Skip to main content

Shashi Kapoor

शशीकपूर आणि पृथ्वीराजकपूर यांच्यात घडलेली खरी खुरी घटना आहे. शशीजी तेव्हा चित्रपटात काम करत नव्हते. एकदा शशीजींना पाठीला फार मोठी जखम झाली होती. आॅपरेशन करावे लागले. घरी आले तरी वेदना कमी होईनात! असेच वेदनेने तळमळत असताना त्यांचा आवाज ऐकून पृथ्वीराजजी त्यांच्या खोलीत एक आरसा घेऊन आले. दुःख सहन होत नसल्याचे भाव शशीजींच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसत होते. शशीजींना काहीच कळेना. तेवढ्यात पृथ्वीराजजी म्हणाले,"ह्या आरशात हे चेहेर्यावरचे भाव बघून ठेव. काही दिवसांनी तू हे दुःख विसरशील पण कधीतरी अशी भूमिका करावी लागेल ज्यात अतीव दुःख झाल्याचे दाखवावे लागेल तेव्हा हा चेहेरा डोळ्यासमोर आण. आणी खरोखरीच एक दिवस अशी वेळ आली आणि वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण येउन त्यांनी ती अमलात आणली. धन्य ते पृथ्वीराजजी! ज्यांना मुलाच्या अतीव दुःखातही त्याच्या अभिनय सर्वौत्तम कसा होईल याची काळजी होती. मित्रांनो तुम्हाला कळलेच ना आज कोणाविषयी संवाद साधणार ते! बलबीर राज कपूर...म्हणजेच शशीजी! कपूर खानदानात जन्मल्यामुळे लहानपणापासून घरातच अभिनयाचे बाळकडू मिळालेले. आग, आवारा, संतान, समाधी! इ. चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. पापाजींमुळे थिएटरकडे ओढा! त्यामुळे सुरुवातीला पृथ्वी थिएटरमधे स्टेज मॅनेजर आणि कलाकार अशा दोन्ही भूमिका पार पाडत होते.त्याच वेळी कलकत्त्यात "शेक्सपिअरवालाज" हा जेफ्री केंडल यांचा थिएटर ग्रुप कार्यरत होता. कलकत्त्याला "पृथ्वी थिएटरची" पण नाटकं व्हायची.तेव्हाच जेनिफरची ओळख झाली आणि काही दिवसातचं दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. घरच्यांना विशेषतः केंडल कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते.पण शम्मीकपूर आणि गीताबालीच्या पुढाकाराने हे लग्न झाले.शशीजी नेहमी गीताबालींची आठवण काढून सांगतं, उस वक्त मेरे पास अपनी गाडी नहीं थी तो भाभी अपने गाडीकी चाबी हमें घूमनेके लिए दे देती थी! पृथ्वी थिटर जवळ जवळ बंद झाल्यावर शशीजींनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला पण रविंद्र दवे यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून. त्यांच्या बरोबर "पोस्ट बाॅक्स नंबर ९९९, "गेस्ट हाउस", "दुल्हा दुल्हन" इ. चित्रपटांसाठी काम केले. जोडीला थिएटर चालू होतेच पण पृथ्वी थिएटर पूर्णपणे बंद झाल्यावर चित्रपटात काम करायचे ठरवले. पहिला चित्रपट होता यश चोप्रांचा *धर्मपुत्र* नायिका होती मालासिन्हा! चित्रपट हातात नव्हते आणि पैशाच्या दृष्टीने पण अडचण होती. अशातच बिमल राॅय यांचा भेटायला येण्याविषयी निरोप आला. शशीजी आनंदाने भेटायला गेले.तेव्हा बिमलदा "*बंदिनी*" आणि "*प्रेमपत्र*" ह्या दोन चित्रपटाची तयारी करत होते.शशीजींना बिमलदांनी *प्रेमपत्र* साठी निवडले. नायिका साधना! शूटिंग सुरु झाले. शशीजींची कॅमेर्याची समज बिमलदांनी हेरली होती. काही दिवसांनी शशीजी स्वतःच्चा कामासाठी लंडनला जात असताना ते शशीजींना म्हणाले, या चित्रपटचा काही भाग लंडनला शूट करायचाय पण तेवढे बजेट नाही. मी सीन लिहून देईन, शूटिंगचा बंदोबस्त पण तिथल्या स्थानिक लोकांकडून करीन. तू फक्त तिकडे शूटिंग कर.