मूडी , सणकी, घमेंडी, फटकळ अशी शेलकी विशेषणं ज्याला तंतोतंत लागू होतात पण भारदस्त आवाज, विशिष्ट प्रकारची संवाद फेक, बोलायचा खास अंदाज,हजर जबाबी असेही ज्याच्या बद्दल बोलले जाते असं अजब रसायन म्हणजे कुलभूषण पंडीत उर्फ राजकुमार!
The most stylish person ! नाव राजकुमार पण जेवढे काळ चित्रपट सृष्टीत होता एखाद्या बादशहाप्रमाणे वावरला.
राजकुमारचा जन्म बलुचिस्तान प्रांतातला. साधारण ४० च्या दशकात मुंबईत येऊन मुंबई पोलिसात नोकरी पत्करली. ६ फूट उंची, देखणा रुबाबदार चेहेरा, भारदस्त बोलणे त्यामुळे त्यांची समोरच्यावर छाप पडे. राजकुमारना खरं तर पिक्चरचा शौकही नव्हता आणि त्यांनी एकही चित्रपट पाहिला नव्हता.
पण त्यांच्या मित्रांनाही वाटत होतं, कि त्यांनी फिल्मइंडस्ट्री जॉइन करावी म्हणून मित्रांपैकी एकाने त्यांचे काही निवडक फोटो एका चित्रपट निर्मात्याला पाठवले. तसेच ते ज्या माहीम पोलीस स्टेशनला होते तिथे फिल्मी लोकांची बरीच ये जा होती. निर्माते बलदेव दुबे ह्यांनी राजकुमारना पहिली ऑफर दिली. १९५२ साली आलेला "रंगीली" हा त्यांचा पहिला चित्रपट! नायिका होती रेहाना! त्यानंतर आलेले *घमंडी*, *आबशर*, *कृष्ण सुदामा*अजिबात चाललेनाहीत.
१९५७ साली सोहराब मोदींचा *नौशेरवाने आदिल* आणि मेहेबूबखान यांचा *मदर इंडिया* हे दोन चित्रपट आले. पहिला चित्रपट इराणच्या सुलतानाच्या जीवनावर होता तर मदर इंडिया या मातीतला! नर्गिस च्या मजबूर, गरीब, शेतकरी पतीची भूमीका केलीय त्यांनी. खरं तर बापाच्या आणि मुलाच्या दोन्ही भूमिके साठी मेहेबूबखान यांना दिलिप कुमार हवे होते पण दिलापकुमार नी ती भूमिका, नर्गिसला पत्नी असलेल्या तिला नंतर आई कसे म्हणू?असं म्हणून नाकारली. त्यामुळे मग त्याजागी राजकुमार आणि सुनिल दत्तची वर्णी लागली.
१९५९ साली दक्षिणेतील प्रसिध्द निर्माते "एस एस वासन" ह्यांचा *पैगाम* या चित्र पटात दिलिप कुमारच्या थोरल्या भावाची भूमिका मिळाली. चित्रपट चांगलाच चालला. त्यानंतर मीनाकुमारी, किशोर कुमार बरोबर *शरारत* आणि लगेचच शम्मीकपूर मालासिन्हा बरोबर निगेटीव्ह भूमिका असलेला *उजाला*हा चित्रपटही गाजला. १९६० मध *दिल अपना प्रीत पराई* मध्ये एक सर्जनची भूमिका आहे. *घराना* ह्या कौटुंबिक चित्रपटानंतर *दिल एक मंदीर* मधे कॅन्सरपेशंट च्या भूमिकेला Best Suppoeting actor अवॉर्ड मिळाले.*फूल वने अंगारे* मध्ये राजकुमारनी रुबाबदार आर्मी ऑफिसर साकारला तर *वक्त* मधे सुनिल दत्तचा हरवलेला मोठा भाऊ सोफॅस्टिकेटेड थिफ राजा जो कुप्रसिध्द गुंड चिनॉय सेठ साठी काम करत असतो. ह्यातला #चिनॉय सेठ जिनके घर शीशेके होते हैं वो दुसरोंके घरपे पत्थर नहीं फेकते# हा डायलॉग तेव्हा खूपच गाजला.
