श्री ४२० चित्रपटात "मुडमुडके ना देख मुडमुडके मधे "Back dancer" म्हणून राजकपूर बरोबर अवघ्या १४/१५ व्या वर्षी तिने नृत्य केले ते साल होते १९५५. आणि गंमत बघा ..१९६४ मध्ये ती त्याची नायिका बनली चित्रपट होता "दुल्हा दुल्हन"! सूज्ञ वाचकांनी ओळखलचं असेल कि, मी आज आठवणींतून साकारायचा प्रयत्न केलाय , ६० ते ७० च्या दशकातली सुपरहीट अभिनेत्री, त्यावेळची प्रसिध्द style Icon सौंदर्यवती साधना! प्रसिध्द अभिनेते रजा मुराद या विषयी सांगतात, लिंकीग रोडवरुन जाण्यार्र्या साधनाच्या गाडीकडे आम्ही तरुण मुलं डोळे लावून असायचो, साधनाची एक झलक दिसावी म्हणून! गाडीचा नंबरही त्यांना आठवत होता..MRH 6878
"साधना शिवदासानी...." कराचीतल्या सिंधी कुटुंबात जन्म! "साधना बोस" ह्या प्रसिध्द अभिनेत्रीवरुन वडिलांनी तिचे नाव ठेवले साधना! फाळणीनंतर हे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. साधना तिच्या पालकांचे एकुलतं एक अपत्य. " आठ वर्षांपर्यंत आईने घरातच शिकवले आणि नंतर वडाळ्याच्या Auxillary Convent मध्ये डायरेक्ट प्रवेश घेतला. जयहिंद college मध्ये शिकत असताना College च्या सांस्कृतिक कार्यक्रमात एका सिंधी निर्मात्याने साधनाला हेरले आणि "अबाना" ह्या सिंधी चित्रपटात "शीला रमाणी" ह्या अभिनेत्रीच्या बहिणीचा रोल करण्याची संधी दिली.
ह्या चित्रपटातला साधनाचा फोटो "फिल्मालय"चे प्रसिध्द निर्माते शशधर मुखर्जी यांनी पाहिला. त्यांना आपल्या *लव्ह इन शिमला* ह्या चित्रपटासाठी नायिकेच्या भूमिकेसाठी फ्रेश सुंदर चेहेरा हवा होता. नायक त्यांचाच मुलगा जॉय मुखर्जी. एवढ्या मोठ्या बॅनरचे काम साधनाने लगेच स्विकारले आणि अशारितीने साधनाची सिने कारकिर्द सुरु झाली.
*लव्ह इन शिमला* ची ऑडिशन देताना दिग्दर्शक आर के नय्यर यांना साधनाचे कपाळ जरा जास्तच भव्य वाटलं. त्यांनी यावर उपाय म्हणून साधनाला एका ब्युटी सलून मध्ये नेले. त्याकाळची Hollywood ची प्रसिध्द अभिनेत्री Audrey Hepburn हिची हैअर स्टाईल साधनाच्या चेहेऱ्याला शोभून दिसली. तीच पुढे " साधना कट म्हणून प्रसिध्द !झाली.
त्यानंतर लगेचच दुसरा चित्रपट आला तो बिमलदा टुयांचा "*परख*"...साधना जेव्हा त्यांना भेटायला गेली तेव्हा तिचा आधुनिक वेषभूषा पाहून बिमलदा विचारात पडले.कारण त्यांची नायिका गावात रहाणारी साधी मुलगी होती. साधनानी त्यांच्याकडे अर्ध्या तासाचा वेळ मागितला आणि पूर्ण साध्या पेहेरावात ती बिमलदांसमोर आली. बिमलदानी खुष होऊन पसंती दिली. चित्रपट खूप गाजला. संगीत सलीलदांचे होते...
"परख" बनत असताना एकदा सेटवर देवआनंदने साधनाला पाहिले.अतिशय सुंदर दिसत होती साधना! नवकेतन च्या "*हम दोनो*" ची जुळवाजुळव चालू होती. दोन नायिकांपैकी एक ठरली "साधना"! हा पण चित्रपट खूप गाजला. त्यानंतरचा "*मनमौजी*" हा विनोदी चित्रपट होता. संगीत मदन मोहन यांचं! यात विशेष म्हणजे "जयललीता" यांनी कृष्णाची भूमिका केली आहे.
