाण्यात आणायचे. तर "मैं गाऊ तुम सो जाओ", किंवा "ये दुनिया उसिकी जमाना उसीका" अशा गाण्यातला दर्द पण रफीजींनी सही सही पकडलेला. रफीजी गेले तेव्हा जणू शम्मीजींचा आवाजच गेला. शम्मीजींचा अजून एक मजेशीर किस्सा ऐकलाय. राजजींचे बंधू म्हणून त्यांना सेटवर मुक्त प्रवेश होता अगदी नायिकां च्या मेकअप रुम मधे पण! एकदा नर्गिस यांच्याशी खोडकरपणा करताना त्याच्याकडे कशावरुन तरी गालावर kiss मागितला. नर्गिसजी त्यांना पुरेपूर ओळखून होत्या. त्या म्हणाल्या दुसरं काही माग, मी नक्की देईन. शम्मीजी तेव्हा पृथ्वी मधे ५० रुपये पगारावर पृथ्वी थिएटरमधे छोटी मोठी कामं करत होतें पडत्या फळाची आज्ञा समजून त्यांनी रेकॉर्ड प्लेअर मागितला. नर्गिसजींनी लगेच राजजींची परवानगी घेतली आणि शम्मिजींना घेऊन बाहर आल्या. त्यांच्या आवडीचा लाल रंगाचा रेकार्ड प्लेअर ज्याची तेव्हा किंमत होती रु.६५०/-लगेचच त्यांनी ह्रिदम हाऊस मधून त्यांच्या आवडीच्या २० रकार्डस पण घेऊन दिल्या. १९६५ मध्ये शम्मीजींचे अजून दोन सुपरहीटस आले. सचिन भौमिक यांचा *जानवर* आणि नासीर हुसेन यांची म्युझिकल मर्डर मिस्ट्री *तिसरी मंजिल*! एकापेक्षा एक बढिया गाणी, आशा पारेख आणि हेलन बरोबरची नृत्यं, सगळच लाजवाब! दुर्दैवाने याच वर्षी त्यांची प्रिय पत्नी गीताबाली यांचा अवघ्या ३८ व्या वर्षी "गोवराच्या" आजारात मृत्यू झाला. शम्मीजींनी हा जबर धक्का त्यांच्या छोट्या मुलांकडे पाहून पचवला आतापर्यांत शम्मीजींची इमेज ही एक दोन अपवाद सोडता डान्सिंग, रोमॅंटिक हिरो अशीच होती. आणि बहुतेक वेळा कथानकही हलकंफुलकंच असायचं! पण *ब्रह्मचारी* मधे राजश्री बरोबरे त्यांची खूप वेगळी भूमिका होती.स्वतः गरीब असून बारा अनाथ मुलांची जबाबदारी घेऊन त्यांना संभाळणार्या तरुणाची ह्रद्य कहाणी आहे. जोडीला "शंकर जयकिशनचे" श्रवणीय संगीत! शम्मीजी तसेच सर्व सह कलाकारांचा सुंदर अभिनय! यातच *हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले है* या मेहमूदच्या *गुमनाम* चित्रपटातल्या गाण्यावर बालकलाकार ज्यु. मेहमूदचे अफलातून नृत्य आहे तसेच पाहुणी कलाकार *मुमताज* हिच्याबरोबर* आजकल तेरे मेरे प्यारके चर्चे हर जबानपर* हे नृत्यही वहारदार! ह्या चित्रपटासाठी त्यांना Best Actor चाफिल्मफेअर पुरस्कार मिळाला. याच चित्रपटा दरम्यान शम्मीजींचे मुमताज बरोबर छान सूर जुळले व त्यांनी मुमताज ला लग्नाबद्दल विचारले.