मीनाकुमारी धर्मेंद्र आणि पद्मिनी बरोबर *काजल*, जितेंद्र, माला सिन्हा बरोबरचा *मेरे हुजुर*, वहिदा रेहेमान मनोजकुमार बरोबरचा *नीलकमल* ज्यात वहिदा रेहेमानचा डबलरोल. त्यात पूर्वजन्मीचा मूर्तिकार चित्रसेनची भूमिका केलीय.
राजकुमारच्या जास्तीत जास्त चित्रपट हे मल्टिस्टारर आहेत.
चेतन आनंद हे राजकुमारचे सगळ्यात जवळचे मित्र होते. त्यांचा एका अमर प्रेमकहाणी वर आधारीत पंजाबी कवी वारीस शहा लिखित हीर या महाकाव्या
वर आधारीत *हिर रांझा* हा चित्रपट आला. नायिका प्रिया राजवंश! सर्वांगाने सुंदर अशा ह्या चित्रपटाला त्यावर्षीचे सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी फिल्मफेअर मिळाले.मदन मोहन यांचे सुमधूर संगीत ह्या चित्रपटाला लाभले. १९७१ आलेला एफ सी मेहेरा यांचा *लाल पत्थर* हा अजून एक सुंदर चित्रपट! राजकुमारच्या दमदार अभिनया बरोबरच जोडीला राखी, हेमामालिनी आणि विनोद मेहेरा ह्यांचाही अभिनय वाखाणण्याजोगा आहे. त्याचवर्षी आलेल्या *मर्यादा* नंतर
१९७२ साली आलेला पाकिझा...एक सर्वंगसुंदर चित्रपट # आपके पाव देखे। बहुत हंसीन हैं। इन्हे जमीनपर मत उतारिएगा। मैले हो जाएंगे# हा संवाद कोण विसरेल?
१९७३ मध्ये पुन्हा चेतन आनंदचा "इन्डो पाक" युध्दावर आधारीत चित्रपट *हिंदुस्तान की कसम* राजकुमारनी त्यांना साजेशी एअरफोर्स भधील पायलटची भूमिका केली आहे,ह्यातही चेतन आनंदची फेवरीट प्रिया राजवंश आहे जिला अभिनय कशाशी खातात हे माहित नव्हतं. नंतर सस्पेन्स मूव्ही ३६ घंटे जो अमेरिकन मूव्ही The Desperare hours वरुन घेतलेला.यानंतर आला एक क्राईम,थ्रिलर, ड्रामा! राजकुमारची भन्नाट डायलॉग बाजी असणारा *बुलंदी*.त्यात राजकुमार बरोबर डॅनी, आशा पारेख होते. लगेचच *चंबल की कसम*,*मरते दम तक*, *कुदरत*,*एक नई पहेली*, *राज तिलक*, *शरारा*, *गलियोंका बादशहा*, *सूर्या* हे चित्रपटही बरे चालले. या चित्रपटां नंतर ३२ वर्षांनी दोन लेजंडस ना एकत्र आणले तो चित्रपट म्हणजे सुभाष घईंचा *सौदागर*!
दिलिपकुमार आणि राजकुमार दोघांनाही
एकत्र आणायचं म्हणजे कर्मकठीण काम!सुभाषजींनी पहिलं राजकुमारना साईन केलं. साहजिकच दुसर्याही तेवढ्याच महत्वाच्या भूमिकेत कोण घेणार असं विचारल्यावर सुभाषजी डिप्लोमॅटिकली उत्तरले, "अगर आप कहे तो दिलीपसाब को ले लूं? राजकुमारनी काहीच हरकत घेतली नाही आणी महत्वाचं म्हणजे या निमित्ताने एकत्र आलेले हे दोन लेजंडस पुन्हा चांगले मित्र झाले. ह्यातला #हम खैरात नहीं लेते वीरसिगं! हम तुम्हे मारेंगे और जरुर मारेंगे! मगर वो बंदूक भी हमारी होगी, गोलीभी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा# हा डायलॉग कोण विसरेल??
