आज एका मनस्वी कलाकाराची कहाणी समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे ज्यानं अगदी थोड्या कालावधीत चित्रपट क्षेत्रात स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली. श्याम बेनेगलांच्या मते गुरुदत्तनी a new Unique way of song picturisation समोर आणलं. कॅमेरामन व्ही के मूर्ती यांच्यामते तो एक असा जोहरी होता ज्याला सर्वोत्तम रत्नांची जाण असते.'निर्माता, दिग्दर्शक राज खोसला म्हणत गुरुदत्त आपल्या कलाकारांकडून ऐशी टक्के अभिनय हा डोळ्यांमधून करवून घेत. सुप्रसिध्द लेखक अबरार अलवी यांच्यामते चित्रपट कथांमधे मॉडर्न राईटिंग ट्रेंड गुरुदत्तंच्या *आरपार* चित्रपटापासून सुरु झाला. अशा ह्या लेजंडरी, जिनियस व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.
गुरुदत्त यांचा जन्म बॅंगलोरचा असला तरी बालपण भवानीपूर, प. बंगाल येथे गेले. त्यांच खर नाव वसंतकुमार शिवशंकर पडुकोण. शिक्षणात खूप हुषार होते पण परिस्थितीमुळे मॅट्रीक पर्यंतच शिक्षण झाले. उदयशंकर यांच्या ट्रुपमधे काही काळ नृत्य शिकले. उदरनिर्वाहासाठी टेलिफोन ऑपरेटरची नोकरी केली पण तिथे मन रमले नाही. शेवटी पुण्याला "प्रभात" फिल्म कंपनीत तीन वर्षांसाठी सह दिग्दर्शक आणी नृत्य दिग्दर्शक म्हणून नोकरी मिळाली . तेव्हाच योगायोगाने देवआनंद ची भेट झाली. भेटीचे गाढ मैत्रीत रुपांतर झाले. दोघांनी एकमेकांना वचन दिले कि ज्याला पहिली संधी मिळेल त्याने दुसर्यालाही पुढे संधी द्यायची . नवकेतनच्या *बाजी*, *जाल* चे दिग्दर्शन गुरुदत्तंनी केले तर *सी आय डी* मधे देवआनंद नायक होते. आणखी एक गुणी कलाकार गुरुदत्तंमुळे या इंडस्ट्रीला मिळाला तो म्हणजे "बद्रुद्दीन काझी" म्हणजेच जॉनी वॉकर!
गुरुदत्त उत्तम निर्माता,कसबी दिग्दर्शक, आणि संवेदनशील अभिनेता होते. त्यांना भारताचा Orson Welles म्हणत. प्रभात मधला त्यांचा करार संपला आणि ते मुंबईत आले. आठ, दहा महिने काम नव्हते त्याकाळात त्यांनी इंग्रजी लेखनाचे कौशल्य वाढवले आणि ते "इलस्ट्रेटेड विकली" मधे छोट्या छोट्या गोष्टी लिहीत तसेच प्रभात कंपनीचे C E O बाबूराव पै यांच्याकडे फ्री लान्स असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम करीत. शब्द दिल्याप्रमाणे देव आनंद यांनी "नवकेतन" संस्था स्थापन केल्यावर त्यांच्या पहिला चित्रपट *बाजी*चे दिग्दर्शन गुरुदत्तना दिले. बाजी मुळे एक टीमचं नावारुपाला आली त्यात नवकेतन संस्था,गुरुदत्त,देवआनंद,गीताबाली,
कल्पना कार्तिक, गीतकार साहीर, संगीतकार सचिनदा, स्कीन प्ले, संवाद बलराज साहनी! *बाजी* सुपरहीट झाला पण त्यानंतरचा *जाल* तेवढा नाही चालला.
*बाज* हा निर्माता म्हणून गुरुदत्तंचा पहिला चित्रपट! गीताबालींची मोठी बहीण हरविंदर कौर ह्या सहनिर्मात्या होत्या. यावेळी गुरुदत्तंनी संगीतकार
ओ पी नय्यर ह्यांना संधी दिली पण गाणी आणि चित्रपट दोन्ही चालले नाहीत.
ओ पी च्या दुसर्याही चित्रपटांची गाणी गाजली नव्हती म्हणून निराश होउन त्यांनी चंदीगडला परत जायची तयारी केली आणि गुरुदत्त यांच्याकडे त्यांनी उरलेले पेमेंट मागितलें. गुरुदतं कडे तरी पैसे कुठे होते? त्यांनी ओ पींना समजावले कि माझे लागोपाठ २ चित्रपट *आरपार* आणि *Mr & Mrs 55* येतील. ते मी तुम्हालाच देईन पण परत जाऊ नका. ओ पीं नी ही ते ऐकले. या दोनही चित्रपटांत ओ पीं नी संगीत दिले आणि गाणी सुपरहीट झाली.