यानंतरचा आहे ह्रषिदांचा सुंदर चित्रपट"*असली नकली*"! नायक देवआनंद! संगीत एस जें च. त्यातली गाणी एक से एक! चित्रपट खूपच गाजला. लगोलग आला एच एस रवैल यांचा "*मेरे मेहेबूब*"! साधना हा चित्रपट करण्यास साशंक होती पण राजेंद्रकुमार उत्तम कथा असलेले चित्रपट स्विकारतात हे कळल्यावर तीने हो म्हटले आणि एक सर्वांग सुंदर चित्रपटाची निर्मिती झाली. ह्यातले नौशादजींचे संगीत तर अप्रतीमच!
राज खोसला यांचा अतिशय गाजलेला रहस्यपट,*वह कौन थी*! साधनाचा डबलरोल! नायक मनोज कुमार, मदन मोहनचे सुरेल संगीत!या चित्रपटासाठी साधनाला सर्वोत्कृष्ट नायिकेचे फिल्मफेअर चे नामांकनही मिळाले. राज खोसलांचेच "*मेरा साया* आणि "अनिता"हे पण रहस्यपट! नायिका साधनाच! त्यामुळे लोकं तिला"मिस्ट्री गर्ल" संबोधू लागले.
*राजकुमार* दक्षिणेच्या निर्मात्यांचा चित्रपट होता. नायक शम्मीकपूर, संगीतकार शंकर जयकिशन! एक से एक गाणी! नंतर आला रविंद्र दवे यांचा "*दुल्हा दुल्हन*"...बघा, १० वर्षात साधना राजकपूरची नायिका बनली. सुमधूर संगीत कल्याणजी आनंदजींचे! नंतर आला मल्टी स्टारर, बी आर चोप्राचा "*वक्त*"! सुनिलदत्त, राजकुमार, शशीकपूर, बलराज साहनी असे मातब्बर सहकलाकार असूनही साधनाचे काम उठून दिसले. त्यावर्षीचे फिल्मफेअर मानांकनही मिळाले..फॅशन आयकॉन साधनानेच त्या चित्रपटात टाईट सलवार, कुर्त्याची फॅशन आणली आणि ती खूप लोकप्रिय झाली.
आरजू! राजेंद्रकुमार बरोबर आधी"मेरे मेहेबूब" मध्ये काम केलेले होते आणि त्यांची छान दोस्ती झालेली. आरजूची पण कथा, संगीत, अभिनय सगळचं बहारदार...त्यांतरचा मेरा साया पण खूप गाजला..त्यातही डबलरोल. मदनजींचे अप्रतीम संगीत! .
एक दिवस साधनाला थायरॉईड झाल्याच समजलं. तिचा चेहेरा आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. तिच्या डोळ्यावर परिणाम झालेला. तिचे पाणीदार, तेजस्वी, बोलके डोळे पहिल्यासारखे राहीलेच नव्हते. ट्रीटमेंटसाठी ती अमेरिकेतल्या बोस्टन इथे गेली. परत आल्यावर पहिला चित्रपट केला "*इंतकाम*", नायक संजयखान.ह्या चित्रपटात लताजींनी पहिले कॅबरे song गायले"आ जानेजा ..
त्यानंतर बद्तमीज(शम्मीकपूर) गबन( सुनिलदत्त) अनिता (धर्मेंद्र), इश्क पर जोर नहीं (धर्मेंद्र) आप आये बहार आयी (राजेंद्रकुमार) सच्चाई (शम्मीकपूर, संजीवकुमार), दिल दौलत दुनिया (राजेश खन्ना) एक फूल दो माली (संजय खान) हे चित्रपट आले.बरे चालले पण पहले जैसी बात नहीं थी! *गीता मेरा नाम* चे साधनानी दिग्दर्शनही केले.पण शेवटचे २/३ चित्रपट अजिबात न चालल्यामुळे नय्यर पती पत्नीला financial problems झाले. दोघांचीही तब्येत साथ देईना. त्यातच अस्थम्याच्या झटक्याने नय्यर साहेबांचे निधन झाले. साधना एकटी पडली.