शशीजी म्हटले मला जमेल हे? बिमल दांना खात्री होतीच म्हणून विश्वासाने ती जबाबदरी सोपवली आणि शशीजींनी तो विश्वास सार्थ ठरवला. शशीजी तेवढे नावारुपाला आले नव्हते तेव्हा त्याकाळची अभिनेत्री नंदा त्यांच्याबरोबर काम करण्यास तयार झाली.तिचा त्यांच्या अभिनयक्षमतेवर विश्वास होता. सुरुवातीचे *नींद हमारी ख्वाब तुम्हारे* *मेहंदी लगी मेरे हाथ* *जुआरी* इ. चित्रपट तेवढे चालले नसले तरी शशीजींना चित्रपट मिळू लागले. पण *जब जब फूल खिले* मात्र खूप गाजला. त्यातल्या भोळाभाबड्या काश्मिरी तरुणाच्या भूमिकेत शशीजी फिट्ट बसले.लक्ष्मी प्यारेंचं संगीत पण बहारदार! त्यानंतर बी आर चोप्रांचा मल्टीस्टारर *वक्त* आणि सी श्रीधर यांचा *प्यार किये जा* हा तूफान विनोदी चित्रपट आला. वक्त मध्ये शर्मिला टागोर आणि *प्यार किये जा* मध्ये मुमताज नायिका होत्या. त्यानंतर मात्र एकामागोमाग एक '*आमने सामने* *माय लव्ह*,*सुहाना सफर*, *आ गले लग जा* (शर्मिला टागोर), *रुठा ना करो*, *राजासाब*(नंदा), एक श्रीमान एक श्रीमती, हसीना मानजाएगी (बबिता), कन्यादान, प्यार का मौसम (आशा पारेख) ,जहां प्यार मिले, अभिनेत्री (हेमामालिनी), शर्मिली, जानवर और इन्सान(राखी) , चोर मचाए शोर, प्रेमकहानी(मुमताज), चोरी मेरा काम, सत्यम शिवम सुंदरम(झीनत अमान), फकिरा, जुनून, अतिथी(शबाना आझमी) अशा त्यावेळच्या जवळ जवळ सर्वच अभिनेत्रीं बरोबर चित्रपट केले. शशीजींचे याबरोबरच मल्टिस्टारर चित्रपटही बरेच आले आणि त्यातही अमिताभ बच्चन बरोबर सर्वात जास्त आले. त्यातील उल्लेखनीय म्हणजे *दीवार*, *कभी कभी*, *त्रिशूल*, *ईमान धरम*, *दो और दो पांच*, *सुहाग*, *शान*, *रोटी कपडा मकान*, *काला तत्थर* , *मुक्ती*, *सिलसिला* आणि *क्रांती*! यातले एक दोन चित्रपट सोडले तर सगळ्यात अमिताभ- शशी ही जोडगोळी आहेच. जेव्हा सुरुवातीला ही जोडी हीट होऊ लागली तेव्हा अमिताभ दोन नायकांचा चित्रपट असेल तर निर्मात्यांना शक्यतो शशीजींनाच घेण्याची शिफारस करत असे. दोघं एकमेकांबरोबर इतके कम्फर्ट लेव्हलला आले होते कि अमिताम वयाने २/३ वर्षांनी लहान असूनही शशीजींना "बबुआ" म्हणतं असे. शशीजींनी "फिल्मवालाज" या बॅनरखाली स्वतः निर्माण केलेलं एकूण सहा चित्रपट..सगळ्यात पहिला *जुनून*१९७८ साली आला.१८५७ च्या बंडाच्या काळातला कालखंड. एका नबाबाला एका अॅग्लो इंडियन मुलीशी लग्न करायचे असते. मुलीची आई सख्त विरोधात! नबाब त्या मुलीला मिळवण्यासाठी हिंसेचा परीपाक गाठतो आणि आईचा मुलीला वाचविण्याची परीकाष्ठा! शशी, जेनिफर, नसिर, शबाना,दिप्ती नवल असे तगडे कलाकार! श्याम बेनेगलांचे दिग्दर्शन. ह्याला राष्ट्रीय पारीतोषिक मिळाले १९८१साली *३६ चौरंगी लेन*! ह्यात त्यांची पत्नी जेनिफर हिची मुख्य भूमिका,प्रसिध्द बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन ह्यांचे दिग्दर्शन होते. संगीत वनराज भाटियांचे. तिसरा होता *कलयुग*दिग्दर्शक श्याम बेनेगल.दोन मातब्बर घराण्यातील टाळता न येण्यासारखा संघर्ष होता. रेखा, शशीजी, रेखा, अनंत नाग आणि वनराज भाटियांच संगीत! चवथा *उत्सव* संस्कृत नाटक *मृच्छकटीक* यावर बेतलेला!गिरीष कर्नाड यांचे दिग्दर्शन! रेखा, शशीजी, शंकर नाग, अमजदखान, शेखर सुमन असे कलाकार लक्ष्मी प्यारेंच उत्तम संगीत..(मन क्यूं बहका रे बहका, सांज ढले गगन तले हम एकाकी अशी सुंदर गाणी) पाचवा..*विजेता* दिग्दर्शक गोविंद निहलानी..