५०च्या दशकात मेहेबूबखान, बिमलदा, राजकपूर असे दिग्गज निर्माते दिग्दर्शक होते त्यांच्यात अजून एक नाव आलं गुरुदत्त! त्यानंतरचा सी आय डी. सस्पेंन्स थ्रीलर! ओ पीं च बहारदार संगीत! चित्रपट सुप्परहीट! त्यानंतर १९५८ मधे 12 O'Clock! सस्पेंन्स थ्रीलर! पुन्हा देव वहिदा जोडी, संगीत सदाबहार ओ पी नय्यर! मनात आलं जर गुरुदत्त त्यादिवशी ओ पीं ना थांबवत नाहीत तर हा खजानाही आपल्याला मिळत नाही!
*प्यासा* च कथानक गुरुदतंच्या मनात खूप दिवसांपासून होतं. पण पैशाची अडचण होती. सी आय डी, आरपार हिट होताच प्यासाची जुळवाजुळव सुरु झाली. प्रथम दिलिपकुमार मधुबाला आणि नर्गिस असे कलाकार ठरलेले. काही ना काही कारणाने अडचणी येऊन शेवटी गुरुदत्तनी स्वतःच ही भूमिका करायचे ठरविले, जोडीला मालासिन्हा, वहिदा रेहेमान. एका मनस्वी कवीच्या आयुष्यात आलेली अतिशय चांगल्या स्वभावाची गणिका जिला पहिल्यापासून त्याच्या काव्याबद्दल प्रेम असते. हा चित्रपट "टाईम मॅगेझिनच्या सर्वेप्रमाणे दुनियाभरातल्या १०० बेस्ट चित्रपटां पैकी एक गणला जातो. भारतातील सर्वोत्कृष्ट २५ चित्रपटातील एक आहे. फ्रान्स आणी जर्मनीतही याला चांगला प्रतिसाद मिळाला.
पण त्यानंतर अतिशय मेहेनतीने बनवलेला पहीला सिनेमास्कोप चित्रपट *कागज के फूल* . यात त्यांनी चित्रपट सृष्टीतल्या काही अशा गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला जे लोकांना रुचलं नाही. त्यांचे मित्र, आप्तस्वकिय पदोपदी सांगत होते कि हा चित्रपट काळाच्या खूप पुढचा आहे. लोकांना आवडणार नाही. पण गुरुदत्तचे त्यावर म्हणणे होते मी हा चित्रपट स्वतःसाठी बनवतोय.ह्यात एक जमेची बाजू अशी कि फोटोग्राफीच्या तंत्रद्यानात गुरुदत्तजींनी जे प्रयोग केले ते सर्वांनी नावाजले, विशेषतः "वक्तने किया सितम" ह्या गाण्यात शॅडोचा वापर अफलातून! ते परफेक्शनिस्ट होते मात्र ह्या चित्रपटाच्या अपयशाने गुरुदत्त निराश झाले. दिग्दर्शन केलेला हा त्यांचा शेवटचा चित्रपट!
पण १९६० साली आलेल्या *चौदहवी का चांद* ने पुन्हा उमेद दिली.दिग्दर्शक एम. सादिक! गुरुदत्त स्वतः नायक. सोबत रहमान, वहिदा, फरीदा जलाल पाहुणी कलाकार! ह्यावेळी प्रथमच संगीतकार रवी यांना संधी दिली आणि चित्रपट आणि संगीत खूप गाजले. १९६२ मध्ये आलेला *साहब बीबी और गुलाम* हा अजून एक सुंदर चित्रपट! ह्याचं दिग्दर्शन अबरार अलवींच! १९व्या शतकाच्या शेवटी अस्ताला गेलेल्या बड्या जमीनदारांची शोकांतिका फार प्रभावीपणे मांडली आहे. मीनाजींनी साकारलेली छोटी बहू! ही हिंदू स्त्री नवर्याने दुसर्या स्रीकडे जाऊ नये म्हणून त्याच्याबरोबर मद्य प्यायलाही कमी करत नाही हे दाखवणं तसं धाडसीपणाचं होत. हा चित्रपट पण खूप चालला.
*बहारे फिरभी आएगी* हा निर्माता म्हणून गुरुदत्तचा शेवटचा चित्रपट. नायकही तेच, बरोबर मालासिन्हा आणि तनुजा! पण त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे अर्धवट राहिलेला चित्रपट धर्मेंद्रला घेऊन रिशूट करावा लागला. गुरीदत्तंच्या टीमने तो चित्रपट पूर्ण करुन जणू गुरुदत्तजींना श्रध्दांजली वाहिली. याबरोबरचं इतर निर्मात्यां बरोबर गुरुदत्तंचे *सांज और सवेरा* मीनाकुमारी) *भरोसा* (आशा पारेख) *बहुरानी*,*सुहागन* (मालासिन्हा) हे चित्रपट ही चांगले चालले. साधना बरोबरही *पिकनीक* हा चित्रपट केला होता पण तो रिलिजच झाला नाही. त्याच्या एका सुंदर गाण्याचा व्हिडियो उपलब्ध आहे.