साधनाची तब्येतही ढासळत होती. ती सांताक्रुझला भाड्याने रहात होती तो बंगला आशा भोसलेंचा. अगदी चांगल्या ४० वर्षांच्या मैत्रीत काहिशा कारणाने वितुष्ट आले. कोर्ट कचेऱ्या सुरु झाल्या. साधनाला जवळचे नातेवाईक नव्हतेच. एका भाच्याशी चांगले संबंध होते. अभिनेत्री वहिदा, नंदा, हेलेन, शम्मी यांच्याशी चांगली मैत्री होती. साधनाची केअरटेकर फ्लोरा हिने शेवट पर्यंत काळजी वाहिली. साधनाने पण त्या फॅमिलीला चांगला आधार दिला. साधनाला सन २००२ मध्ये "आयफा"ने Lifetime Achievement award दिले. साधनाने कित्येक वर्षांनी Public apperance दिला. आणखी एकदा तीन वर्षांपूर्वी प्रसिध्द फॅशन डिझायनर शायना N C च्या फॅशन शो मध्ये रणबीर कपूर बरोबर सहभागी झाली होती. गुलाबी कलरच्या डिझायनर साडीत साधनाने तेवढ्याच ग्रेसफूली Rampwalk केला. बस! त्यानंतर ती दिसली ती फक्त कोर्टात. ती केस जिंकली खरी पण दगदग आणि प्रकृती अस्वास्थ्य यामुळे २५ डिसेंबर २०१६ रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. तिला तिच्याच गाण्यात आदरांजली!...
*अभी न जाओ छोडकर, के दिल अभी भरा नहीं*
साधनाची काही अप्रतिम गाणी आणि चित्रपट...
*परख*
ओ सजना बरखा बहार आई
मिला है किसीका झूमका
ओ सजना बरखा बहार आई
मिला है किसीका झूमका
*हम दोनो*
*अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम
मैं जिंदगीका साथ निभाता चला गया
*अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम
मैं जिंदगीका साथ निभाता चला गया
*मेरे मेहेबूब*
*यादमें तेरी जागजागके हम
*मेरे मेहेबूबमें क्या नहीं
*अल्ला बचाए नौजवानोंसे
*यादमें तेरी जागजागके हम
*मेरे मेहेबूबमें क्या नहीं
*अल्ला बचाए नौजवानोंसे
*असली नकली*
*तेरा मेरा प्यार अमर
*तुझे जीवनकी डोरसे बांध लिया ह
*तेरा मेरा प्यार अमर
*तुझे जीवनकी डोरसे बांध लिया ह
*वह कौन थी*
*लग जा गले के फिर ये हंसी रात
*नैना बरसे रिमझिम
*लग जा गले के फिर ये हंसी रात
*नैना बरसे रिमझिम
*मेरा साया*
*नैनोमें बदरा छाये बिजलीसी चमके हाए
*आपके पहलूमें आकर रो दिये
*नैनोमें बदरा छाये बिजलीसी चमके हाए
*आपके पहलूमें आकर रो दिये
*राजकुमार*
*दिलने पुकारा और हम चले आए
*दिलरुबा दिलपे तू ये सितeम किये जा
*दिलने पुकारा और हम चले आए
*दिलरुबा दिलपे तू ये सितeम किये जा
*वक्त*
*आगे भी जानेना तू पीछे भी जानेना तू
*चेहेरेपे खुशी जाती है
*ऐ मेरी जोहराजबीं
*आगे भी जानेना तू पीछे भी जानेना तू
*चेहेरेपे खुशी जाती है
*ऐ मेरी जोहराजबीं
*दुल्हा दुल्हन*
*मुझे कहते है कल्लू कव्वाल
*जो प्यार तूने मुझको दिया था
*मुझे कहते है कल्लू कव्वाल
*जो प्यार तूने मुझको दिया था
*आरजू*
*ऐ फूलोंकी रानी बहारोंकी मलिका
*बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है
*ऐ फूलोंकी रानी बहारोंकी मलिका
*बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है
*अनिता*
*मैं देखू जिस ओर सखीरी
*तुम बिन जीवन कैसे बीता
*मैं देखू जिस ओर सखीरी
*तुम बिन जीवन कैसे बीता
*इंतकाम*
*गीत तेरे साजका तेरीही आवाज हूं
*कैसे रहू चुप के मैंने पी ही क्या है
*गीत तेरे साजका तेरीही आवाज हूं
*कैसे रहू चुप के मैंने पी ही क्या है
© कृपा देशपांडे....
Comments
Post a Comment