मुलगा कुणाल कपूर याचा पदार्पणातला चित्रपट! पंजाबी वडिल आणि मराठी आई यांच्या सततच्या वादातून मुलगा "इंडीयन आर्मी फोर्समधे "फायटर पायलट"बनण्याचा निर्णय घेतो.यातील एरीयल फोटोग्राफी आणि आशाजीं आणि सत्यजित तळवलकरांच "मन आनंद आनंदछायो"..हे दोन्ही अप्रतीम! आणि शेवटचा *अजूबा* फॅंटसी सुपर हिरो...निर्मीती आणी दिग्दर्शन दोन्ही शशीजी. अमिताभ, रिषीकपूर, डिंपल, सोनम आणि स्वतः शशीजी..पण चित्रपट अजिबात चालला नाही. मी त्यांच्या स्वनिर्मित चित्रपटांविषयी थोडं विस्ताराने लिहीलं कारण हे सर्वच्या सर्व चित्रपट उत्तम निर्मिती मूल्य, उत्तम दिग्दर्शक, चांगले कलाकार असून तसे फारसे चालले नाहीत. कुठेतरी काहितरी सुटत गेलं . *अजूबा* तर त्यांनी रशियन भाषेत डब करुन रशियातही रिलिज केलेला.ह्यामुळे त्यांना भयंकर आर्थिक फटका बसला. तशातच १९८४ मध्ये पत्नी जेनिफरचा कॅन्सरने दुखःद मृत्यू! ह्या सर्वामुळे शशीजी खूप निराश दुःखी झाले. त्यांनी स्वतःला सगळ्यापासून दूर केलं. पण तिनही मुले आणि कुटुंबिय यांच्यामुळे हळूहळू दुःख विसरुन शशीजींनी पृथ्वी थिएटरच्या कामात गुंतवून घेतलं. मुलगी संजनाने सर्वात जास्त भार उचलला. तसे शशीजींनी नंतर *भवानी जंक्शन* *पाखंडी* *रईसजादा* *अकेला* *सिंदूर* इ. चित्रपटातून अशाच छोट्यामोठ्या भूमिका केल्या. त्यांना २०११ साली *पद्मभूषण* आणि २०१४ साली *दादासाहेब फाळके*पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळविणारे कपूर खानदानातले शशीजी तिसरे सदस्य! ४डिसेंबर २०१७ रोजी शशीजींना चेस्ट इनफेक्शन मुळे कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले पण त्याचे निधन मात्र त्याच दिवशी लिव्हर सोह्रोसिस मुळे झाले. एक हसतमुख, दिलखुलास, बहुआयामी व्यक्तीमत्व ७९ वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. . शशीजींच्या चित्रपटातली काही सुंदर गाणी चित्रपटासहीत... *नींद हमारी ख्वाब तुम्हारे* *यूं रुठो ना हसीना मेरी जानपे बन आएगी *कभी तैरा दामन ना छोडेंगे हम *जुआरी* *हमसफर अब ये सफर कट जाएगा *नींद उड जाए तेरी चैनसे सोनेवाले *जब जब फूल खिले* *एक था गुल और एक थी बुलबुल *ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे *परदेसियोंसे ना अखिया मिलाना *रुठा ना करो* *आपका चेहेरा माशाल्ला ऐ मेरी शोला बदन,रुठा ना करो *आमने सामने* *कभी रात दिन हम दूर थे दिन रात का अब साथ है *नैन मिलाके चैन चुराना जिसका है ये काम *माय लव्ह* *वो तेरे प्यारका गम इक बहाना था सनम *कन्यादान* *मेरी जिंदगीमें आते तो कुछ और बात *लिखै जो खत तुझे वो तेरी यादमें *प्यार का मौसम* *नी सुलताना रे प्यारका मौसम आया *तुम बिन जाऊं कहा *अभिनेत्री* सा रे ग म प गारे मेरे संग मेरे साजना ओ घटा सांवरी थोडी थोडी बांवरी *हसीना मान जाएगी* *ओ दिलबर जानिये तेरे हो हम तेरे बेखुदीमें सनम उठ गए जो कदम *चले थे साथ मिलके चलेंगे साथ मिलकर *शर्मिली* *कैसै कहे हम प्यारने हमको *आज मदहोश हुआ जाएरे मेरा मन *खिलते है गुल यहां *आ गले लग जा* *वादा करो नहीं छोडोगी तुम मेरा साथ *तेरा मुझसे है पहेलेका नाता कोई *ना कोई दिलमें समाया *दीवार* *कहदूं तुम्हे या चुप रहूं *मैंने तुझे मांगा तुझे पाया है *कभी कभी* *कभी कभी मेरे दिलमें खयाल आता है *मुक्ती* *सुहानी चांदनी राते हमें सोने नहीं देती *सत्यम शिवम सुंदरम* *चंचल शीतल निर्मल कोमल संगीत की देवी स्वर सजनी © कृपा देशपांडे...

Comments

Post a Comment