बाजीच्या सेटवर गुरुदत्तंची गीता रॉय ह्या प्रसिध्द बंगाली गायिकेशी ओळख झाली. दोघांच्या भेटीगाठी, जवळिक वाढली आणि १९५३ मध्या दोघांनी लग्न केलं.तीन मुलं झली पण तीन चार वर्षानी त्यांच्ययात वाद होऊ लागले! गुरुदत्तनी गीताला बाहेर गायला बंदी घातली ती गीताजींना मान्य नव्हती.हळू हळू तणाव वाढत गेला. प्यासाच्या वेळी वहिदाजीं बरोबर काही नाजूक धागे निर्माण झाले. गीताजींच्या हे लक्षात आले.सततच्या वादांमुळे गीताजी घर सोडून गेल्या. इथे वहिदाजींना पण या नात्याचे भविष्य अंधारात दिसत होत. त्यांना स्वतःची वेगळी ओळखही निर्माण करायची होती. गुरुदत्त आपल्याला नक्की काय हवे आहे त्याचा फैसला शेवट पर्यंत करु शकले नाहीत. ह्या द्विधा मनःस्थितीचा गुरुदत्तना खूप त्रास होई.
९ ऑक्टोबर चा तो काळा दिवस होता.त्यादिवशी गुरुदत्त कमालीचे बेचैन होते. पत्नी गीता वेगळी रहात असल्याने मुलांना भेटायला आणणार होती. ती न आल्याने रागाचा पारा वर चढत होता. लेखक मित्र अबरार अलवींबरोबर गुरुदत्तनी मन मोकळे केले. मधे गुरुदत्त आणि पत्नीचा फोन झाला तेव्हा ते खूप संतापाने बोलत होते आणि शेवटचे शब्द होते, "अगर आज तुम न आई तो मेरा मरा मुंह देखोगी"! आणी झालंही तसचं! त्या वैफल्यग्रस्त अवस्थेत झोपेच्या गोळ्याचा ओव्हरडोस आणि मद्याचा अतिरेक ह्यामुळ १० तारखेला पहाटे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कां बरं ही शहाणी सुरती माणसं अशी वागतात? इतकं मनाने कमकुवत असतात कि आपल्याला नक्की काय हवयं याचा निर्णय घेऊ शकत नाहीत! दुःखाला इतकं मोठं करतात,निराशेनं मन इतकं ग्यासतं आणि त्यावर दारु हा एकमेव इलाज असल्याचं समजून आयुष्य बरबाद करतात? ३९ हे जाण्याचं वय आहे कां? गुरुदत्तच्या अकाली जाण्यावर कैफी आझमींनी लिहिलयं..
*रहनेको सदा दहरमें आता नहीं कोई
तुम जैसे गए वैसेभी जाता नहीं कोई
एक बार तो मौतभी घबरा गई होगी
यू मौतको सीनेसे लगाता नहीं कोई*
गुरुदत्तजींची काही सुंदर गाणी आणि चित्रपट..
*बाजी*
*तदबीरसे बिगडी हुई तकदीर बना ले
*सुनो गजर क्या गाए
*आजकी रात पिया दिल ना तोडो
*जाल*
*ये रात ये चांदनी फिर कहां
*चोरी चोरी मेली गली आना है बुरा
*आरपार*
*सुन सुन जालीमा प्यार हमको तुमसे
*ये लो मैं हारी पिया हुई तेरी जीत रे
*बाबूजी धीरे चलना
*C I D*
*आंखोही आंखोमें इशारा हो या
*लेके पहला पहला प्यार
*ए दिल है मुश्किल जीना यहां
*Mr. & Mrs 55*
*ठंडी हवा काली घटा आही गई झूमके
*उधर तुम हंसी हो इधर दिल जवां है
*दिलपर हुआ ऐसा जादू
*प्रीतम आन मिलो
*चल दिये बंदा नवाज
*प्यासा*
*जाने वो कैसे लोग थे जिनके
*ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है
*जाने क्या तूने कहीं
*आज सजन मोहे अंग लगालो
*हम आपकी आंखोमें
*सर जो तेरा चकराए
*जिन्हे नाज है हिंदसे
*कागज के फूल*
*वक्तने किया क्या हंसी सितम
*बिछडे सभी बारी बारी
*चौदहवी का चांद*
*चौदहवी का चांद होया आफताब हो
*मिली खाकमें मुहब्बत जला दिलका
*साहब बीबी और गुलाम*
*कोई दूरसे आवाज दे चले आओ
*पिया ऐसो जियामें समाही गयो रे
*न जाओ सैंया छुडाके बैंया
*भंवरा बडा नादान है
*साकिया आज मुझे नींद नहीं आएगी
*सांज और सवेरा*
*यहीं है वो सांज और सवेरा
*अजहुं न आए बालमा
*सुहागन*
*तू मेरे सामने हैं तेरी जुल्फे है खुली
*तुम्ही तो मेरी पूजा हो
*बहुरानी*
*बलमा अनाडी मन भाए
*उम्र हुई तुमसे मिले फिरभी जाने क्यूं
*भरोसा
*आजकी मुलाकात बस इतनी
*इस भरी दुनियामें कोईभी हमारा न हुआ
© कृपा देशपांडे...
Comments
Post a Comment