राजकुमारचे फार कमी जणांशी सूर जुळले त्यातले एक नाना पाटेकर! काहीही अडचण न येता अर्धअधिक शूटिंग झाल्यावर राजकुमारच्या मनात आलं नानाचा रोल आपण करावा.
निर्माते मेहूलकुमारना धडकीच भरली कारण नानांबद्दलही ते जाणून होते. पण नानांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. हे बरं झालं कि राजकुमारनाच वाटले आपण नानाच्या रोलमध्ये शोभणार नाही आणि चित्रपट दुसरी कोणती अडचण न येता पूर्ण झाला. या आनंदा प्रित्यर्थ त्या दोघांचे पार्टीचे गाणे "पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी " नंतर घातलं जे सुरुवातीला नव्हतं!
राजकुमार यांचे जसे संवाद प्रसिध्दआहेत तसेच सनकी पणाचे किस्सेही प्रसिध्द आहेत. एक किस्सा असा आहे कि राजकुमार ड्रींक्स सुरु झाली की कोट काढून खांद्यावर घेत. एका पार्टीत कोपर्यात अमिताभ ला उभा असलेला पाहून त्यांनी वेटरला सांगीतले जानीsss उस लंबू को यहां बुलाओ तो, हमें अपना कोट खूंटेसे टंगना है! किंवा एकदा एका पार्टीत भप्पीदांना इतके सारे दागिने घातलेले बघून म्हटले, जानीsss इतने सारे जेवर तो तुमने पहन लिये अब सिर्फ मंगलसूत्र बाकी है!
मेरा नाम जोकर ह्या मल्टीस्टारर चित्रपटात राजकपूरने राजकुमारला काम करण्यास विचारले असता मैं मनोज कुमार और धर्मेंद्र जैसे छोटे कलाकारोंके साथ काम नहीं करता! हे तर अगदीच अतिरंजित वाटते कारण याआधी त्यांनी मनोजकुमार बरोबर "नीलकमल" मधे, धर्मेंद्र बरोबर "काजल" मधे एवढेच नाही तर नवख्या राजेश खन्ना बरोबर "मर्यादा" मधे फिरोज खान बरोबर "उंचे लोग" मधे तर विनोद मेहरा बरोबर "लाल पत्थर" मधे काम केलेले आहे.
काम नाकारण्या मागचे कारण वेगळेच असावे. खरे खोटे देव जाणे! पण मला वाटतं जरी ते फटकळ असले तरी ह्यात अतिशयोक्तीचा भागच जास्त वाटतो. तो माणूस एवढाचं विचित्र असता तर त्यांचं एवढ मोठं करीयर कधी झालचं नसतं. चेतन आनंद, बी आर चोप्रा, मेहूल कुमार आणि इतरही निर्मात्यांनी त्यांना पुन्हा घेतलचं नसतं! शेवटी आपल्याला त्यांच्या चित्रपटांशी मतलब!राजकुमारचे शेवटचे चित्रपट होते बेताज बादशहा, जवाब आणि God ans Gun.
९० च्या दशकात त्यांना घशाचा त्रास जाणवू लागला. राजकुमारचा विशिष्ट आवाज, विशिष्ट शैली याला जणू द्रुष्टच लागली. ज्याच्या जोरावर त्यांनी यशाचे शिखर गाठलं तो बुलंद आवाजच त्यांना सोडून गेला. त्यांना घशाचा कॅन्सर झाला. त्यामुळे आवाजा वर परिणाम होउन त्यांचे बोलणेच क्षीण झाले. अगदी कान जवळ नेला तरचं ऐकायला येई. शेवटची दोन वर्ष खूप वेदना सोसल्या. त्यांनी त्यांची पत्नी गायत्री व मुले पुरु, पाणिनी आणि मुलगी वास्तविकता यांना बजावले होते कि त्यांच्या मरणाची बातमी अंतिम संस्कार झाल्याशिवाय प्रिय मित्र चेतन आनंद यांच्याशिवाय कुणालाही द्यायची नाही. ३ जुलै १९९६ रोजी या बादशहाने या दुनियेचा निरोप घेतला.