पण . त्या काळी कपूरांच्या सुनांना लग्ना नंतर सिनेमात काम करायची परवानगी नसे. ही अट मुमताजला कुठल्याच द्रृष्टीने परवडणारी नव्हती कारण ती कनिष्ठ मध्यमवर्गिय कुटुंबातून आली होती आणि घरच्यांना तिच्या आर्थिक आधाराची गरज होती. शिवाय ज्यु. आर्टिस्ट पासून सुरु झालेले तिचे करियर आता कुठे बहरात आले होते. यामुळे तीने नकार दिला आणि ती प्रेमकहाणी तिथेच संपून गेली. १९६९ मध्ये भावनगरच्या राज घराण्या तील "नीलादेवी" यांच्पाशी त्यांचे लग्न झाले. त्यानंतर ७०च्या दशकाच्या शेवटी *तुमसे अच्छा कौन है* (बबिता) *प्रिन्स* (वैजयंतीमाला) हे चित्रपट तसेच सुरुवातीला *पगला कहीं का*, *जवां मुहब्बत* (आशा पारेख ) *जाने अन्जाने* *प्रीतम* (लीना चंदावरकर) आणिअंदाज (हेमामालिनी) हे चित्रपट नायक म्हणून आले. ७० च्या दशकात शम्मीजींचे वजन इतके वाढले कि हिरोच्या भूमिकेत ते शोभेनात. त्यामुळे त्यांनी सहाय्यक आणि चरित्र भूमिकांचा पर्याय स्विकारला.त्यात त्यांचे जमीर, शालीमार, नसीब,परवरीश, राकी, प्रेमरोग, विधाता, देशप्रेमी,हिरो, सोहनी महिवाल,अजूबा, इजाजत, अल्लारखा, चमत्कार,करीब, जलवा, प्रेमग्रंथ आणि शेवटचा चित्रतट २०११ साली आलेला इस्माईल मर्चंट यांचा राकस्टार हे चित्रपट येतात. सुभाष घईंच्या *विधाता* मध्ये बरोबर दिलीप कुमार संजीव कुमार सारखे तगडे सह कलाकार होते. त्यांना गुरुबक्षसिंग ह्या दिलीप साहेबांच्या मित्राच्या भूमिकेसाठी त्यांना Best Supportig Actor ह्या विभागात फिल्मफेअर पुरस्कारमिळाला. शम्मीजींनी *मनोरजन* आणि *बंडलबाज * ह्या दोन चित्रपटांचे दिग्दर्शनही केलं आणी त्यात भूमिकाही! मनोरंजन हा प्रसिध्द अभिनेते Jack Lemmon & Shirey McLaine अभिनीत रोमॅंन्टिक विनोदी चित्रपट *Irma la Douce* या फ्रेंच चित्रपटावर आधारीत होता. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या पचनी पडला नाही. शम्मीजींचे इंटरनेट विषयीचे प्रेम,लगाव, अभ्यास जगजाहीर आहे. ते इंटरनेट यूजर्स कम्युनिटी आफ इंडिया चे चेअरमन होते. त्यांचा एथिकल हॅकर्स असोसिएशन सारख्या इंटरनॅशनल आर्गनायझेशन स्थापन करण्यात महत्वाचा वाटा आहे. कपूर फॅमिलीला समर्पित वेबसाईट पण त्यांनी व्यवस्थित मेंटेन केली आहे. शेवटी शेवटी शम्मीजी किडनीच्या विकाराने आजारी होते. सुमारे सात वर्ष ते आठवड्यात दोन वेळा डायलेसिसची ट्रीटमेंट घ्यायचे. ७ ऑगस्ट २०११ ला त्यांना इस्पितळात दाखल केले आणि १४ ऑगस्ट २०११ रोजी त्यांचा दुःखद अंत झाला. एक सदाबहार Dancing star आपल्याला सोडून गेला. शम्मीजींच्या चित्रपटातील खूप काही मस्तीभरी तर काही दर्दभरी गीते.., *तुमसा नहीं देखा* *यूं तो हमने लाख हंसी देखे हैं *बडे हैं दिलके काले हाय यही नीलीसी आंखो वाले *जवानियां ये मस्त मस्त बिन पिये *सर पर टोपी लाल हाथमें रेशमका रुमाल *देखो कसमसे कहते हैं तुमसे हां *आये हैं दूरसे मिलने हुजूरसे *दिल तेरा दिवाना* *मुझे कितना प्यार है तुमसे अपनेही दिलसे