(दोस्तहो तेव्हा मी ९ वी त होते. एकदा आम्ही बाहेर जात असताना आमची गाडी आणि त्यांची जीप सांताक्रुझ ते माटुंगा कट टू कट बरोबरच होती आणि आम्ही अतीव कौतुक मिश्रित प्रेमाने त्या रुबाब दार, देखण्या हिरोकडे बघत होतो, आता स्माईल देईल मग देईल अशी वाट बघत! त्यांनी चेहेरा निर्विकार ठेवला होता पण कॅडेल रोडला वळताना त्यांनी हसून हात उंचावलाच!)
राजकुमारच्या चित्रपटातली काही श्रवणीय गाणी...
*पैगाम*
*मैं क्यू ना नाचूं आज कहो जी
*इन्सान का इन्सान से हो भाईचारा
*शरारत*
*तेरा तीर ओ बेपीर दिलकेआरपार है
*हम मतवाले नौजवान
*मदर इंडिया*
*होली आईरे कन्हाई रंग छलके
*दुनियामें हम आए है तो जीनाही पडेगा
*नगरी नगरी द्वारे द्वारे
*मतवाला जिया डोले जिया
*नौशेरवाने आदील*
*भूल जाए सारे गम डूब जाए प्यारमें
*वक्त*
*चेहेरेपे खुशी छा जाती है
*हम जब आपकी आखोमें आ गए
*ओ मेरी जोहराजबीं
*आगे भी जाने ना ते
*काजल*
*छू लेने दो नाजुक होठोंको
*तोरा मन दर्पन कहलाए
*मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतन
* उंचे लोग*
*हाय रे तेरे चंचल नैनवा
*आ जा रे मेरे प्यारके राही राह निहारू
*जान दिले दिवाना रुत जागी
*उजाला*
*ओ मोरा नादान बालमा न जाने
*दुनिया वालोंसे दूर जलनूवालोंसे दूर
*झूमता मौसम मस्त महिना
*छम छम लो सुनो छम छम
*तेरा जलवा जिसने देखा
*अब कहा जाए हम
*मेरे हुजूर*
*झनक झनक तोरी बाजे पायलिया
*हम जब सिमटके आपकी बाहोमें
*रुखसे जरा नकाब उठादो मेरे हुजूर
*गम उठानेके लिए मैं तो जिये जाऊंगा
*नीलकमल*
*हे रोम रोम में बसने वाले राम
*बाबुल की दुवाअए लेती जां
*ये जिंदगी जो थी अबतक मेरी पनाहोमें
*तुझको पुकारे मेरा प्यार
*दिल अपना प्रीत पराई
*अंदाज मेरा मस्ताना
*अजीब दासतां है ये कहांशुरु कहांखतम
*मेरा दिल अब तेरा ओ साजना
*दिल एक मंदीर*
*हम तेरे प्यारमें सारा आलम
*रक जा रात ठहर जा रे चंदा
*याद न जाए बीते दिनोंकी
*फूल बने अंगारे*
*चांद आहे भरेगा फूल दिल थाम लेंगे
*हीर रांझा*.
*मिलो ना तुम तो हम घबराए
*ये दुनिया ये महफिल मेरे कामकी नहीं
*दो दि टूटे दो दिल हारे
*नाचे अंगवे छलके रंगवे
*लाल पत्थर*
*रे मन सूर में गा
*सुनी सुनी सांस की सितार पर
*गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
*मर्यादा*
*तू भी आजा के आ गई रुत मस्तानी
*मुहब्बतके सुहाने दिन जवानीकी हंसी राते
*पाकिझा*
*चलो दिलदार चलो चांदके पार चलो
*मौसम है आशिकाना
*चलते चलते यूंही कोई मिल गया था
*हिंदुस्तान की कसम
*है तेरे साथ मेरी वफा मैं नहीं तो क्या
*हर तरफ अब यहीं अफसाने है
*सौदागर*
*इमली का बूटा बेरी का पेड
© कृपा देशपांडे...
Comments
Post a Comment