पूछो तुम *धडकने लगता है मेरा दिल तेरे नामसे *नजर बचाकर चले गए हो वर्ना घायक कर देता *दिल तेरा दिवाना है सनम *प्रोफेसर* *ए गुलबदन फूलोंसी महक काटोंकी चुभन *खुली पलकपे झूठा गुस्सा बंद पलकमें प्यार जीना भी मुश्कील *हो कोई आएगा आएगा आएगा हमरे गांव कोई आएगा *मैं चली मै चली पिछे पिछे जहां *आवाज देके हमें तुम बुलाओ *ब्लफ मास्टर* *गोविंदा आला रे आला *बेदर्दी दगाबाज जा *हुस्न चला कुछ ऐसी चाल *ए दिल अब कहीं न जा *सोचा था प्यार हम ना करेंगे *राजकुमार* *आ जा आई बहार दिल है बेकरार *दिलरुबा दिलपे तू य सितम किये जा *तुमने पुकारा ओर हम चले आए *इस रंग बदलती दुनियामें .*चायना टाऊन* *बार बार देखो हजार बार देखो *बडा कातील है मेरा यार चिना चिन चिना चू *कश्मीर की कली* *दीवाना हुआ बादल सावनकी घटा छाई *ये चांदसा रौशन चेहेरा *इशारो इशारोंमें दिल लेनेवाले *सुभानअल्ला है हंसी चेहेरा है *हाए रे हाए ये मेरे हाथमें तेरा हाथ *ये दुनिया उसीकी जमाना उसीका *जानवर* *मेरी मुहब्बत जवां रहेगी सदा रही है सदा रहेगी *लाल छडी मैदान खडी *तुमसे अच्छा कौन है *कोई गीत सुहाना मेरे संग गा गुनगुना . *An evening in Paris* *आसमानसे आया फरिश्ता *रातके हमसफर थकके घरको चले *दीवानेका नाम तो पूछो *अजी ऐसा मौका फिर कहां मिलेगा *अकेले अकेले कहां जा रहे हो *लाटसाहब* *तनमें अग्नी मनमें चुभन कांप उठा मेरा भीगा बदन *जाने मेरा दिल किसे ढूंढ रहा है *सवेरेवाली गाडीसे चले जाएंगे . *ब्रह्मचारी* *चक्के में चक्का चक्केमें गाडी *मैं गाऊ तुम सो जाओ सीखसपनोमें खो जाओ *आजकल तेरे मेरे प्यारके चर्चे हर जबानपर *दिलके झरोकेमेंश्रतुझको बिठाकर *तुमसे अच्छा कौन है* *किसको प्यार करूं कैसे प्यार करूं *रंगत तेरी सूरतकी किसीमें नहीं नहीं *गंगा मेरी मां का नाम बाप का नाम हिमाला *जनम जनम का साथ है निभानेको *प्रिन्स* *बदनपे सितारे लपेटे हुए *मुकाबला हमसे ना करो *ठंडी ठंडी हवामें दिल ललचाए *मदहोश हवा मतवाली फिजा संसार सुहाना लगता है *नजरमें बिजली अदामें शोले जनाबेअली *बचके जाने ना दूंगी दिलदार तेरी मेरी लागी सरतं *पगला कहीं का* *आशिक हूं एक महजबींका *तुम मुझे यूं भुला न पाओगे *जाने अनजाने* *छम छम बाजेरे पायलिया *चाहे तुम प्यार करो या बेकरार करो *मोहे जालमें फसाही लियो बेईमान रे *जवां मुहब्बत* *जब मुहब्बत जवान होती है *न रुठो रुठो ना रुठो ना रुठो मेरी जां *नजरमें रंग और मस्ती भरा तूफान लेके *लो हमपे आगई अब खैर हो जवानीकी *अंदाज* *दिल उसे दो जो जां दे दे *सुनलो सुनाता हूं तुमको कहानी *है ना बोलो बोलो है ना बोलो बोलो *जिंदगी एक सफर है सुहाना © कृपा देशपांडे...

Comments